समाजासाठी आपले योगदान देण्याची सुप्त इच्छा प्रत्येकात दडलेली असते, मात्र काय करावे कसे करावे आणि महत्वाचे म्हणजे केव्हा करावे अश्या प्रश्नांना सुस्पष्ट उत्तरे न सापडल्यामुळे, सुप्तावस्थेतील इच्छा निद्रितावस्थेत जाते. अगदी थोडक्यात ह्या प्रश्नांची उत्तरे शोधुयात.
खरे पाहता कोणतीही वेळ योग्यच म्हणावी लागेल आणि परिस्थितीची गरज असेल तर केव्हाही समाजाप्रती आपले योगदान देण्यासाठी उभे राहायलाहि हवे, मात्र, आपणहून असे काहीतरी करावयाचे असल्यास,
सर्वप्रथम स्वतःला स्थापित करावे, स्थापित करणे म्हणजे स्वत: च्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक स्थरावरील प्राथमिक आणि संरक्षणात्मक गरज पूर्ण करण्यावर भर द्यावा, ह्या प्राथमिक गरजा पूर्ण करणेहि एक प्रकारे समाजात आपले योगदानाच समजावे, जर आपण स्थापित असाल तरच आपण योग्य गोष्टींसाठी भक्कम पणे उभे राहू शकाल, अस्थिर अवस्थेमधून जात असताना उगाचच समाज कार्यात बुडून गेल्याने होणारा आत्मक्लेश टाळावा, त्यामुळे समाजाचे नुकसानच संभवते. सामाजिक जबाबदाऱ्या मोठ्या असून त्या पेलण्यासाठी भक्कम पाया रोवणे अनिवार्य आहे.
इतर सामाजिक नेतृत्वाचा पाठपुरावा करण्याआधीहि पडताळून घ्यावे, स्वार्थी राजकीय अथवा आर्थिक हेतू लपेलला असल्यास पाठिंबा देण्याविषयी पुनर्विच्चर व्हावा. आपल्याला ज्या विषयाची माहिती आणि त्या गती असेल तसेच ह्या जगात त्या विषयीचा बदल आवश्यक हि असेल तर आपण त्या सत्कार्याला वाहून घेण्याचा विचार करू शकता. अगदी मोठी उडी न घेताहि थोडे थोडके का होईना आपले योगदान दिल्यास आत्मिक आनंद तर मिळेलच पण समाज कार्यातून निर्माण होणारी ऊर्जा तुम्हाला व्यक्तिमत्वाच्या वेगळ्याच स्थरावर घेऊन जाईल.
No comments:
Post a Comment