Sunday, 28 February 2021
Don't stick to any negative thought, it's just a small part of a huge psychological drama. Quote #TM294
Saturday, 27 February 2021
Your image in your own eyes creates your impression in the minds of others. Quote #TM293
Quote #TM293
*Your image in your own eyes creates your impression in the minds of others.*
The day you begin to see yourself as capable, the world begins to see you as capable.
First of all, you have to be right in your own opinion. The opinions of others should be taken into account later because the only person who knows you in-out is you.
सुविचार २९३
*आपल्या नजरेतील स्वतःचे स्थान इतरांच्या मनात आपली छवी निर्माण करते.*
ज्या दिवशी तूम्ही स्वतः ला क्षमतावान दीसू लागता, जग तुमच्याकडे सक्षम म्हणुनच पाहू लागते.
सर्वप्रथम आपण स्वतः च्या मते योग्य असायला हव. इतरांची मते नंतर लक्ष्यात घ्यावीत कारण एकच व्यक्ती आपल्याला अंतर्बाह्य ओळखते ती म्हणजे आपण स्वतःच.
Friday, 26 February 2021
Enthusiasm is the key to success. Quote#TM292
Quote#TM292
*Enthusiasm is the key to success.*
I never heard of a discouraged person winning a battle. On the contrary, there are many examples of enthusiastic and courageous people pulling the impossible victory. It shows that enthusiasm is such magic that the thing into which it is poured begins to shine.
सुविचार २९२
*कामातील उत्साह हीच यश मिळण्यासाठी सर्वात जमेची बाजू आहे.*
निरुत्साही व्यक्तीने कोणतीही लढाई जिंकली आहे असा ऐकिवात नाही. या उलट उत्साही आणि धैर्यवान व्यक्तींनी अशक्यप्राय विजयश्री खेचून आणलेली अनेक उदाहरणे आहेत. म्हणूनच उत्साह हि एक अशी जादू आहे की ती ज्यात ओतली ती वस्तू चमकू लागते.
Thursday, 25 February 2021
Even the vast ocean cannot drown a drop of oil, that is the power of inner strength. Quote #TM291
Quote #TM291
*Even the vast ocean cannot drown a drop of oil, that is the power of inner strength.*
To be self-empowered, one should put aside all the unnecessary beliefs. The biggest unnecessary trash is 'you are weak'. Just as a drop of oil does not leave its dense form and maintains its existence, similarly we should not dissolve our inner strength. This inner strength is innate in everyone, but then during mental development, a false layer of weakness begins to form in the mind, let's put it aside.
सुविचार २९१
*अफाट समुद्र सुध्दा तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही, हीच आत्मिकशक्तीची ताकद असते.*
आत्मशक्ती प्राप्त करण्याची सुरुवात प्रथम अनावश्यक गोष्ठी बाजूला सारून केली जावी. सर्वात मोठी अनावश्यक अन् खोटी गोष्ट म्हणजे 'तूम्ही कमकुवत आहात'. जसा तेलाचा थेंब स्वतः च्या घट्ट स्वरूपाला सोडत नाही अन् आपले अस्तित्व टिकवून ठेवतो, तसेच आपल्या ठाई असलेल्या आंतरिक शक्तीचा विसर पडता कामा नये. ही आंतरिक शक्ती प्रत्येकाला जन्मतःच प्राप्त असते, मात्र नंतर मानसिक विकासा दरम्यान तिला बाजूला सारून एक कमकुवतपणाचा खोटा थर मनावर साचू लागतो. त्याला बाजूला सारुयात.
Wednesday, 24 February 2021
There is no way to avoid challenges in life, so learn to face them. Quote #TM290
Quote #TM290
*There is no way to avoid challenges in life, so learn to face them*
Even before we are born, we face many challenges and continue to face many small-big challenges at every moment. If we see challenges as opportunities, it gives us the strength to face them. These challenges are like current flowing in the opposite direction, sometimes it is intense and sometimes it is shallow, but if you want to survive in this flow, you have to master the skill of swimming.
सुविचार २९०
*जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून त्यांचा सामना करण्यास शिका*
जन्माला येण्यापूर्वीच आपल्यापुढे अनेक आव्हाने आ वासून उभी असतात. त्यामुळे क्षणोक्षणी लहानमोठी आव्हाने पेलत आपल्याला चालावे लागते. आव्हानांना संधीच्या स्वरूपात पाहत चालल्यास त्यांना सामोरे जाण्याचे बळ मिळत राहते. एक लक्ष्यात असुदे ही आव्हाने म्हणजे विरुद्धबाजूने वाहणारा एक प्रवाहच असतो कधी तीव्र तर कधी उथळ मात्र ह्या प्रवाहात टिकून राहायचे असेल तर पोहण्याचे कौशल्य आत्मसात करावेच लागेल.
Tuesday, 23 February 2021
Critics change their opinion when you succeed. Quote #TM289
Quote #TM289
*Critics change their opinion when you succeed*
Sometimes, Critics should be considered as a guide, because we couldn't see a few things on our own, but through the eyes of critics, the right path can be seen.
At least once we should think positively about criticism. Of course, we always have the strength to change the opinion of the critics.
सुविचार२८९
*आपण यशस्वी होता तेव्हा समीक्षक त्यांचे मत बदलतात*
टीकाकार हे मार्ग दाखवणारे दिवेच समजावेत. आपल्याला काही गोष्ठी कधीकधी दृष्टीत पडत नाहीत. मात्र टीकाकारांच्या डोळ्यांतून पाहिल्यास योग्य मार्ग दिसू शकतो.
एकदा तरी आपल्यावर होणाऱ्या टीकेचं सकारात्मक विचार करून पाहावा. नक्कीच आपल्या कर्तृत्वचा जोरावर टीकाकारांचे मतपरिवर्तन आपण करू शकतो.
Monday, 22 February 2021
Often, if you want to create an identity, you have to stand out from the crowd. Quote #TM288
Sunday, 21 February 2021
Patience and fearlessness are inseparable companions of success. Quote #TM287
Quote #TM287
*Patience and fearlessness are inseparable companions of success.*
Usually, patience is not a natural quality found in human beings, it could be internalized through experience or awareness only then it could become a part of the personality.
But, fearlessness is our natural quality but we suppress it out of unnecessary fear. To regain fearlessness, one should consciously put aside unnecessary thoughts. Because based on these two qualities, castles of success can be built.
सुविचार २८७
*संयम आणि निर्भयता हे यशाचे अविभक्त साथी आहेत*
सहसा संयम हा गुण मानवात नैसर्गिकरीत्या नसतो, अनुभवातून किंवा जाणिवेतून तो आपल्यात येतो आणि व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतो.
निर्भयपणा तसा नैसर्गिकरीत्याच आपल्यात असतो, मात्र अनावश्यक भितीपोटी आपण तो दबवत असतो. मात्र निर्भयता पुनः प्राप्त करण्यासाठी अनावश्यक विचारांना जाणिवपूर्वक बाजूला सारावे कारण ह्या दोन्ही गुणांच्या आधारे यशाचे मनोरे रचता येवू शकतात.
Saturday, 20 February 2021
When looking for the cause of your problems, conduct introspection at least once. Quote #TM286
Quote #TM286
*When looking for the cause of your problems, conduct introspection at least once*
As long as we consider others as a cause of our problems and difficulties, we cannot erase our problems and difficulties. The fact can come to the surface by a close self-examination and only then should we take the right measures.
सुविचार २८६
*समस्येचे कारण शोधत असताना एकदा तरी अंतर्मुख होऊन शोधवे*
जोपर्यंत आपण इतरांना आपल्या समस्या आणि अडचणींचे कारण समजत असतो तोपर्यंत आपण आपल्या समस्या आणि अडचणी मिटवू शकत नाही. अंतर्मुख झाल्यावर वास्तव समोर येवू शकते, त्यानंतरच योग्य ती उपाययोजना करावी.
Friday, 19 February 2021
समाजासाठी काही करण्याआधी..
समाजासाठी आपले योगदान देण्याची सुप्त इच्छा प्रत्येकात दडलेली असते, मात्र काय करावे कसे करावे आणि महत्वाचे म्हणजे केव्हा करावे अश्या प्रश्नांना सुस्पष्ट उत्तरे न सापडल्यामुळे, सुप्तावस्थेतील इच्छा निद्रितावस्थेत जाते. अगदी थोडक्यात ह्या प्रश्नांची उत्तरे शोधुयात.
खरे पाहता कोणतीही वेळ योग्यच म्हणावी लागेल आणि परिस्थितीची गरज असेल तर केव्हाही समाजाप्रती आपले योगदान देण्यासाठी उभे राहायलाहि हवे, मात्र, आपणहून असे काहीतरी करावयाचे असल्यास,
सर्वप्रथम स्वतःला स्थापित करावे, स्थापित करणे म्हणजे स्वत: च्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक स्थरावरील प्राथमिक आणि संरक्षणात्मक गरज पूर्ण करण्यावर भर द्यावा, ह्या प्राथमिक गरजा पूर्ण करणेहि एक प्रकारे समाजात आपले योगदानाच समजावे, जर आपण स्थापित असाल तरच आपण योग्य गोष्टींसाठी भक्कम पणे उभे राहू शकाल, अस्थिर अवस्थेमधून जात असताना उगाचच समाज कार्यात बुडून गेल्याने होणारा आत्मक्लेश टाळावा, त्यामुळे समाजाचे नुकसानच संभवते. सामाजिक जबाबदाऱ्या मोठ्या असून त्या पेलण्यासाठी भक्कम पाया रोवणे अनिवार्य आहे.
इतर सामाजिक नेतृत्वाचा पाठपुरावा करण्याआधीहि पडताळून घ्यावे, स्वार्थी राजकीय अथवा आर्थिक हेतू लपेलला असल्यास पाठिंबा देण्याविषयी पुनर्विच्चर व्हावा. आपल्याला ज्या विषयाची माहिती आणि त्या गती असेल तसेच ह्या जगात त्या विषयीचा बदल आवश्यक हि असेल तर आपण त्या सत्कार्याला वाहून घेण्याचा विचार करू शकता. अगदी मोठी उडी न घेताहि थोडे थोडके का होईना आपले योगदान दिल्यास आत्मिक आनंद तर मिळेलच पण समाज कार्यातून निर्माण होणारी ऊर्जा तुम्हाला व्यक्तिमत्वाच्या वेगळ्याच स्थरावर घेऊन जाईल.
Plants change their leaves according to the situation but keep the roots unchanged. Quote#TM285
Quote#TM285
*Plants change their leaves according to the situation but keep the roots unchanged*
The environment doesn't only provide vital things but also provides life lessons.
To cope with the external conditions, the trees remove the unwanted leaves and re-grow according to the atmosphere, but keep on developing the underlying roots without changing them. A man should also adjust his external behavior according to the situation but keep on developing his inner values by keeping them intact.
सुविचार २८५
*झाडे आपली पानं परिस्थीती नुसार बदलतात पण मूळ मात्र घट्ट ठेवतात*
सभोवतालच्या वातावरणाकडून फक्त आपल्या जीवनोपयोगी साधनेचे नव्हे तर जीवनोपयोगी शिकवणं सुध्दा मिळत असते.
बाह्य परिस्थीती ला सामोरे जाण्यासाठी झाडं आपली गरजेची नसलेली पानं काढून टाकतात अन् वातावरणानुसार पुन्हा पल्लवीत होतात मात्र अंतर्गत दडलेली आधारभूत मुळे मात्र तीच ठेवून त्यांचा विकास करीत राहतात. मनुष्याने सुध्धा परिस्थीती नुसार बाह्य वर्तनाचे समायोजन करावे मात्र अंतर्भूत मूल्ये अढळ ठेवून त्यांचा विकास करीत राहवे.
Thursday, 18 February 2021
Time is the only thing you have. Quote #TM284
Wednesday, 17 February 2021
Diamonds are judged in the dark. Quote #TM283
Tuesday, 16 February 2021
If you cannot change your destiny, change your habits. Quote #TM282
Quote #TM282
*If you cannot change your destiny, change your habits.*
Your habits are the tools of your future creation. Just as you can make beautiful idols using chisel and hammer, you can also make beautiful future using the tools of your habits.
सुविचार २८२
*आपण आपले नशीब बदलू शकत नसल्यास आपल्या सवयी बदला*
आपल्या सवयी म्हणजेच आपल्या भवितव्य निर्मितीचे अवजार. जसा चीन्नी आणि हातोडा वापरून सुंदर मूर्ती तयार करता येते तसेच आपल्या सवयींचे साधन वापरून सुंदर भविष्य घडवता येते.
Monday, 15 February 2021
An intelligent person expects from himself. Quote #TM281
Quote #TM281
*An intelligent person expects from himself.*
The expectation is the desired change. And this arrow of expectation is often stretched just to shoot in the direction of others. First of all, we should check the strength of the string, enhance ourself and give it the strength we need, and make a sincere effort to fulfill this self-expectation before expecting change from others.
सुविचार २८१
*बुद्धिमान व्यक्तीला स्वतः कडून अपेक्षित असतात.*
अपेक्षा म्हणजेच हवा असलेला बदल. आणि अपेक्षेचा हा बाण अनेकदा फक्त इतरांच्या दिशेने सोडण्यासाठीच ताणला जात असतो. प्रथम आपली प्रत्यंचा तपासून पहावी, आपल्या अंगी योग्य ते बळ येण्याकरीता स्वतः ला सर्वोपरी सामर्थ्यवान बनवण्याची अपेक्षा करावी, आणि त्यासाठी प्रामाणिक प्रामाणिक प्रयत्न करावेत.
Sunday, 14 February 2021
असा साजरा केला व्हॅलेंटाईन डे.
He who changes with time, makes progress. Quote #TM280
Quote #TM280
*He who changes with time, makes progress*
Progress is for those who are in motion, those who are living motionless life should not expect progress. Change is the law of nature, and the flexibility of the tendency is the basis of the law of change. Mental stiffness creates obstacles and it doesn't allow to change. So, to look at life from new dimensions, one should always be adaptable.
सुविचार २७०
*जो काळानुसार बदलतो, तोच प्रगति करतो*
प्रगति ही गतिमान असणाऱ्यांसाठी आहे, एकच जगत नीचपित पडून राहणाऱ्यांना प्रगतीची अपेक्षा करू नये. बदल हा सृष्टीचा नियम आहे, आणि मनाची लवचिकता हा त्या नियमाचा पाया. मानसिक ताठरता वेळेनुसार बदलण्यास अडसर निर्माण करते. म्हणून नवीन आयामांतून जीवनाला पाहण्यासाठी नेहमीच बडलाभिमुख राहावे.
Saturday, 13 February 2021
Pursue the best version of yourself. Quote #TM279
Quote#TM279
*Pursue the best version of yourself *
In different aspects, such as family, social, financial, personal, if you make the best contribution, how will it look like?
Create this picture of yours and constantly try to make this best version your reality.
सुविचार २७९
*तुमच्या सर्वोत्कृष्ट अवृत्तीचा पाठलाग करा.*
निरनिराळ्या स्तरावर, जसे कौटुंबीक, सामाजिक, अर्थिक, वैयक्तिक आपण जर आपण सर्वोत्तम योगदान दिल्यास जे चित्र तयार होईल त्या चित्राला सतत डोळ्यासमोर ठेवून कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचा अखंड प्रयत्न सुरू ठेवावा.
Friday, 12 February 2021
Look at the world as a hero. Quote #278
Quote #TM278
*Look at the world as a hero*
We are the heroes on the stage of our lives and also the director. We are playing such important roles from birth, the hero in a movie lives a fake life, they can retake the shot to look like a hero, but you are much better than any filmy hero because you are here to give every shot perfect without any retake. Time moves in one direction.
So, you are a true hero.
सुविचार २७८
*जगाकडे एक हिरो म्हणून पाहा*.
आपल्या आयुष्याच्या रंगमंचावर आपणच हिरो आहोत आणि दिग्दर्शक सुध्दा, इतक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या जन्मापासूनच आपण पेलतो आहोत, एक चित्रपटातील हिरो ला नकली आयुष्य जगायचा असतं, retake घेता येतात, तुम्ही मात्र त्यापेक्षा अनेक पटीने अधिक आहात, एकच take मध्ये सगळं काही परफेक्ट करायचा असतं, वेळ एका दिशेने जात असते. म्हणून तुम्ही खरे हिरो असता.
Thursday, 11 February 2021
If you want to make your family happy, make yourself happy first. Quote #TM277
Quote #TM277
*If you want to make your family happy, make yourself happy first*
No one in the family would like to be in the company of someone who is constantly stressed, discouraged and depressed, but your family members will definitely like to spend time with an enthusiastic and happy person. In order to be happy with yourself, you must first try to be happy, and the simplest way to get rid of stress is to give up the things that are not possible and focus on the things that are possible.
सुविचार २७७
*जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आनंदी ठेवायचे असेल तर प्रथम स्वतः आनंदी राहा*
कुटुंबातील कोणालाही एक अश्या व्यक्तीच्या सहवासात राहायला आवडणार नाही जो सतत्त तणावात, निरुत्साही आणि उदासीन असेल, मात्र एक उत्साही आणि आनंदी व्यक्तीच्या सोबत वेळ घालवायला नक्कीच तुमच्या घरातील सदस्यांना आवडेल. तुमची सोबत आनंदी राहावी यासाठी प्रथम तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करायला हवा आणि तणावापासून मुक्त राहण्याचा सोपा उपाय म्हणजेच ज्या गोष्टी शक्य नाही त्या सोडून देणे आणि शक्य असलेल्या गोष्टीत पूर्णपणे झोकून देणे.
Wednesday, 10 February 2021
Assimilation is separate than just knowing. Quote#TM276
Quote#TM276
*Assimilation is separate than just knowing*
In the process of obtaining knowledge, understanding it, and using the knowledge in life, the level of difficulty increases sequentially.
People who actually use what they learn in life appear to be at the pinnacle of success.
And the rest of the world is full of people who know almost everything.
You decide which group you want to join.
सुविचार २७६
*माहिती असणे म्हणजे आत्मसात असणे नव्हे.*
माहिती मिळवणे, ती आत्मसात करणे आणि तिचा वापर करणे ह्या तिन्ही च्या बाबतीत काठिण्य पातळी क्रमाने वाढत जाते.
शिकलेल्या गोष्टींचा जिवनात प्रत्यक्षात वापर करणारी लोक यशाच्या शिखरावर दिसून येतात.
आणि फक्त माहिती असणारे लोक जगभर भरलेलीच असतात.
आपण कोणत्या गटात सामील व्हायचे हे आपणच ठरवायचे.
Tuesday, 9 February 2021
Instead of waiting for great things to happen, we should try to make them happen. Quote #TM275
Monday, 8 February 2021
The greatest glory is rising every time you fall. Quote#TM274
Sunday, 7 February 2021
पायवाटेवर-१
मंजिल मिल ही जायेगी भटकते ही सही,
गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं.
कधीतरी वाचलेल्या ह्या ओळी प्रत्यक्षात अनुभवल्या तेही शब्दशः अर्थाला तंतोतंत जुळू शकणाऱ्या प्रसंगाने.
वर्षभरा पूर्वी धावण्याची आवड निर्माण झाली अन फारसे न धावणाऱ्याचा अल्ट्रा रनर केंव्हा झाला कळलेही नाही.
फार मोठी झेप घेऊन मोठी मंजिल प्राप्त केलीये असा हा प्रसंग नाहीये, गोष्ट एका लहानश्या लक्ष्य प्राप्तीची आहे,
पण मनाशी ठरवलेली लहानशी लक्ष्य पूर्तीहि आनंदाचा एक क्षण नक्कीच देऊन जाते, असे अनेक क्षण मिळून एकंदर आयुष्याची परिभाषा आपल्याला उमगत असते. `
रविवार आला अन पूर्वी कधीही न गेलेल्या डोंगरराईतून वाट शोधत कसाबसा कुठेतरी टेकडीवर जाऊन पोहोचलो, अन कळले कि इथे तर अनेक डोंगररांगा आहेत अन मला घरातून दिसणारं झाड मात्र दूरदूरवर कोठेही नाही, म्हणतात न दुरून डोंगर साजरे, मात्र पूर्वी पासूनच डोंगरदऱ्यांतून फिरण्याचा अनुभव असल्यामुळे, नवीन वाट बनवत आणखीन काही टेकड्या पालट्या घातल्या, एव्हाना संपूर्ण अंगावर निरनिरळ्या झुडपांनी अनेक प्रकारच्या रेघोट्या ओढल्या होत्या, अन बऱ्यापैकी परागकण कपड्यांवर चिकटून माझ्या सोबतच फिरत होते.
गुगल मॅप धुंडाळण्या पासून ते तार्किक अंदाज लावण्या पर्यंत सर्व काही केले, मात्र डोंगराच्या कुशीत कुठेतरी दडी मारून बसलेला तो वृक्ष काही सापडेना, एव्हाना उन्ह चांगलेच तापू लागले, सोबत आणलेले पाणी केव्हाच पोटात जाऊन घामाच्या थेंबातुन गळूनहि गेले होते. जवळपास ६-७ किलोमीटर धावायचं असं ठरलेलं मात्र प्रत्यक्षात १५ किलोमीटर पेक्षा जास्त अंतर धुंडाळण्यामुळे पार झालेले. पुन्हा लवकरच नव्या दमाने येथे यायचे आणि जागेचा योग्य अंदाज लावून नक्कीच त्या दुरून खुणावणाऱ्या वृक्षाला स्पर्श करायचेच असे ठरवून परतलो.
त्या नंतर गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली चे ६० किलोमीटर चे अंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त धावण्याच्या सरावात गुंतून गेलो, अन काही दिवस पुन्हा डोंगरात शिरलोच नाही.
मात्र काहीदिवसांतच कल्याण डोंबिवली रनर्स यांच्या तर्फे आयोजित एक ग्रुप रन मध्ये सहजच सहभागी झालो, त्या दरम्यान अंबरनाथ- बदलापूर हायवे वर धावत असताना, अचानक रस्त्याच्या बाजूला दूरवर एक टेकडी दिसली अन रस्ता सोडून पुन्हा जंगलाच्या दिशेने धाव घेतली, थोड्याच वेळात टेकडी पादाक्रांत झाली आणि पलीकडील एक आणखीन उंच टेकडी खुणावू लागली, तिलाही सरकरण्याच्या इच्छेपोटी पुढे धावत असताना अचानक साक्षात्कार व्हावा असे उमगले कि काही दिवसांपूर्वी ज्या डोंगरात शिरलो होतो त्याचीच हि विरूद्ध बाजू आहे अन अपूर्ण राहिलेला तो वृक्षशोध पुन्हा नव्याने सुरु करण्याची उत्कट इच्छ बळावली,पुन्हा उभी धाव घेतली, 'भलं' हे पक्षी अभयारण्य असून इथे शहरी गर्दीपासून दूर असलेल्या विविध मनमोहक पक्ष्यांचे वास्तव्य अनुभवास येते, त्या मोहक पक्ष्यांच्या सोबतीत जवळपास तासभर शोध घेतल्यावर एका झुडुपामागून अचानक प्रकट झालेल्या त्या, हो त्याच वृक्ष राजाचे दर्शन झाले, आणि इच्छा पूर्तीच्या आनंदाने तो क्षण भरून गेला, कुणीतरी जुना सवंगडी भेटावं असे त्या वृक्ष स्पर्शाने जाणवले, काहीवेळ तेथे एकांतात घालवून पुन्हा हायवे वर परतलो अन ग्रुप रनर्स सोबत त्यांच्या परतीच्या वाटेवर सामील होऊन पुन्हा गर्दीचा एक भाग होऊन गेलो.
एकंदर काय तर, गोष्ट, स्वप्न, लक्ष्य उद्देश, लहान असो किंवा मोठे एकदा का तुमच्यात उत्कट इच्छा निर्माण झाली कि क्षमता आणि वाट आपोआपच दिसू लागते, अवघड असली तरी त्यावाटेवर चालण्याचं धाडस करावं,आणि अगदी आपल्याही नकळत आपलं मन आपल्याला योग्य दिशेने नेऊ लागते, फक्त इतकंच करायचं कि आपल्या अंतर्भूत असलेल्या नैसर्गिक ऊर्जेत प्रवाही राहायचं, अवरोधात अडकून पडायचा नाही, आपलं मन आणि जीवनउर्जा आपल्याला योग्य स्थानी घेऊन जाण्यास समर्थ आहेत.
Play the game until you earn the mastery you desired. Quote#TM273
Saturday, 6 February 2021
No matter how intense the desire to achieve the goal, it takes hard work to reach it. Quote #TM272
Quote #TM272
*No matter how intense the desire to achieve the goal, it takes hard work to reach it.*
It is difficult to achieve any goal without enough effort, passion gives energy to our efforts but using this energy we can make the concept a reality only by participating in the work. So there is no alternative but diligence.
सुविचार २७२
*ध्येय मिळवण्याची ईच्छा कितीही उत्कट असली तरीही तिथपर्यंत पोहचण्यासाठी मेहनतच करावी लागते.*
पुरेसे प्रयत्न न करता कोणतेही ध्येय गाठणे अवघड, उत्कट इच्छा आपल्या प्रयत्नांना उर्जा देण्याचे काम करते, ह्या ऊर्जेचा वापर करून संकल्पनेला प्रत्यक्ष रूप देण्याचे काम मात्र आपल्याला कार्यात सहभाग घेऊनच करता येते. म्हणूनच मेहनती शिवाय पर्याय नाही.
Friday, 5 February 2021
No involvement means no great results. Quote #TM271
Quote #TM271
*No involvement means no great results.*
Involvement means immersing in the work. Any great task can only be accomplished by such involvement. If there is no involvement in the work means you are associated with a job just to fulfill some necessary aspects of life therefore it's difficult to actively participate in the endeavor. When we recognize our true essence, we automatically participate in the right action and achieve the best results.
सुविचार २७१
*सहभाग नाही तर कोणतेही चांगले परिणाम मिळणार नाहीत*
सहभाग म्हणजे कार्याशी एकरूप होणे. कोणतेही महान कार्य एकरूप होऊनच पूर्ण करता येवू शकेल. जर कार्याशी एकरूप होता येत नसेल तर त्या कार्याशी आपला संबंध फक्त वरवरचा किंवा एक गरज म्हणून स्थापित झाला आहे. आणि जीवनाशी निगडित काही गोष्टींची गरज पूर्ण करण्यासाठी हाती घेतलेल्या कार्याशी एकरूप होणे तसे अवघड. आपण स्वतः ला नीट ओळखू लागलो की आपोआपच योग्य कार्यात सहभागी होऊ लागतो अन चांगला परिणाम साधता येणे शक्य आहे.
Thursday, 4 February 2021
Good decisions are taken based on a clear vision of life. Quote #TM270
Wednesday, 3 February 2021
If the same type of mistake is happening repeatedly, then its root is hidden in the attitude. Quote #TM269
Tuesday, 2 February 2021
Learn the secrets of life by yourself. Quote#TM268
Quote#TM268
*Learn the secrets of life by yourself*
We should not label anything based on firm opinions expressed by others. One corner to look at everything should always be kept open and one should try to learn the secret of everything without putting any assumptions, prejudices, and opinions. Only then will we be able to unravel the mystery of many aspects of life. Life could be understood anew through this way.
सुविचार २६८
*स्वत: हून जीवनाची रहस्ये जाणून घ्या*
कोणत्याही विषयावर इतरांनी व्यक्त केलेले मत पक्कं बनवून त्याला एकच अर्थाचं लेबल लावू नये. त्या विषयाकडे पाहण्याचा एक मार्ग नेहमी मोकळा ठेवावा आणि त्या मार्गावर कोणतेही गृहितक, पूर्वग्रह आणि मत न ठेवता त्या विषयातील रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. असे करूनच जीवनातील अनेक विषयांतील गूढ आपल्याला उमगत जाईल. प्रत्येक विषयातून आयुष्य नव्याने समजू लागेल.
Monday, 1 February 2021
The development in human awareness will shape the future of the world.Quote #TM267
Quote #TM267
*The development in human awareness will shape the future of the world*
Awareness is the ability to acquire the understanding to do things that are good for society and us or to see things in their original form.
There is a great need for awareness in the world today because the advanced technological and social power that today's generation has obtained has never existed before, so awareness will determine the future of the world.
सुविचार २६७
*मानवी जागरूकतेचा विकास साधूनच जगाचे भविष्य घडवता येवू शकते.*
जागरूकता म्हणजे नेमके काय तर, समाजाच्या साठी आणि आपल्यासाठी ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या करण्यासंबंधी ज्ञान प्राप्ती होणे किंवा गोष्टीना त्यांच्या मूळ स्वरूपात पाहता येण्याची क्षमता म्हणजेच जागरूकता.
आज जगात जागरूकता असण्याची फारच गरज आहे कारण जी अद्ययावत तांत्रिक आणि सामाजिक शक्ती आजच्या पिढीला प्राप्त आहे ती आजपर्यंत कुणालाही नव्हती, म्हणून जागरूकता जगाचे भविष्य ठरवेल.
Design the character
You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...
-
एखाद्या प्राण्याला आरश्या समोर ठेवल्यास त्याची आश्चर्यजनक वागणूक काय असेल हे आपणास वेगळे सांगावयास नको, अश्या प्रकारचे कित्येक व्हिडिओस...
-
वरील चित्र लहानां पासून मोठ्यानं पर्यंत कुणालाही दाखवून यांतील सद्गृहस्थ किंवा Gentlemen कोण असे विचारल्यास? नक्कीच अधिकाधिक लोक, डावीकडील ...
-
संदर्भ लागल्या शिवाय आपल्याला गोष्टींची उकल होणे जरा अवघडच. अचानक कुणीतरी व्यक्ती आपल्याला रस्त्यावर भेटते, आपल्याशी बोलते मात्र ती व्यक्ती ...