Saturday, 31 October 2020

Every day push yourself a little further. Quote #TM175

Quote #TM175

*Every day push yourself a little further*

Sometimes we settle down into our lives and unknowingly our journey almost stops when we get comfortable in some important area of ​​life.  Life becomes stagnant and the pace of growth slows down due to a lack of daily progress.  Therefore, we should consciously try to take ourselves to a new level every day and let the human potential be fully evolved.

सुविचार १७५

*दररोज स्वत:मध्ये थोडी प्रगती करा*

कधीकधी आपण आपल्या नकळतच आपल्या आयुष्यात स्थिरावतो, आयुष्यात काही महत्त्वाच्या क्षेत्रात आरामदायक अवस्था प्राप्त झाली की आपला प्रवास जवळपास थांबतो. आयुष्य स्तब्ध होते आणि दैनंदिन विकासाच्या अभावी प्रगतीचा वेग मंदावते. त्यामुळेच जाणीवपूर्वक स्वतःला रोज थोडा नवीन पायरीवर घेवून जाण्यास प्रयत्नशील राहा आणि मानवास प्राप्त क्षमतेचा पुरेपूर विकास होऊ द्या.

Friday, 30 October 2020

Enjoy small accomplishments they make us feel energetic. Quote #TM174

Quote #TM174

*Enjoy small accomplishments they make us feel energetic.*

Celebrating after overcoming obstacles in the way of reaching any big and distant goal will definitely make your journey more exciting, this enthusiasm acts as fuel for the next mile and it makes a hard path a pleasures quest. Basically, the secret behind every success in life is your enthusiasm, If you are enthusiastic, you will obtain the required qualities and abilities automatically.

सुविचार १७४

*लहान लहान कार्य पूर्तीचा आनंद घ्या ज्यामुळे आपल्यात उत्साह संचारेल.*

कोणत्याही मोठ्या आणि दूरवरच्या ध्येया पर्यंत पोहोचताना वाटेमध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर विजय मिळवल्यानंतर तो साजरा करण्यामुळे ध्येयप्राप्तीच्या मार्गावरील आपला प्रवास नक्कीच उत्साहपूर्ण बनतो, हा उत्साह पुढील प्रवासासाठी इंधन म्हणून कार्य करतो आणि खडतर प्रवास ही पुढे सुखकर वाटू लागतो, मुळात उत्साही मन हेच आयुष्यातील प्रत्येक यशा मागचे गुपित आहे, उत्साही असल्यास गरजेचे गुण आणि क्षमतेची साथ आपोआपच मिळू लागतात.

Thursday, 29 October 2020

The universe is filled with endless opportunities. Quote #TM173

Quote #TM173

*The universe is filled with endless opportunities.*

Living life is also an exploration of a possibility, the possibilities are coming into existence today
because of the constant decisions that we are making to take action in all areas of life either knowingly or unknowingly. Sometimes we do it consciously and sometimes it just happens. Similarly, there are so many possibilities and opportunities that exist in this mysterious universe, it is up to us to turn them into opportunities with our conscious efforts, for that, all we need to do is concentrate and execute our decision to bring that into existence without losing focus even for a moment.

सुविचार १७३
*ब्रह्मांड अनंत संधींनी भरलेले आहे.*

जीवन जगणे ही सुध्दा एक शक्यताच आहे, कळत किंवा नकळत घेतल्या गेलेल्या निर्णय आणि त्यांच्या  अमलबजाणीमुळे जी आज अस्तित्वात आली आहे,कधी कधी आपण हे सचेत जाणीव ठेवून करतो तर कधी ते सहजच होऊन जाते. अश्या अनेक शक्यता गूढ वैश्विक प्रतलात अस्तित्वात असून त्यांचे संधीत रूपांतर करणे आपल्या हातात असते, फक्त गरज असते ती क्षणा साठी ही ना भरकटता एकाग्र होऊन निर्णयाची अमलबजाणी करण्याची.

Wednesday, 28 October 2020

We can become inspired to shape a higher, more ideal future, and when we do, miracles happen. Quote #TM172

Quote #TM172

*We can become inspired to shape a higher, more ideal future, and when we do, miracles happen.*


When we wake up in the morning we have two choices, spend the day as usual or explore new horizons by making ourself a source of inspiration and try our limitless potential, don't miss the opportunity to shape the future, believe in yourself and follow the path, magical miracles will surely happen.


सुविचार १७२
*आपण एका उच्च, अधिक आदर्श भविष्याच्या घडवण्यासाठी प्रेरित होऊ शकतो आणि जेव्हा आपण असे करतो तेव्हा चमत्कार घडतात*

सकाळी उठल्यावर आपल्याकडे दोन पर्याय असतात, नेहमीप्रमाणे दिवस घालवावा किंवा स्वतः ला प्रेरणा स्त्रोत बनवून नवनवीन क्षितिजा ना गवसणी घालावी आणि आपल्यातल्या अमर्याद क्षमता आजमावून पहावी, भविष्य घडवण्याची संधी गमावण्याला अर्थ नाही, स्वतः वर विश्वास ठेवून मार्गक्रमण करूयात, जादुई चमत्कार नक्कीच घडू लागतील.

Tuesday, 27 October 2020

Keep the mind free of resistance and open to exciting new possibilities. Quote #TM171

Quote #TM171

*Keep the mind free of resistance and open to exciting new possibilities.*

When we learn something new, neurological bonds are formed in the brain. Gradually, as we nurture it, that connection becomes more and more inflexible, and then it becomes our habit. This habit can be good or bad.  The mind never wants to give up the habit because the habit saves the body energy and the body and the mind stay into.  comfort zone.  But it is the time that separates the winners from the rest of the crowd.  A person who can break the shackles of old habits by developing a new habit and mindset can discover new possibilities and even further he can win the race.

सुविचार १७१

*मनाला प्रतिकार मुक्त आणि रोमांचक नवीन शक्यतांसाठी तय्यार ठेवा.*

जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो तेव्हां मेंदूमध्ये चेतपेशिंचे बंध तयार होतात, हळूहळू जेव्हा आपण त्याचे पोषण करतो तेव्हा ती जोडणी अधिकाधिक अलवचिक बनते आणि मग ती आपली सवय बनते, ही सवय चांगली अथवा वाईट ही असू शकते, मग अशी सवय बदलायची झाल्यास त्या साठी मनाचा प्रतिरोधक सुरू होतो, मनाला सवय सोडण्याची इच्छा होत नसते कारणं सवयीन मुळे शारीरिक ऊर्जेची बचत झाल्यामुळे शरीराला आणि मनाला आरामदायक अवस्था प्राप्त होते. परंतु हीच वेळ विजेत्यांना उर्वरित गर्दीपासून विभक्त करते.  जो व्यक्ती एखादी नवीन सवय आणि मानसिकता विकसित करुन जुने सवयींचे बंधन तोडू शकतो तो नवीन शक्यता शोधून काढू शकतो आणि पुढे शर्यत जिंकूही शकतो.

Monday, 26 October 2020

Learn to see every new challenge as a new opportunity. Quote # TM170 *

Quote # TM170

 *Learn to see every new challenge as a new opportunity.*

When we were born, we faced numerous challenges even before coming into this world, which signifies, unforgettable happening does not happen without facing challenging situations, challenges are an integral part of life from birth itself.
To live life is to face innumerable challenges.
Regardless of every challenge, there is an amazing opportunity hidden in it, by using which life blossoms.
The challenging path you have chosen will definitely lead you to a great opportunity, so instead of panicking over the challenge, we should try to use the opportunity to have a new feather of success in our cap.

सुविचार १७०

*प्रत्येक नवीन आव्हानांना नवीन संधी म्हणून पहायला शिका.*

जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा असंख्य आव्हानांना सामोरे जात आपण ह्या जगात अवतरलो म्हणजेच अविस्मरणीय घटना आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे गेल्या शिवाय घटत नाही, आवाहने ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे अगदी जन्मापासूनच.
जीवन जगणे म्हणजेच असंख्य आवाहनाना सामोरे जाणे मात्र प्रत्येक आवाहना मागे एक अप्रतिम संधी ही दडलेली असते जिचा वापर करून जीवन खुलते.
तुम्ही निवडलेला अवाहनात्मक मार्ग नक्कीच एका मोठ्या संधी कडे घेऊन जाणार आहे त्यामुळे आवाहनाला घाबरून स्वतः चे मानसिक खच्चीकरण करण्या पेक्षा मिळालेल्या संधीचा वापर करून आपल्या आयुष्यात यशाचा नवीन तुरा खोवण्याचा प्रयत्न करावा.

Sunday, 25 October 2020

A high degree of absolute involvement is the method of bringing phenomenal possibility into existence. Quote #TM169


Quote #TM169

*A high degree of absolute involvement is the method of bringing phenomenal possibility into existence.*

The ability to involve 'absolutely' is a gift for mankind, it makes the impossible possible.

Any ordinary person can make anything extraordinary with his absolute devotion towards it, subsequently, other skills and qualities that are needed to make it happen will automatically evolve.

We are anytime free to involve ourselves in anything we wish to achieve and experience unimaginable success.

सुविचार १६९

*विलक्षण संभाव्यता अस्तित्त्वात आणण्याची एक पद्धत म्हणजे संपूर्ण मन गुंतवणे.*

मन ' संपूर्ण ' गुंतवू शकण्याची योग्यता म्हणजेच मानवजातीसाठी लाभलेले एक वरदानच आहे, त्यामुळे अशक्य गोष्ठी सुध्दा शक्य करता येतात.

कोणतीही सामान्य व्यक्ती एखाद्या गोष्ठी मध्ये संपूर्ण मन गुंतवून ती गोष्ट विलक्षण बनवू शकते, नंतर असे घडवण्यासाठी आवश्यक असलेली इतर कौशल्ये आणि गुण आपोआप विकसित होतील.

आपण कधीही आपल्याला जे काही हवे असेल त्यात मन गुंतवून अकल्पनीय यशांचा अनुभव घेण्यासाठी मुक्त आहोत.

Saturday, 24 October 2020

Every morning dress for success in body, mind, and spirit . Quote #TM168

Quote #TM168
*Every morning dress for success in body, mind, and spirit .*

The new rays of sunrise have brought us new hope and joy.  Get ready for a happy life by giving up all the old guilt, anger, hatred, etc. In your mind, your energy body is connected with the creator and this infinite flow of the infinite energy of nature is flowing and reflecting from your physical and mental body like sun rays.  Experience it and get ready for a happy life.

सुविचार १६८
*यशस्वी होण्यासाठी प्रत्येक सकाळी शरीर, मन आणि उर्जा यांना तय्यार करा*

सूर्योदयाची नवीन किरणे आपल्यासाठी नवीन आशा आणि उल्हास घेऊन आली आहेत. मनातली सगळी जुनी जळमटे, उणी  दुणी, द्वेष आदी षड्रिपुनचा त्याग करून एका आनंदी जीवनासाठी तय्यार व्हा, आपले उर्जाशारिर हे त्या सृष्टाशी जोडलेले आहे आणि निसर्गाच्या ह्या असीम ऊर्जेचा निरंतर प्रवाह आपल्या भौतिक आणि मानसिक शरीरातून सूर्यकिरण प्रमाणे वाहत आहे. त्याची अनुभूती घ्या आणि प्रसन्न जीवनासाठी सज्ज व्हा.

Friday, 23 October 2020

Release all limiting beliefs about your ability. Quote #TM167


Quote #TM167

*Release all limiting beliefs about your ability.*

Primarily it is we who decide our abilities.
The world will see you in the same way you are looking at you.
If you set up your image in a limited and inadequate form in your mind, then your worth will be determined accordingly in your own mind and the minds of others thereafter your mind will start to believe that your abilities are limited.
So let's challenge our limited self which has been preserved for years and let the new door of unparalleled change open.

सुविचार १६७

*आपल्या क्षमतेबद्दल सर्व मर्यादित दृष्टीकोन बदलला.*

सर्वप्रथम आपली योग्यता कोण ठरवतं असेल तर ते आपण स्वतःच.  आपली तीच प्रतिमा जगाला दिसू शकते जी आपण स्वतः ला दाखवतो आणि आपली प्रतिमा आपण जर मर्यादित आणि अपुऱ्या स्वरूपाची मनात जतन करून ठेवली असेल तर आपली योग्यता त्यानुसारच स्वतः च्या आणि इतरांच्या मनात निर्धारित होऊ लागेल आणि आपल्या क्षमता मर्यादित असल्याचा स्वतः लाच विश्वास वाटू लागेल. त्यामुळे वर्षानुवर्षे जतन करून ठेवलेल्या आपल्या मर्यादित प्रतिमेला आवाहन द्या आणि अप्रतिम बदलाची नवी द्वारे खुली होऊ द्या.

Thursday, 22 October 2020

Your focus is a powerful tool to achieve any goal you desire. Quote #TM166

Quote #TM166

*Your focus is a powerful tool to achieve any goal you desire*

The skill of concentrating one's mental, emotional, and physical energy can take him to new horizons of success in life.
The concentrating mental energy is the source of actual action through which new possibilities can be created.

सुविचार १६६
*आपणास हवे असलेले कोणतेही लक्ष्य साध्य करण्याची शक्ती आपल्या एकाग्रतेत आहे*

आपली मानसिक, भावनिक, शारीरिक ऊर्जा केंद्रित करण्याचे कसब ज्याला जमले तो आयुष्यात यशाची नवनवीन क्षितिजे पार करू शकतो, लक्ष आणि मानसिक ऊर्जा चे केंद्रीकरण म्हणजेच प्रत्यक्ष कृती चे उगम स्थान आहेत ज्याद्वारे नवनवीन शक्यता अस्तित्वात आणता येवू शकतात

Who will stop the climate change?

The three biggest threats to mankind are nuclear war, mutated viruses, and climate change.

There is a mechanism in place to stop the nuclear war and it seems to be being followed by human beings to date.  On the other hand, the whole world is affected today due to the lack of any competent mechanism to stop the global pandemic.

When it comes to climate change, the system does exist, but it doesn't seem to be doing well.  After allotting carbon budget to the nations in Paris agreement, some of the leading nations are seen withdrawing from it. It is the responsibility of every nation to emit the least amount of carbon into the atmosphere, according to the carbon budget allotted to them but lowering carbon emission is curbing the growth and development of the industry. Because of which such plans exist only on paper.

In today's fierce competition, no nation will be able to harness its economy to cope with the global climate.  That's what is happening.  Developed nations are seen rejecting climate change itself. Now, this issue is viewed not only as an existential threat to mankind but it has now become an environment against the economy, and of course, the economy is going to win for a certain period but in the long run, the picture will be reversed and we will miss the opportunity to overturn the situation again, more than 600 living species have been completely extinct in the last 100 years due to human activity and at least 1 million species are on the verge of extinction today. This number is likely to increase in the next few years.  The global temperature has been increased by 0.82. degree Celsius in the last 100 years, over time, the global temperature increase will be 1.5 degrees Celsius and human civilization will have to face unimaginable consequences.

The declining groundwater levels in some cities and the consequent water shortages are just the beginning.  The melting of polar ice caps will have adverse effects on many levels, including rising sea levels that will submerge coastal cities and reintroducing viruses that have been buried under polar ice for millions of years, even from the time of dinosaurs.  It is impossible to suppress a virus that is not known to mankind yet.  Today we are experiencing it as a live example, if we do not learn something from it, then nature may not give us a chance to learn again 30 years later.

These conclusions are drawn after carefully studying the whether but are ignored by the common man because the effect is not immediately apparent at this moment and our systems are established in such a way that if it is not troubling in 'now moment' then become reluctant about it, why should I worry about the consequences which will affect after 30-50 years?  You will be blamed for carrying such an attitude when your children and grandchildren will go through unbearable suffering caused by climate change.

The current generation has the moral responsibility to stop and reverse climate change if possible, the next generation may not have enough time to do it and the previous generation has not done enough.

So it will not work by turning a blind eye.  There is no need for a report from any international organization to observe whether climate change is real or not. We are all experiencing changes in seasons. There are vivid examples of cities like Chennai and some cities in South Africa which suffered due to a decrease in groundwater, increasing hurricanes and the rate of virus mutations can't be ignored.  No, but it seems that we have deliberately chosen to ignore it.  The consequences will be felt by the next few generations and you will be responsible for it.

Each of us should study for ourselves and try to reduce our part of emissions of carbon or other harmful gases and substances, as well as implement more environmentally friendly things, such as planting trees.  There are many simple and doable solutions available on the Internet today and on the websites of international organizations like the UN, everyone should take the initiative to examine how you can contribute.  The small contribution of each of us can certainly bring positive results, no government or nation can fulfill this responsibility alone as the big responsibility of meeting our needs is on the national and local governments, so they may be hindered in making their best contribution. We should not pass this responsibility only to the government but we should try to make it our responsibility.

Find out for yourself what you can do without waiting for anyone to push you, your children and grandchildren will surely be thankful to you for contributing a share to reduce the speed of climate change.

https://www.un.org/en/actnow/resources.shtml

हवामान बदलांना कुणी थांबवावे?


मानवजाती साठी सर्वात मोठे ३ धोके म्हणजेच, अणु युद्ध, उत्परीवर्तीत विषाणूची साथ,आणि हवामान बदल.

यातील अणु युद्ध थांबवण्यासाठी सक्षम यंत्रणा अस्तित्वात आहे आणि तिचे आजतागायत मानवाकडून पालन हि होताना दिसत आहे. याउलट जागतिक स्थरावर साथीचे रोग थांबवण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणे अभावी आज संपूर्ण जग प्रभावित झाले आहे.

हवामान बदललाविषयी सांगायचे झाल्यास, यंत्रणा अस्तित्वात तर आहे मात्र तिचे पालन तितकेसे होताना दिसत नाही. पॅरिस  करारा अनुसार जागतिक राष्ट्रांना कार्बन बजेट दिल्या नंतर ही अनेक बडी राष्ट्रे यातून हात काढून घेताना दिसून येतात. कारण, मुळात मिळालेल्या कार्बन बजेट च्या अनुसार प्रत्येक  राष्ट्राने कमीत कमी कार्बन वातावरणात सोडणे जबाबदारीचे बनते, आणि कमी कार्बन उत्सर्जन म्हणजेच उद्योग धंद्याच्या वाढी आणि विकासाला चाप बसवणे. आजच्या अटीतटीच्या स्पर्धेत कोणतेही राष्ट्र जागतिक हवामान सांभाळण्यासाठी स्वतःची अर्थव्यवस्था पणाला लावू शकणार नाही, आणि हेच घडते आहे. बडी राष्ट्रे वातावरणीय बदलांचा अस्वीकार करताना दिसत आहेत, हे प्रकरण मानवजातीच्या अस्तिस्त्वा विषयी मर्यादित न राहता, ते आता अर्थव्यवस्था विरूध्द वातावरण व्यवस्था असे पहिले जात आहे, नक्कीच या लढाईत अर्थव्यवस्था ठराविक कालावधी साठी जिंकणार आहे. मात्र दीर्घ काळात चित्र उलटलेले असेल आणि पुन्हा मागे वळण्याची संधी आपण गमावून बसलेलो असू. जवळपास ६०० पेक्षा जास्त जीव प्रजातींचे गेल्या १०० वर्षात पूर्णपणे उच्चाटन झाले असून कमीत कमी १० लाख प्रजाती आज उच्चाटन होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत, पुढील काही वर्षात हा आकडा वाढण्याची फार शक्यता आहे, गेल्या १०० वर्षात पृथ्वीचे तापमान ०.८२ सेल्सिअने वाढले असून, नजीकच्या काळात ही वाढ १.५ सेल्सिअस इतकी असेल आणि ह्या तापमान वाढी मुळे अकल्पित परिणामांना सामोरे जावे लागेल.

काही शहरांमधील खालावलेली भूजल पातळी आणि त्यामुळे पाण्यासाठी होणारी वणवण ही सुरुवात आहे. ध्रुवीय क्षेत्रातील वितळणाऱ्या बर्फामुळे तर अनेक स्थरावर विपरीत परिणामांना सामोरे जावे लागेल, ज्यात समुद्राची वाढलेल्या पातळी मुळे किनाऱ्या वरील शहरे पाण्याखाली तर जातीलच पण लक्षावधी वर्षांपासून, अगदी डायनासोर च्या  वेळेपासून जे विषाणू ध्रुवीय बर्फाखाली सुप्तावस्थेत गाडले गेलेले आहेत ते पुन्हा वातावरणात येतील आणि मानवी प्रतिकार क्षमतेला आजतागायत माहितीही नसलेल्या विषाणूचा प्रतिकार करणे अशक्यच. आज याचे जिवंत उदाहरण आपण पाहतोय, यातून जर काही शिकू शकलो नाही तर पुढील ३० वर्षानंतर निसर्ग कदाचित शिकण्याची संधी देणार नाही.

हवामानाचे बारकाईने अध्ययन केल्या नंतर काढेलेले हे निष्कर्ष, सामान्य माणसाकडून दुर्लक्षित केले जातात, याचे कारण असे आहे की, त्याचा परिणाम लगेच ह्या क्षणी दिसत नाही, आणि आपली व्यवस्था अशी प्रस्थापित आहे की ज्यात ' ह्या क्षणाला' जर काही त्रास होत असेल तरच त्या कडे लक्ष्य पुरवले जाते, मग ३० -५० वर्षा नंतर होणाऱ्या परिणामांची मी का चिंता करू? तुमची मुलं आणि नात यांना होणाऱ्या असह्य त्रासाबद्दल तुमचा हाच दृष्टीकोण दोषी असणारा आहे. आजच्या पिढीकडे वातावरणीय बदलांना थांबवण्याचे आणि शक्य झाल्यास उलट करण्याची नैतिक जबाबदारी आपोआपच आली आहे, पुढील पिढीला ते काम करण्या इतपत वेळ कदाचित शिल्लक नसेल आणि आधीची पिढी त्या करिता पुरेसे प्रयत्न करू शकली नाहीये.

त्यामुळे डोळेझाक करून चालणार नाही. वतावरणीय बदल हे खरे की खोटे हे पाहण्यासाठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालाची गरज उरली नाहीये, ऋतुमानात झालेले बदल आपण सर्व अनुभवतोय, भूजल पातळी खालावल्यामुळे शुष्क पडत चालली चेन्नई सारखी आणि साऊथ आफ्रिकेतील काही शहरे यांची ज्वलंत उदाहरणे आहेत, वादळनच्या संख्येत झालेली वाढ आणि अनेको विषाणूंचे होणारे उत्परीवर्तन काही लपून राहिले नाहीत मात्र जाणूनबुजून आपण त्याकडे दुर्लक्ष करण्याचां  पर्याय निवडलेला दिसून येतो. ज्याचे परिणाम पुढील काही पिढ्यांना भोगावे लागतील आणि त्यासाठी जबाबदार असू आपण.

आपण प्रत्येकाने स्वतः अभ्यास करून आपल्या कडून कार्बन किवा इतर विघातक वायूंचे आणि पदार्थांचे उत्सर्जन कमीत कमी होईल या साठी प्रयत्न करायला हवा, तसेच अधिकाधिक वातावरण पोषक गोष्टी अमलात आणायला हव्यात,जसे झाडे लावणे आणि जगवणे. अनेक सोपे आणि करण्यायोग्य उपाय आज इंटरनेट वर आणि UN सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत, ते तपासून कोणत्या प्रकारे आपल्याला योगदान देता येईल याची पाहणी प्रत्येकाने पुढाकार घेऊन करावी. आपल्यातल्या प्रत्येकाने लहान योगदान दिल्यास नक्कीच सकारात्मक परिणाम साधता येईल, ही जबाबदारी कोणतेही सरकार किंवा राष्ट्र एकट्याने पूर्ण करू शकणार नाही कारण तुमच्या आमच्या गरजा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी ही राष्ट्रीय आणि स्थानिक शासनावर आहे, त्यामुळे सर्वोत्कृष्ट योगदान देताना त्यांना अडथळे येवू शकतात, म्हणूनच, एकट्या सरकार वर ही जबाबदारी न सोडता मुख्यतः ती आपली जबाबदारी म्हणून आपण प्रयत्न करायला हवा.

कोणाची ही वाट न पाहता या समस्येवर आपण आपल्या परीने काय करू शकतो याचा स्वतः शोध घ्यावा, तुम्ही दिलेल्या योगदान बाबत तुमची मुले आणि नातू नक्कीच तुमचे आभारी असतील.

https://www.un.org/en/actnow/


Wednesday, 21 October 2020

Open-mindedness enables us to explore new avenues to success. Quote #TM165

Quote #TM165

*Open-mindedness enables us to explore new avenues to success.*

Open-mindedness is the adoption of new ideas and perspectives.  One should adopt changes as per the requirements of the time and occasion without getting bogged down in some traditional practices.
In today's changing times, the path to success is open only to those who have embraced change and free thought.

सुविचार १६५

*खुल्या विचारसणीमुळे आपण यशाचे नवीन मार्ग शोधण्यास सक्षम होतो.*

मुक्त विचारसरणी म्हणजे नवनवीन कल्पना आणि दृष्टीकोन यांचा स्वीकार करणे. ठरावीक परंपरागत भूमिकेत अडकून न राहता काळा नुरूप आणि प्रसंगानुरूप बदल अंगीकारणे.
आजच्या बदलत्या काळात यशाचा मार्ग त्यांच्यासाठीच खुला होतो ज्यांनी बदलाभिमुख वृत्तीची जोपासना करून मुक्त विचाराना स्वीकारले आहे.

Tuesday, 20 October 2020

Everyday accomplish everything you set out to do. Quote #TM164

Quote #TM164

*Everyday accomplish everything you set out to do.*

A daily routine is a big weapon, the one who uses this weapon properly can definitely stay ahead.  Completing most of the scheduled work brings happiness and we can enjoy it every day, further following the daily routine will allow us to enjoy great joy by making us able to accomplish great goals.  Therefore, we should try our best to complete the daily tasks that we plan.

सुविचार१६४

*दररोज आपण ठरविलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करा.*

दिनचर्या हे एक फार मोठे शस्त्र आहे, ह्या शस्त्राचा सुयोग्य वापर करणारा नक्कीच अग्रेसर राहू शकतो. ठरवलेली दिनचर्या बऱ्यापैकी पूर्ण करण्यामुळे गोष्ठी पूर्णत्वास नेल्याचा आनंद मिळतो आणि तो आपण दररोज उपभोगू शकतो. आणि त्यायोगे पुढे मोठी ध्येये गाठल्याचा मोठा आनंदही प्राप्त होऊ शकतो. म्हणून ठरवलेली रोजची कामे पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करायला हवा.

Monday, 19 October 2020

Stay committed to developing the habits needed to live the desired life. Quote #TM163

Quote #TM163

*Stay committed to developing the habits needed to live the desired life.*

Our habits are the most important part of our life, rather life is fully occupied by habits.
Such an important aspect needs to be developed consciously and properly from childhood, after reaching maturity, self-discipline and perseverance are required to bring about change in habits. Afterward, necessary habits can be developed by cultivating both these qualities to live the desired life.

सुविचार १६३

*इच्छित जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयी लावून घेण्यासाठी वचनबध्द रहा.*

आपल्या सवयी ह्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहेत. संपूर्ण जीवन सवयीने व्यापलेले असते.
इतक्या महत्त्वाच्या घटकाचा लहानपणा पासून जाणीवपूर्वक आणि योग्य प्रकारे विकास होणे गरजेचे आहे कारण परिपक्वता गाठल्यानंतर सवयीनमध्ये बदल घडवण्यासाठी स्वयंशिस्त आणि सातत्य या पैलूंवर विशेष ध्यान द्यावे लागेल आणि इच्छित जीवन जगण्यासाठी ह्या दोन्ही गुणांचा विकास करून वचनबध्द राहून आवश्यक सवयी विकसित करता येवू शकतात.

Sunday, 18 October 2020

Utilizing your resources to the best of its capacity is an art. Quote#TM162

Quote#TM162

*Utilizing your resources to the best of its capacity is an art.*

It rarely happens in the world that the necessary resources are automatically available to you to achieve the desired goal.  Almost all the time the resources you need are not available so to stay ahead in life we need to learn the art of using the available resources at its optimum level.

सुविचार १६२
*आपल्या संसाधनांच्या सर्वोत्तम क्षमतेचा उपयोग करणे ही एक कला आहे.*

जगात फारच कमी वेळेस असं घडलं असावं की गरजेची असलेली सगळी साधने आपोआपच आपल्याकडे असावी अन् त्यातून हवं असलेलं इप्सित साध्य करावा. जवळ जवळ सर्वच वेळेस गरजेची साधने उपलब्ध नसतात त्यामुळे आयुष्यात अग्रेसर राहण्यासाठी आपल्याला ऊपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर करण्याची कला अवगत असायला हवीच.

Saturday, 17 October 2020

Let all distractions go. Pay full attention to living your best life. Quote #TM161

Quote #TM161

*Let all distractions go. Pay full attention to living your best life.*

Often we engage ourselves in many unnecessary distractions, perhaps we get distracted when adjusting the flow with outside situations then continue with such a distracted mind. But we can live a meaningful life by consciously separating ourselves from such distractions and focusing on the important aspects of life.  Looking ahead, we can focus on things that will matter even after 10 years.
We can check and identify the distractions by closing our eyes and evaluating this at least for 10 minutes, then we can use our physical, mental, and emotional energy for building important aspects of life without wasting it on things that are not valuable in actual but just kept us occupied.

सुविचार १६१

*निरर्थक गोष्टीमध्ये लक्ष विचलित होऊ देवू नका. आपले सर्वोत्तम जीवन जगण्याकडे संपूर्ण लक्ष द्या.*

खूपदा आपण अनेक गरजेच्या नसलेल्या गोष्टींमध्ये स्वतः ला गुंतवून ठेवतो, कदाचित परिस्थीती सोबत वाहून जाताना असं घडू शकते. मात्र जाणीवपूर्वक स्वतः ला त्यापासून वेगळ करून जीवनाच्या महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष्य केंद्रित करणे म्हणजेच अर्थपुर्ण जीवन जगणे असे आपण म्हणू शकतो. पुढील १० वर्षांचा विचार केल्यास अश्या कोणत्या गोष्ठी आहेत ज्यावर आपण ध्यान द्यायला हवं
हे एकदा डोळे मिटून १० मिनिटे विचार करून तपासून घ्यायला हवं आणि निरर्थक गोष्टींमध्ये आपली शारीरिक, मानसिक, भावनिक ऊर्जा वाया न घालवता ह्या ऊर्जेचा वापर महत्त्वाच्या पैलूंना उभारणी देण्याच्या कामासाठी करावा.

Friday, 16 October 2020

Stay committed to achieving attainment in every area of your life. Quote #TM160

Quote #TM160

*Stay committed to achieving attainment in every area of your life.*

The concept of success is completely relative.  Everyone's definition of success can be different.  But in general, a person strives to achieve certain goals in various areas of his life such as relationships, health, personal goals, financial goals, social contribution, spiritual progress.  The real test when it comes to achieving these goals is to maintain a balance between it and that is what builds our lives.  This seemingly simple aspect is actually a meaningful thing that determines the quality of life.

*आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश साध्य करण्यासाठी वचनबद्ध रहा.*

यशाची संकल्पना ही पूर्णपणे सापेक्ष आहे. प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी असू शकते. मात्र सर्वसाधाणपणे पाहिल्यास व्यक्ती त्याच्या आयुष्यात विविध क्षेत्रात जसे नातेसंबंध, आरोग्य, वैयक्तिक ध्येय, आर्थिक ध्येय, सामाजिक योगदान, अध्यात्मिक प्रगती यांत ठरवलेली निश्चित ध्येय   गाठण्यासाठी प्रयत्नशील असतो. ही ध्येये सर करत असताना खरी कसोटी असते ती त्यात समन्वय सध्याची आणि समतोल राखण्याची आणि त्यातूनच आपल्या आयुष्याला उभारणी मिळते असते. सोपी वाटणारी ही बाजू खरतर जीवनमान ठरवणारी अर्थपूर्ण बाब ठरते.

Thursday, 15 October 2020

A small thought of refusing failure gives the strength and to make big difference. Quote #TM159

Quote #TM159

*A small thought of refusing failure gives the strength and determination to make big difference.*

We are rewarded according to the proportion of willpower.  It is this intensity of willpower that gives strength to overcome a big problem in life, a small thought to not give up even after all the efforts are exhausted, becomes a ray of hope in the pitch darkness, with the help of which the intense power to struggle shines once again and the mind gets re-equipped.  Perhaps this is the thought that is deeply rooted in every one of us could be the secret of consistency by which mankind has reached the impossible heights of success these days.

सुविचार १५९

*अपयशाला नकार देण्याचा एक छोटासा विचार मोठा फरक पाडण्याचे सामर्थ्य आणि निर्धार देतो.*

इच्छाशक्तीच्या अनुपाता नुसार आपल्याला फलप्राप्ती होत असते. हीच इच्छाशक्तीची तीव्रता आयुष्यात मोठी समस्या पार करण्यासाठी बळ देते, सर्व प्रयत्न करून थकल्यानंतरही मनात चिकटून राहिलेली न हरण्याचा एक लहानसा विचार कुट्ट अंधारात आशेचा किरण बनून जातो, ज्याच्या सहायाने पुन्हा एकदा मनात लढण्याची तीव्र वीज चमकून जाते आणि मन पुन्हा नव्याने सज्ज होते. कदाचित हा न हरण्याच विचार जो आपल्या प्रत्येकात खोलवर रुजलेला आहे तो म्हणजेच सातत्याच गमक असावं ज्याच्या जोरावर मानवजातीने आजवर यशाची अशक्य शिखरे गाठली आहेत.

Tuesday, 13 October 2020

Success belongs to the risk-takers, not the comfort-seekers. Quote #TM158

Quote #TM158

Success belongs to the right of the risk-takers, not the comfort-seekers.

Comfort is the enemy of the best.  The alchemy of reaching the best is only possible after completing an arduous journey.  Preparing to set out on a tough journey is the foundation stone on which the tallest building of success can stand.  Therefore, it is possible to reach the horizon beyond sight by taking risks rather than just reaching a goal of finding a relaxed state and living a quiet life.


सुविचार १५८

*उज्ज्वल यश हे जोखीम घेणार्यांसाठी आहे, आरामदायक अवस्थेत राहणाऱ्यांना साठी नाही.*

आरामदायक अवस्था ही सर्वोत्तम अवस्थेची शत्रू आहे. सर्वोत्तम गाठण्याची किमया खडतर प्रवासा नंतरच पूर्ण होते. खडतर प्रवासाला निघण्याची मनाची तय्यारी हीच पायाभूत शिळा असून त्यावरच यशाची उंचच उंच इमारत उभी राहू शकेल. म्हणूनच फक्त आरामदायक अवस्थेच ध्येय गाठून स्तब्ध जीवन व्यतीत करण्यापेक्षा जोखीम घेऊन दृष्टीक्षेपा पलिकडील क्षितिज सर करता येवू शकतात.

Every morning take actions that support your highest potential. Quote #TM157

Quote #TM157

*Every morning take actions that support your highest potential.*

We should constantly work on developing our qualities. It is an unending process. We can book a 5-10 minutes self-appointment to develop our inner qualities in the morning, perhaps we should do it daily.

सुविचार १५७

*दररोज सकाळी आपल्या सर्वोच्च गुणांचा विकास  करणाऱ्या कृती करा*

आपले गुण विकसित करण्याचा प्रयत्न आपण सतत करत राहायला हवा, ही एक निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. सकाळी स्वतः साठी ५-१० मिनिटांची भेट राखून ठेवून आपल्या अंतर्भूत गुणांच्या विकासासाठी नक्कीच आपण प्रयत्न करू शकतो, किंबहुना तो करायला ही हवा.

Monday, 12 October 2020

The minute you alter your perception of yourself, life begins to change. Quote #TM 156

Quote #TM 156

*The minute you alter your perception of yourself, life begins to change.*

Very few things we actually experience and the rest of the things either we perceive or imagine.  Therefore, a large part of our thinking process is occupied with perceptual knowledge.  In the end, we create an image of ourselves based on this knowledge. The easiest way to change or improve our self-impression is to develop our perception of ourselves through experience and actions.

सुविचार १५६

*ज्या क्षणी आपण आपल्या स्वतःच्या समजुती बदलता त्या क्षणी आपले जीवन बदलू लागते.*

फारच कमी गोष्टींचा आपल्याला प्रत्यक्षात अनुभव असतो बाकीच्या सगळ्याच बाबी आपण आकलन केलेल्या असतात किंवा कल्पना केलेल्या असतात. त्यामुळे आपल्या वैचारीक प्रक्रियेचा मोठा भाग आकलन युक्त ज्ञानाने व्यापलेला असतो. अन् त्यातूनच स्वतः ची एक प्रतिमा आपण तयार करत असतो. ही प्रतिमा बदलण्याचा किंवा अधिकाधिक उत्तम बनवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजेच आपले स्वतः बद्दल चे आकलन प्रत्यक्ष अनुभूती द्वारे आणि कृतीद्वारे विकसित करणे होय.

Sunday, 11 October 2020

Use conscious consideration when making choices regarding your time .Quote #TM155

Quote #TM155

*Use conscious consideration when making choices regarding your time*

Time is everything.  Everything else is contained in time.  We too exist in a smaller period of this eternity and claim our right over a short period and name it as our existence. During this span of life, wise people like you consciously use your time for the benefit of yourself and others without wasting any moment at all and honor the life.

सुविचार १५५

*वेळे संदर्भात निवड करताना जाणीवपूर्वक विचार करा*

वेळ म्हणजेच सर्वकाही. बाकीच्या सर्व गोष्टी वेळेतच सामावलेल्या आहेत. आपण सुद्धा ह्या अनंत काळात एक लहानशा कालखंडा वर आपला अधिकार म्हणून अस्तित्वात आहोत. ह्या कालावधीत ही आपल्या सारखे सुज्ञ लोक बिलकुल वेळ वाया न घालवता जाणीवपूर्वक वेळेचा स्वतः च्या आणि इतरांच्या कल्याण साठी उपयोग करण्याची किमया करू शकतात आणि आयुष्याची प्रतिष्ठा जपतात.

Saturday, 10 October 2020

Never Give up on your dreams. Quote#TM154

Quote#TM154

*Never Give up on your dreams*

Take your dreams seriously, chances are you will succeed at your dream because you are different than many people who are not working towards their dreams and waiting for some right moment, and not even taking the necessary efforts to give it a try, which means you are already ahead in the game and should not miss the opportunity to give a hard try to achieve life dreams.

सुविचार १५४
*तुमचे स्वप्न कधीही सोडू नका*

आपल्या स्वप्नांचा गांभीर्याने विचार करा, आपण यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे कारण तुम्ही त्या अनेक लोकांपेक्षा भिन्न आहात जे त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने कार्य करीत नाहीत आणि काही योग्य क्षणाची वाट पाहत थांबले आहेत साधा आवश्यक प्रयत्नही करत नाहीत, याचा अर्थ तुम्ही  खेळामध्ये आधीपासूनच आघाडीवर आहात आणि जीवनाची स्वप्ने मिळवण्यासाठी कठोर प्रयत्न करण्याची संधी गमावू नका.

Friday, 9 October 2020

We are unknowingly becoming our past. Let us consciously be the foundation of our future. Quote #TM153

Quote #TM153

*We are unknowingly becoming our past.  Let us consciously be the foundation of our future*

In the long run, we are all part of the past and it is inevitable.
But also, today's actions lay the foundation for our future, therefore, choosing to live at full capacity and giving the best efforts in all walks of life is the best choice we can willfully go for.

*आपण अनभिज्ञपणे आपला भूतकाळ बनत आहोत. चला जाणीवपूर्वक आपल्या भविष्याचा पाया होऊयात*

दीर्घ काळात आपण सगळे भूतकाळाचा भाग आहोत हे जरी अटळ असले तरी आजचे कर्तृत्व आपल्या भविष्याचा पाया घालत असते, हे ही तितकेच खरे आहे म्हणूनच संपूर्ण क्षमतेने जगणे आणि जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये आपला सर्वोत्तम प्रयत्न करणे याची आपण जाणीवपूर्वक निवड आपण करावी.

Thursday, 8 October 2020

Grow through what you go through. Quote #TM152

Quote #TM152

*Grow through what you go through*

An all-round personality picks the things from all sorts of situations he passes through without waiting for the right opportunity and makes progress. He starts walking towards the highest peak by arranging the available resources and circumstances as a stepping stone. There is such a versatile person hidden in each of us.

सुविचार १५२

*आपण ज्या परिस्थतीत आहात त्यातूनच प्रगती करा*

एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सर्व प्रकारच्या परिस्थितीतून स्वतःची प्रगती साधण्यासाठी आवश्यक गोष्ठी निवडून घेत असतो आणि संधी आणि साधन यांच्या योगायोगाची वाट न पाहता ऊपलब्ध साधन आणि परिस्थितीलाच पायरी बनवत उत्तुंग शिखराकडे वाटचाल करू लागतो. आपल्या प्रत्येकात असाच एक अष्टपैलू व्यक्ती दडलेला असतो.

Wednesday, 7 October 2020

Determine what is ideal before going to get what is possible. Quote #TM151

Quote #TM151

*Determine what is ideal before going to get what is possible.*

It doesn't matter if one aims high and misses the target, but aiming and hitting a low target can be a mistake. Falling to achieve glorious goals is not a crime but lack of effort is, disbelieving in own self despite having the ability is a waste of our strength. Let time decide what is possible or not possible, but we shall ensure that we give our best efforts today.

सुविचार १५१

*शक्य असलेल्या गोष्ठी मिळवण्या पूर्वी आदर्श गोष्ठी कोणत्या हे ठरवावे.*

उंच नेम धरून तो चुकला तर काही वावगं नाही मात्र खाली नेम धरून तो साधला तर मात्र ती चूक ठरेल. 
गौरवशाली उद्दीष्टे साध्य करतना अयशस्वी होणे हा गुन्हा नाही तर प्रयत्नांची कमतरता म्हणजे गुन्हा आहे, क्षमता असूनही स्वतःवर विश्वास न ठेवणे म्हणजेच आपल्या शक्तीचा अपव्यय आहे. गोष्ठी शक्य की अशक्य हे नंतर वेळ ठरवेल, मात्र आपला आजचा प्रयत्न पूर्ण असू दे.

Tuesday, 6 October 2020

The better way to confront your fears is to stay prepared. Quote #TM150

Quote #TM150

*The better way to confront your fears is to stay prepared*

Investing in preparation is always better than spending to deal with the effects. Preparation boosts your self-confidence and gives you the energy to deal with fear. Overcoming fear can give us the feeling of accomplishment that makes our life worthwhile and gives us the privilege to live with pride.

सुविचार १५०

*आपल्या भीतीचा सामना करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वतः ला तयार करणे.*

परिणामांनाशी दोन हात करण्याचा व्यय करण्यापेक्षा स्वतः ला तयार करण्यात गुंतवणूक करणे नेहमीच चांगले.  तयारी मुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि भीतीस सामोरे जाण्याची ऊर्जा आपणास मिळते, शेवटी भीतीवर मात करणे ही एक कर्तव्य पूर्तीची अनुभूती असू शकते जी आपले जीवन मूल्यवान बनवून आपल्याला अभिमानाने जगणे देवून जाते.

Monday, 5 October 2020

What you feel inside is the actual quality of your life. Quote #TM149

Quote #TM149

*What you feel inside is the actual quality of your life.*

Basically, quality means having something at its best. Having your life in its best form means experiencing satisfaction towards almost everything that is important to you. This experience is completely internal. Success in the external world may be to some extent related to inner satisfaction, but the control of emotional fluctuations largely depends on the level of self-awareness. In order to experience contentment in the inner world, it is necessary to do a little work towards self-awareness. So our experience of life will be full of quality.

सुविचार १४९

*आपण अंतर्मनात जे अनुभव घेतो तेच आपल्या जीवनाची वास्तविक गुणवत्ता आहे.*

मुळात गुणवत्ता म्हणजे काय तर एखादी गोष्ट तिच्या सर्वोत्कृष्ट स्वरूप असणे. आपले जीवन सर्वोत्कृष्ट स्वरूपात असणे म्हणजेच आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टीं च्याबाबतीत समाधान अनुभवणे. हा अनुभव पूर्णतः अंतर्गत असतो. बाह्य जगतात मिळवलेले यश काही अंशी अंतर्मनाशी संबंधित असू शकते मात्र भावभावनांच्या चढ उतारचे नियमन हे बव्हंशी आत्मजागृती च्या स्तरावर अवलंबून आहे. अंतर्गत विश्वात समाधान अनुभवण्यासाठी आत्मजागृतीच्या दिशेने थोडं काम करणं ही गरजेचं आहे त्यामुळे आयुष्याचा आपला अनुभव गुणवत्ता पूर्ण होईल.

Sunday, 4 October 2020

Every effect in our life has aspecific cause. Quote#TM 148

Quote#TM 148
*Every effect in our life has a
specific cause*

Nothing happens by accident. Our life today is the result of all our previous thinking and actions and could not be other than it is.
If we want to have a wonderful time in the future, we have to sow constructive thoughts in the present.
Fortunately, we have full control over what we can think, and by
exercising that control, we can turn our future situations and become a
completely positive person.

*आपल्या आयुष्यातील प्रत्येक परिणामा मागे एक
 विशिष्ट कारण असत*

या जगात अपघाताने काहीही घडत नाही.  आपले आयुष्य हे आपल्या आधीच्या सर्व विचारांचा आणि कृतींचा परिणाम असते आणि त्याशिवाय दुसरे काहीही असू शकत नाही.
जर आपल्याला भविष्यात एक चांगला काळ हवा असेल तर आपल्याला सध्या सकारात्मक विचारांची पेरणी करावी लागेल.
सुदैवाने, आपण काय विचार करवा यावर आपले पूर्ण नियंत्रण असते, याच नियंत्रणाचा उपयोग करून आपण भविष्यातील परिस्थिती बदलू शकतो आणि पूर्णपणे सकारात्मक व्यक्ती बनू शकतो.

Saturday, 3 October 2020

Words have the power to transform lives.Quote #TM 147

Quote #TM 147
*Words have the power to transform lives*

Words are the carriers of mental energy, which means the words convey our inner energy to the receiver. There is enormous energy stored in some positive words. In order to absorb this energy, however, the receiver is expected to take himself to a more advanced stage.  Giving the mind unbiased freedom to understand things as they are so that the energy in the words can reach the mind without hindrance and thereby make one's mental transformation possible.  The advice and thought received at just the right time are great examples of such transformation.

*शब्दांमधे जीवनाला परिवर्तित करण्याची क्षमता असते*

शब्द हे अंतर्गत उर्जेचे वाहक असतात म्हणजेच मानसिक ऊर्जा ग्राहकापर्यंत वाहून नेण्याचे काम शब्दानं मार्फत होते, काही सकारात्मक शब्दांमध्ये जणू उत्स्फूर्त ऊर्जाच साठवलेली असते. ह्या ऊर्जेचे ग्रहण करण्याकरिता ग्राहकाला मात्र स्वतः ला थोड प्रगत अवस्थेमध्ये घेऊन जाणे अपेक्षित आहे. मनाला गोष्ठी जश्या आहेत तशा समजून घेण्याचं पूर्वग्रह विरहित स्वातंत्र्य दिलं की ग्रहित होणाऱ्या शब्दांमधील ऊर्जा विनाअडसर मनामध्ये पोहोचू शकते आणि त्याद्वारे एखाद्याचे मानसिक परिवर्तन शक्य आहे. योग्य वेळी मिळालेले सल्ले आणि  विचार ही याची उत्तम उदाहरणे आहेत.

Friday, 2 October 2020

Today's troubles often bring positive change in the future. Quote #TM146

Quote #TM146

*Confronting today's troubles often brings positive change tomorrow*

A closer look reveals that the past, present, and future are intertwined in one chain of time, and well connected with each other, only we experience it differently.  Any action we take today, creates its future consequences like, as today's negativity or neglect of health habits has already created its negative consequences for tomorrow, but it will come to an actual experience in the future. Similarly, action or situation that seems tough in the present moment leaves its positive impression in the form of life lessons which ultimately strengthens our efficiency in the long run.

*त्रासदायक अनुभव अनेकदा जीवनात सकारात्मक बदल निर्माण करतात*

खोलवर जावून पाहता दिसून येते, की भूत, वर्तमान आणि भविष्य हे काळाच्या एकाच साखळदंडात गुंफलेले असून त्यांचा भासमान प्रत्यय फक्त वेगळा जाणवतो. आपण केलेले कोणतेही कार्य त्याचा भविष्यातील परिणाम आजच तयार करते जसे आजचा चालढकल पणा किंवा आरोग्याच्या सवयींमध्ये केलेल्या दुर्लक्षामुळे उद्याचा नकारात्मक परिणाम आधीच तय्यार झालेला असतो प्रत्यक्ष अनुभवात मात्र भविष्यात येणार असतो. तसेच, आजची कोणतीही समस्या ही दीर्घ काळात महत्त्वपूर्ण शिकवण बनते, वर्तमान क्षणात त्रासदायक वाटणारी एखादी कृती भविष्यात आपली कार्यक्षमता वाढवल्या शिवाय राहत नाही.

Thursday, 1 October 2020

The ability to evaluate the consequences of our behavior well before taking action is a significant quality. Quote#145

Quote #TM 145

*The ability to evaluate the consequences of our behavior well before taking action is a significant quality*

Before any behavioral problem arises, its causal association can be spotted in our current behavior, just need to introspect for a while before taking action on anything.  Even a few moments of introspection will help us to be aware of future consequences due to which we will be able to control our behavior to some extent.  We can develop it as a habit with regular practice.  This seemingly insignificant quality can make a significant difference in a person's life.

सुविचार १४५

वर्तनाशी निगडित समस्या निर्माण होण्याआधी तिचा कार्यकारण संबंध वर्तमानातील आपल्या वागणुकी सोबत लावता येवू शकतो, गरज आहे ती कोणतीही गोष्ट तडकाफडकी करण्या आधी फक्त काहीवेळ अंतर्मुख होण्याची. अगदी काही क्षण अंतर्मुख झाल्यानेही भविष्यातील परिणामांची जाणीव होण्यास मदत होईल आणि आपल्या वर्तनावर आपणास काही अंशी नियंत्रण आणता येईल आणि नियमित सरावाने तो एक गुण म्हणून विकसित करता येवू शकेल. वरकरणी नगण्य वाटणारा हा गुण आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतो.

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...