*A small thought of refusing failure gives the strength and determination to make big difference.*
We are rewarded according to the proportion of willpower. It is this intensity of willpower that gives strength to overcome a big problem in life, a small thought to not give up even after all the efforts are exhausted, becomes a ray of hope in the pitch darkness, with the help of which the intense power to struggle shines once again and the mind gets re-equipped. Perhaps this is the thought that is deeply rooted in every one of us could be the secret of consistency by which mankind has reached the impossible heights of success these days.
सुविचार १५९
*अपयशाला नकार देण्याचा एक छोटासा विचार मोठा फरक पाडण्याचे सामर्थ्य आणि निर्धार देतो.*
इच्छाशक्तीच्या अनुपाता नुसार आपल्याला फलप्राप्ती होत असते. हीच इच्छाशक्तीची तीव्रता आयुष्यात मोठी समस्या पार करण्यासाठी बळ देते, सर्व प्रयत्न करून थकल्यानंतरही मनात चिकटून राहिलेली न हरण्याचा एक लहानसा विचार कुट्ट अंधारात आशेचा किरण बनून जातो, ज्याच्या सहायाने पुन्हा एकदा मनात लढण्याची तीव्र वीज चमकून जाते आणि मन पुन्हा नव्याने सज्ज होते. कदाचित हा न हरण्याच विचार जो आपल्या प्रत्येकात खोलवर रुजलेला आहे तो म्हणजेच सातत्याच गमक असावं ज्याच्या जोरावर मानवजातीने आजवर यशाची अशक्य शिखरे गाठली आहेत.
No comments:
Post a Comment