Saturday 25 April 2020

आत्मजागृती



एखाद्या प्राण्याला आरश्या समोर ठेवल्यास त्याची आश्चर्यजनक वागणूक काय असेल हे आपणास वेगळे सांगावयास नको, अश्या प्रकारचे कित्येक व्हिडिओस आज इंटरनेट वर उपलब्ध आहेत ज्यात प्राण्यांचे आरश्या समोरील गमतीशीर वागणे चित्रित केले गेले आहे.
जर आज तुमचा एका नवीन व्यक्तीशी परिचय झाला आणि ती व्यक्ती हुबेहूब तुमचीच प्रतिकृती असेल, तिचं असणं, राहणं, वागणं, दिसणं अगदी तुमच्या सारखेच, म्हणजेच काय तर तुमचं प्रतिबिंब, अगदी आरश्यात पहिल्या सारखं.
इथे प्रश्न असा आहे कि, तुम्हाला तुमच्या प्रतिकृतीला भेटून प्रसन्न वाटेल काय? एखादा आदर्श व्यक्ती भेटल्या सारखे खरंच ती व्यक्ती तुम्हाला प्रभावित करू शकेल? तुमचा उत्तर हो किंवा नाही असू शकेल.
माझ्या सारख्या कित्येकांना स्वतः ची प्रतिकृती कदाचित आदर्श व्यक्तीमत्व नाही वाटणार. असे का होऊ शकते? किंवा मला माझ्यात असे काय बदल करावे लागतील जेणे करून मी स्वतः साठी एक आदर्श व्यक्ती होऊ शकेन? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधताना सुरुवात होते ती आत्मा जागरूकतेने (सेल्फ अवेअरनेस).
खरंच आपल्याला सेल्फ अवेअरनेस ची म्हणजेच आत्मजागृतीची आवश्यकता आहे काय? होय, निशंक.
जर तुम्हाला नवीन विकत आणलेला लॅपटॉप किंवा मोबाईल वापरायचा असेल तर त्यातील features  विषयी माहिती असणे क्रमप्राप्तच आहे. तसेच तुम्हाला अगदी मोफत मिळालेल्या शरीराला आणि मनाला योग्य प्रकारे उपयोगात आणून कोणत्या हि क्षेत्रात जास्तीत जास्त परिणाम साधायचा असेल तर या स्वयं जागरूकतेची आवश्यकता आहे.
सर्व प्रथम जाणून घेऊयात काय आहे स्वयं जागरूकता किंवा सेल्फ अवेअरनेस, याचे उत्तर, तुम्हाला स्वतः विषयी संपूर्ण जाण असणे असे सोप्या शब्दात आपण येथे मांडू शकतो. स्वतः चे ३६० च्या कोनातून अवलोकन करणे येथे अपेक्षित आहे.याचा अर्थ असा होतो कि आपले गुण, अवगुण, व्यक्तिमत्व, वैचारिक प्रगल्भता, आवडी, नाआवडी, मानसिक आणि शारीरिक क्षमते विषयी ची जाण आणि इतर काही महत्वाच्या पैलूं बद्दल ज्ञान असणे. स्वतः बद्दल माहिती मिळवताना सर्वात मोठा अडसर येतो तो आपला स्वतः चा.
जन्म पासून एक साचेबद्धता( mindset) आपण विकसित करत असतो, स्वयं जागृतीच्या कार्यात हि साचेबद्धता ओळखणे हि पहिली पायरी आहे. म्हणजेच काय, जर आपल्या डोळ्यां वर एखाद्या रंगाचा चष्मा घातलेला असेल तर संपूर्ण जगच आपल्याला त्या रंगाचे दिसू लागते, आपल्या मना साठी हा चष्मा म्हणजेच mindset किंवा साचेबद्ध विचार सरणी उदाहरणार्थ, मला चित्र काढता येत नाहीत, मला लोकांसमोर भाषण देणे शक्यच नाही, मला इतर भाषा शिकणे जमणार नाही, माझ्या लहानपणी पासून मला नवीन भाषा शिकण्यास त्रास होतो वगैरे वगैरे. अश्या अनेक प्रकारचे नकारात्मक पगडी डोक्यावर कायमची ठेवलेली आढळून येतात त्या सर्वप्रथम काढून फेकणे आवश्यक आहे. याची सोपी पद्धत म्हणजे जबरदस्तीने स्वतः ठामपणे सांगणे कि तुम्हाला ती गोष्ट करता येते किंवा थोडा फार प्रयत्न केल्यास तसे तुम्हाला जमू शकते. यातून एक सकारात्मकता निर्माण होऊन संतुलन स्थिती गाठली जाऊ शकते आणि पुढे स्वयं अवलोकन करणे सोपे जाऊ शकते.
अवलोकन करण्या ची सोपी पद्धत म्हणजेच घरात एखाद्या शांत ठिकाणी बसावे, अशी कल्पना करावि कि तुमच्या पासून तुमची ऊर्जा वेगळी होऊन घरातील एका उंच ठिकाणी जाऊन बसलीये, आणि तिथून ती तुम्हाला पाहतेय, अगदी तटस्थ दृष्टिकोनातून, ह्या वेळेस तुम्ही स्वतः विषयी लिहू शकता, आपले सगळे गुण अवगुण, सामर्थ्य आणि दोष  इत्यादी.अश्या प्रकारे अवलोकन झाल्या वर त्या उर्जेला घराच्या दुसऱ्या कोनातून तुमच्या कडे पाहू द्या, असे करत स्वतःला ३६० च्या कोनातून न्याहाळून घ्यावे. बुद्धिमान लोकांना अश्या कल्पकतेने स्वतःतील बारकावे शोधता येतात. पुढे, आत्मनिरीक्षण झाल्यावर कदाचित तुम्हाला विचारांच्या गर्दीतून स्वत:ला शोधणे सहज शक्य होईल.
बाहेरील कोणतीही व्यक्ती किंवा परिस्थिती आपल्यात बदल घडवू शकत नाही, बाह्य घटकांचे परिणाम आपल्यावर होऊ देण्याचा निर्णय सर्वस्वी आपला स्वतः चा असतो, कळत असो किंवा नकळत. स्वतः बद्दल पूर्ण किंवा बऱ्यापैकी माहिती प्राप्त झाल्या नंतर जी स्थिर मानसिक अवस्था निर्माण होते ती म्हणजेच आत्माजागृती, स्वतः ची पूर्ण जबाबदारी घेऊन आपण पुढच्या पायरीवर जाऊयात आपल्यातील गुणांचे सशक्ती करण करणे व दोषांचे निकारण करणे यावर आपण आत्ता काम करू शकतो. आपले सामर्थ्य ओळखल्या वर त्याचा पुरेपूर वापर आपल्या कडून होत आहे काय हे तपासून घ्यावे,उदयरनार्थ,  जर क्रीटीव्ह थिंकिंग( सर्जनशीलता) हा आपला सर्वात मोठा गुण असेल तर त्याचा वापर आपल्या कडून प्रत्येक क्षेत्रात होत आहे काय हे जाणून घ्यावे, म्हणजेच आपल्या मुलांना शिकवताना सर्जनशील पद्धती वापरता येऊ शकते, कार्यालयात सुद्धा अश्या प्रकारे सर्जनशीलतेचा वापर करून समस्या सोडवीत आहोत कि ठरलेल्या कालबाह्य पद्धतीनं मध्ये अडकून पडलेलो आहोत आणि मानसिक ताण  घेऊन रोबोटिक आयुष्य जगतो आहोत याची फेरविचारणी जरूर करावी, यालाच आपण काउंटर चेकिंग म्हणूयात.अश्या प्रकारे आपण स्वतःला आपल्यातल्या सामर्थ्याचा जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहित करू शकतो. दोषांना जाणून घेऊन ते कमी करण्याचा प्रयत्न करावा, उदाहरणार्थ, आळस  हा जवळपास सर्वां मध्ये कमी अधिक प्रमाणात आढळणारा दोष आहे, त्याला दूर करताना जाणीवपूर्वक आळसाविषयी फारसा विचार न करता ज्या विषयां मध्ये रस आहे त्या गोष्टीं मध्ये स्वतः गुंतवून घ्यावे किंवा जिथे आळस पण येते तेथे स्वतः क्रियाशीलते मध्ये अडकवून घ्यावे, उदाहरणार्थ, सकाळी लवकर उठण्याचा अळसपणा घालवण्या साठी एखाद्या धावण्याच्या स्पर्धे मध्ये भागघ्यावा, फिटनेस ग्रुप मध्ये सामील व्हावे, जेणे करून प्रेरणेमुळे आळस आपोआप निघून जाईल. विविध अवगुणां वर काम करताना अश्या प्रकारचे सूत्र वापरावे.
आपणास स्वतः विषयी माहिती झाली, गुणांवर आणि अवगुणांवर काम करणं सुरु केलंत, म्हणजेच जागृतावस्थेकडे आपण वाटचाल सुरु केलीत, स्वतः विषयी पूर्ण माहिती झाल्या मुळे आपणास आपल्या क्षमतेची जाणीव होईल, आणि प्रसंगाना सामोरे जाताना आत्मविश्वास जाणवेल. आत्मविश्वास तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपणास आपल्या योग्यतेची जाणीव असेल. क्रिकेट, फुटबॉल सारखे खेळ असोत किंवा आयुष्यातील प्रसंगांना सामोरे जाणे असो तुमच्या आत्मजागृतीमुळे तुम्ही नेहमी अग्रेसर राहण्याची शक्यता अधिक. तसेच कोणते काम तुमच्या आवाक्या बाहेरील आहे याचीहि जाण आत्मजागृती मुळे होणे शक्य आहे, ज्यि कौशल्ये तुमच्यात अद्याप विकसित झाली नाहीत त्या कौशल्यावर आधारित कार्य तुम्ही अतिउत्साहाच्या भरात न स्वीकारल्या मुळे अतीव ताणा पासून स्वतः ला दूर ठेवता येऊ शकेल. तणावाचे मूळच आहे कि आपल्या क्षमते पेक्षा जास्त आणि आवडी पेक्षा वेगळ्या असलेल्या कार्यात उत्साहाच्या भरात किंवा अटळ प्रसंगामुळे सहभागी होणे, असो, आत्ता तुम्हाला आयुष्यात स्पष्टतेची( Clarity )जाणीव झालेली असेल, त्या मुळे तुमच्या आयुष्यात एक दूरदृष्टी( Vision) येऊशकेल. ध्येये(goals ) निश्चित करून ठरवलेली उद्दीष्टे(purpose ) साधण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करता येऊशकेल. स्वतः बद्दल पूर्ण जाणीव झाल्या मुळे आत्मा जागृतावस्थेतून तुमची मानसिक अवस्था एक पाऊल पुढे जाऊन तुम्हाला स्थितप्रज्ञ अवस्था काही अंशी किंवा बव्हंशी प्राप्त होऊ शकेल आणि त्या योगे जीवनात परीपूर्णतेची अनुभूती येऊ शकेल.

4 comments:

  1. खूप छान लेखन केले आहे. जीवन जगत असताना आपल्याला स्वतः बद्दल असणारे आत्मज्ञान किती महत्त्वाचे आहे हे उत्तमरीत्या उदाहरणासह पटवून दिले आहे.

    खुपच छान....👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! आपले शब्द माझ्या साठी प्रेरणा आहेत.

      Delete
  2. सध्याच्या परिस्थितीत . ..आत्मज्ञान होऊन मनुष्याने मानसिक समतोल राखणे खुप गरजेचे आहे. ..तेव्हाच मनुष्य त्याचे कुटुंब आणि पर्यायाने समाज आनंदी राहील... ...
    त्यासाठीच वरील मानसिक व्यायाम अतिशय महत्वाचा आहे .......🙏🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! आपण या लेखा मागचा नेमका अर्थ ओळखला.

      Delete

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...