Thursday 29 April 2021

कोरोना काळ- पुढील वाटचाल


परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे आणि प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत. कोणतेही सरकार किंवा प्रशासन एकट्याने हे संकट थोपवणे म्हणजे वाहत्या वार्याला लहानश्या जाळ्यात पकडण्या सारखे आहे. कोरोनाच्या ह्या वादळाला थोपवायचे असेल तर पर्वत उभारावा लागेल. हा पर्वत दुसरे तिसरे कुणी नव्हे तर फक्त आणि फक्त सामान्य लोकच उभारू शकतात. सरकारी यंत्रणा तोकड्या आहेत. त्या लागलीच वाढवणे किंवा प्रगत करणे प्रत्यक्षात शक्य नाही. आणि सामान्य लोकांनी तशी परिकल्पना करण्यात वेळ घालवू नये. हि जबाबदारी आपण आणि शासन दोघांनी मिळून सांभाळायची आहे. शासन फक्त दिशादर्शक आहे तर प्रत्यक्षात शिडांची हालचाल तुम्हा-आम्हाला करायची आहे. तरच कोरोनाच्या ह्या उफ़ाळत्या महासागरातून जनसामान्यांची नाव तरून जाऊ शकेल. कोणताही अन्य पर्याय पूरक नाही हे ध्यानी असुदे. सर्व जबाबदारी इतरांची आणि सरकारची असे गृहीत धरण्याची सवय सोडून द्यावी.


आरोग्याच्या सोयी लोकांना उपलब्ध करून देण्याच्या कामाच्या वेगाची कोरोनाच्या प्रचंड संसर्ग वेगाशी तुलना करणे शक्यच नाही,

त्यामुळे संसर्गाला आळा घालणे प्राधान्य क्रमात प्रथम आहे. अकल्पित हानी होण्या आधी मोठा प्रयत्न होणे अनिवार्य आहे.


१. जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या सातत्यासाठी संपर्करहित व्यवस्थेची निर्मिती करण्यावर भर दिला जावा. आणि तिचा वापर जवळपास अनिवार्य केला जावा. जनतेने जास्तीत जास्त अश्या व्यवस्थेचा वापर कसा करता येईल यावर लक्ष्य केंद्रित करावे. संपर्करहित व्यवस्थेत घरपोच वस्तू आणि सेवा पुरवल्या जाव्यात. मात्र अश्या व्यवस्थेत कार्य करणाऱ्या सर्व कामगार आणि निगडित व्यक्तींचे लसीकरण आणि वारंवार कोवीड चाचणी अनिवार्य करावी.


२. स्थानिक संपर्काचे महत्व: उच्च स्थरावर घेतलेला परिणामकारक निर्णय जोपर्यंत स्थानिक पातळीवरील शेवटच्या घटकांकडून अंमलात आणला जात नाही तोपर्यंत सगळंच निरर्थक. लोकसहभागाशिवाय कोरोनावर मात करणे शक्यच नाही. आणि याकामी अजूनतरी सर्रार्स वापरल्या जाणाऱ्या समाजमाध्यमाचा म्हणावा तितका प्रभावी वापर केलेला दिसून येत नाही. स्थानिक पातळीवर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल, प्रशासनाचे कनिष्ठ पातळीवरील अधिकारी, तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या व्यक्तींनी व्हाट्सअप ग्रुप बनवून त्यांच्या परिसरातील जास्तीत जास्त सोसायटी, मंडळे, दबावगट, सामाजिक संस्था, यांचे पदाधिकारी आणि  जास्तीतजास्त सामान्य नागरिक यांच्या पर्यंत त्यांच्या हातातील मोबाइलला द्वारे पोहोचण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यात महत्वपूर्ण माहिती तर पाठवाविच मात्र नियम पाळणाऱ्यांचे कौतुक हि करावे आणि प्रोत्साहान द्यावे. नियम पाळण्याची जबाबदारी नागरिकांमध्ये वितरित करावी. नागरिकांमध्ये जबाबदारीचे वितरण हा या कामी सर्वात प्रभावी उपाय आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहिचण्याचा व्हॅटस्सप हा एक प्रभावीमार्ग आहे. तसेच ह्या व्हॅटस्सप ग्रुप द्वारे कोविद काळात एकमेकांना अत्यावश्यक वेळी मदत हि पोचवता येऊ शकेल.


३. फैलाव रोखणे: ह्या अदृश्य शत्रूचा फैलाव होण्याचा महत्वाचा मार्ग म्हणजे परस्पर संपर्क, हल्लीच्या संशोधनानुसार हवेतून जरी प्रसार होत असेल तरीही लोकांनी एकमेकांच्या संपर्कात न आल्यास हा फैलाव मोठया प्रमाणात रोखला जाऊ शकतो. दुसरा कोणताही उपाय न करता फक्त ह्या एकाच उपायात संपूर्ण जनता सामील झाली तरीही फार मोठा परिणाम साधता येऊ शकेल. पण उपाय जितका परिणामकारक तितकाच तो अवघड हि. महिना भरासाठी एकमेकांशी संपूर्ण संपर्क तोडणे अशक्यच. जनसामान्यांमध्ये याविषयी परिपक्वतेचा अभाव असल्याने, फक्त बळाचा वापर करूनच हे शक्य आहे असे सरकारचे मत झालेले दिसून येते, मात्र बळाचा वापर करण्यावरही मर्यादा असल्याने किंवा तसे करूनही इप्सित परिणाम साधने अवघडच. कारण शिस्त पाळण्यापेक्षा मोडण्याकडे आमचा कल जास्त. असे गृहीत धरावे कि बळाचा वापर शून्य करून हे सध्या करायचे आहे.


लसीकरण: लसीकरण आणि चाचण्या घरोघरी जाऊन केल्या गेल्यास लवकरात लवकर परिणाम साधता येऊ शकेल. या कामी स्थानिक पातळीवरील सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्तींच्या मनुष्य बळाचा वापर केल्यास मनुष्यबळाचा तुटवडा होणार नाही. फक्त याची नियमन शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्या मार्फत व्हावे.


प्रत्येकाने स्वतः ला सक्षम बनवावे. आपले आरोग्य सरकार आणि आरोग्य संस्थांवर न सोडता स्वतः हुन, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर भर द्यावा. कोरोनाच्या ह्या समस्येला एक-दोन वर्षांची समस्या न मानता पुढील १० पेक्षा अधिक वर्षांसाठी आपली रोगप्रतिकारशक्ती औषधांशिवाय उत्कृष्ट कशी ठेवता येईल याचे नियोजन करावे.


नागरिकांनी जागरूक होऊन सहभाग घेण्याची हि वेळ आहे. प्रत्येक नागरिक या युद्धातील महत्वाचा सैनिक आहे.

No comments:

Post a Comment

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...