Quote #TM196
*The things that control you determine the quality of your life*.
There is a perception in society that the quality of our life is a reflection of the fulfillment of our thoughts and feelings associated with different stuff and expectations. The quality of life based on these external factors can be temporary. For a while, it will offer satisfaction, but after that, to live a quality life, it becomes necessary to look at the inner core of the mind. Experiencing the peace within is the primary need for living a quality life.
Let this peace control your life.
सुविचार १९६
*आपण कोणत्या गोष्टींमुळे नियंत्रित होतो यावरून जीवनाची गुणवत्ता निर्धारित होते*
निरनिराळ्या गोष्टी आणि अपेक्षा यांच्याशी संबंधित आपले विचार आणि भावभावना यांचे प्रतिबिंब म्हणजेच आपल्या जीवनाची गुणवत्ता असा समाजात एक समज दिसून येतो. बाह्य स्वरुपाच्या ह्या बाबींवर आधारित जीवनाची गुणवत्ता ही तकलादू असू शकते. काही काळा करिता ती समाधान देईल मात्र त्यानंतर गुणवत्ता पूर्ण आयुष्य जगण्यासाठी मनाच्या अंतर्गत गाभाऱ्याच्या वेध घेणे गरजेचे बनते त्या करिता अंतर्मुख होऊन शांती अनुभवणे हे गुणवत्तेचे प्रथम मानक ठरते. ह्या शांती द्वारे तुमचे जीवन नियंत्रित होऊ द्या.
No comments:
Post a Comment