Monday, 30 November 2020
Sunday, 29 November 2020
Anything that are you experiencing now is your own making. Quote #TM 204
*Anything that are you experiencing now is your own making.*
The image of the universe that we perceive is a manifestation of our mental state. Basically what we feel is our inner experience. The outside world has nothing to do with this experience. As human beings, we all get caught up in a very big psychological game, but the value of this game in universal existence is zero. But it is equally true that the realization of this zero-nothingness puts us at the forefront of this illusory game.
सुविचार २०४
आपल्याला जाणवत असलेली विश्वाची प्रतिमा ही संपुर्णपणे आपल्या मानसिक अवस्थेचे प्रगटीकरण आहे. मुळात जे काही आपल्याला जाणवते ते आपल्या आत मधील अनुभव असतात. बाह्य जगताला ह्या अनुभवाशी काही घेण देण नाही. मनुष्य म्हणुन आपण सर्व एका खूप मोठ्या मानसिक खेळत अडकतो, पण वैश्विक अस्तित्वात ह्या खेळाचे मूल्य शून्य आहे. मात्र ह्याच शून्य भावाची जाणीव आपल्याला ह्या भासमान खेळात अग्रेसर ठेवते, हे ही तितकेच खरे.
Saturday, 28 November 2020
If you want to fly high, you have to leave the ground. Quote #TM203
*If you want to fly high, you have to leave the ground.*
If you want to explore all the possibilities of life, first of all, you have to be determined to get out of the comfort zone because you have to give up your old comfort-seeking and attached habits, just like you can't fly high holding the ground. You need to transform yourself into a new you, no matter how difficult it seems this is the first step to success.
सुविचार २०३
*उंच उडायचे असल्यास जमिनी सोडावी लागते.*
आयुष्यातल्या सर्व शक्याताना गवसणी घालायची असल्यास सर्वप्रथम आरामदायक अवस्थेतून बाहेर पडण्याची जिद्ध हवी कारण जमिनीला धरून उंच उडता येत नाही त्याप्रमाणे आपल्यातल्या जुन्या आरामदायक आणि जडलेल्या सवयीना सोडावे लागेल आणि कितीही अवघड वाटत असले तरी स्वतः ला एका नवीन रुपात रूपांतरित करावे लागेल. भरारारी घेण्याची हीच पहिली पायरी.
Friday, 27 November 2020
One should try to know all the dimensions of life. Quote #TM202
*One should try to know all the dimensions of life.*
According to our knowledge and experience, we become part of a small puddle and that puddle becomes like an ocean for us. In this ocean of life, life and energies are flourishing on different levels, from inanimate stars to small butterflies, it is incredible. Therefore, we should always be aware that we are part of this wonderful global phenomenon, and we should try to maintain our incredible state in this naturally great dimension.
सुविचार २०२
*जीवनाच्या सर्व आयामांना जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.*
आपल्या ज्ञान आणि अनुभवानुसार आपण एका लहानशा डबक्याचा भाग बनतो आणि तेच डबकं आपण महासागरा प्रमाणे भासवू लागतो. विश्वाच्या ह्या महासागरात निर्जीव ताऱ्या पासून ते लहानशा फुलपाखरा पर्यंत विविध स्तरावर जीवन आणि ऊर्जा बहरत आहेत, त्या उत्स्फूर्त आहेत. म्हणुनच आपण ही ह्याच वैश्विक अयामाचा भाग आहोत याचे भान सतत राहूदे, आणि आपले स्थान ह्याच उत्स्फूर्त अयामात कायम ठेवण्याचा प्रयंत असावा.
Thursday, 26 November 2020
Perfection doesn't exist, one can earn excellence. Quote #TM201
*Perfection doesn't exist, one can earn excellence.*
If something is not technical or mathematical, it is difficult to achieve perfection in it, it is almost impossible to achieve perfection in things related to the human mind, behavior, expectations, roles, and thoughts.
But with perseverance and effort, we can take everything to the next level called excellence.
Sometimes, perfection in a sense is what we do best.
सुविचार २०१
*परिपूर्णता कधीही प्राप्त होऊ शकत नाही परंतु आपण उत्कृष्टता मिळवू शकतो*
एखादी गोष्ट तांत्रिक किंवा गणितीय नसेल तर त्यात परिपूर्णता मिळवणे अवघड, मानवीय मनाशी, वर्तनाशी, अपेक्षांशी, व्यवहाराशी, आणि विचारांशी निगडित गोष्टी मध्ये परिपूर्णता साधणे जवळपास अशक्यच.
मात्र सातत्य आणि प्रयत्न यांच्या जोरावर सर्वच बाबींना आपण उत्कृष्ट स्तरावर नेवू शकतो.
आपण जे करतोय ते उत्कृष्ठ रित्या करणे म्हणजेच एका अर्थी परिपूर्णता होय.
Wednesday, 25 November 2020
A confused mind is a source of inactivity. Quote#TM 200
*A confused mind is a source of inactivity*
In this world, there is no shortage of dreams, no shortage of budding people, many people have their success plans as well. But whether to do it or not, future worries, impossible predictions, to take risks or not, this sort of confused mindset has proved to be the most harmful. Millions of dreams stuck in this state forever. That is why it is necessary to come out of such a confused state of mind as soon as possible and see a clear picture because clarity is a success.
सुविचार २००
*गोंधळलेले मन हे निष्क्रियतेचे स्रोत आहे*
या जगात स्वप्नांची कमी नाहीये, होतकरू लोकांची देखील कमी नाहीये, खूप लोकांकडे योजना देखील आहेत. मात्र कराव की करु नये, भविष्याची चिंता, अशक्यप्राय अंदाज, धोका पत्करावा की पत्करू नये, यामुळे गोंधळलेली मनस्थिती सर्वात जास्त अपायकारक सिद्ध झाली आहे. लाखो स्वप्न याच अवस्थेत अडकून पडलेली आहेत. म्हणूनच लवकरात लवकर अश्या गोंधळलेल्या मनस्थितीतून बाहेर येवून सुस्पष्ट चित्र पाहणे गरजेचे आहे, कारण सुस्पष्टता म्हणजे यश.
Tuesday, 24 November 2020
Why' and 'how' these can be powerful words for the dreamer. Quote #TM199
Monday, 23 November 2020
Looking at the future consequences of what we do today is foresight. Quote#TM198
*Looking at the future consequences of what we do today is foresight*
The excellence of foresight is a wonderful gift to humans. To be successful, vision is an important quality that must be embraced. Unique and extensive benefits can be availed from having a vision for the financial, family individual fronts in life. That is why one should get in the habit of thinking about the far-reaching consequences of anything he is doing now.
सुविचार १९७
*आज करत असलेल्या कामाचे भविष्यात उमटणारे पडसाद पाहणे म्हणजेच दूरदृष्टी*
मानवी क्षमतेला लाभलेली देणगी म्हणजेच दूरदृष्टी ची योग्यता.
यशस्वी होण्यासाठी दूरदृष्टी
सारखा महत्त्वाचा गुण अंगी असणे आवश्यक आहे, आयुष्यातल्या आर्थिक, कौटुंबिक वैयक्तिक आघाड्यांवर दुरदृष्टी ठेवल्यास अनन्य साधारण फायदे होऊ शकतात. म्हणूनच कोणत्याही गोष्टीच्या दूरगामी परीणामांचा विचार करण्याची सवय लावला हवी.
Sunday, 22 November 2020
Discipline opens up enormous possibilities. Quote #TM197
*Discipline opens up enormous possibilities.*
What we call discipline is freedom in actuality. It enables you to stay focus and gives you a steering wheel of self-control to sail yourself through the ocean of distractions. When you work with such freedom, you can take yourself in any direction. New horizons of possibilities are waiting for you, all those possibilities are bound to come into existence through you.
सुविचार १९७
शिस्तीमुळे शक्यतांचा असंख्य द्वारे खुली होतात*.
ज्याला आपण शिस्त मानतो ती वास्तविकतेत स्वातंत्र्यता असते. शिस्त आपणास लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करते आणि लक्ष्य विचलित करण्याऱ्या ह्या जगाच्या महासागरामधून पार जाण्यासाठी आत्म नियंत्रणाची स्टीयरिंग व्हील(चाक) प्रदान करते. आपण जेव्हा इतक्या स्वातंत्र्यासह कार्य करतो तेव्हा नक्कीच आपण स्वत: ला कोणत्याही दिशेने नेऊ शकतो, शक्यतांची नवीन क्षितिज तुमच्या आगमनाची वाट पाहत आहेत, त्या सर्व शक्यता तुमच्या द्वारे अस्तित्वात येण्यास बांधील आहेत.
Saturday, 21 November 2020
The things that control you determine the quality of your life. Quote #TM196
Quote #TM196
*The things that control you determine the quality of your life*.
There is a perception in society that the quality of our life is a reflection of the fulfillment of our thoughts and feelings associated with different stuff and expectations. The quality of life based on these external factors can be temporary. For a while, it will offer satisfaction, but after that, to live a quality life, it becomes necessary to look at the inner core of the mind. Experiencing the peace within is the primary need for living a quality life.
Let this peace control your life.
सुविचार १९६
*आपण कोणत्या गोष्टींमुळे नियंत्रित होतो यावरून जीवनाची गुणवत्ता निर्धारित होते*
निरनिराळ्या गोष्टी आणि अपेक्षा यांच्याशी संबंधित आपले विचार आणि भावभावना यांचे प्रतिबिंब म्हणजेच आपल्या जीवनाची गुणवत्ता असा समाजात एक समज दिसून येतो. बाह्य स्वरुपाच्या ह्या बाबींवर आधारित जीवनाची गुणवत्ता ही तकलादू असू शकते. काही काळा करिता ती समाधान देईल मात्र त्यानंतर गुणवत्ता पूर्ण आयुष्य जगण्यासाठी मनाच्या अंतर्गत गाभाऱ्याच्या वेध घेणे गरजेचे बनते त्या करिता अंतर्मुख होऊन शांती अनुभवणे हे गुणवत्तेचे प्रथम मानक ठरते. ह्या शांती द्वारे तुमचे जीवन नियंत्रित होऊ द्या.
Friday, 20 November 2020
It can be a mistake if we only see the mistakes of others without seeing mistakes in ourselves. Quote #TM195
*It can be a mistake if we only see the mistakes of others without seeing mistakes in ourselves.*
An intelligent person is more dedicated to improving on his weakness than to find out the shortcomings of others. One has to realize his mistakes, no one else could make him aware of it in actuality. We should spend more time empowering ourselves instead of finding faults in others.
सुविचार १९५
*स्वतः मध्ये चूक न दिसता फक्त इतरांच्या चुका दिसत असतील तर ही एक चूक असू शकते.*
एका बुद्धिमान व्यक्ती इतरांमधील कमीपणा शोधून काढण्यापेक्षा स्वतः मधील कमीपणा भरून काढण्यासाठी समर्पित राहतो.
आपल्या चुकांचे ज्ञान व्यक्तीला स्वतः व्हावे लागते इतरांकडून नव्हे. त्यामुळे इतरांच्या चूका काढत बसण्यापेक्षा स्वतः ला सामर्थ्यवान बनवण्यासाठी अधिकाधिक वेळ खर्च करावा.
Thursday, 19 November 2020
Capacity works better with clarity. Quote #TM194
Wednesday, 18 November 2020
Perfection is a process supported by the Hope. Quote #TM193
*Perfection is a process supported by the Hope*
Nobody is born perfect. Whether the glass is full or not, you must acquire the art of refilling it, it is less likely that the glass will always be full everywhere. Thus, your existing skills can't be applied everywhere, so you need to master the art of learning new skills and experience the new dimension of life.
सुविचार १९३
*परीपूर्णता ही आशे द्वारा समर्थित एक प्रक्रिया आहे*
जन्मतः च कुणी परिपूर्ण नसतो. पाण्याचा ग्लास पूर्ण भरलेला असो की नसो, आपल्याकडे तो पुन्हा पुन्हा भरत राहण्याची कला असावी लागते, ग्लास प्रत्येक ठिकाणी नेहमी भरलेलाच राहील याची शक्यता कमीच. तसेच आपली अंगीभूत कौशल्य सर्वत्र लागू होत राहतील हे शक्य नाही म्हणूनच नवनवीन कौशल्ये शिकून घेण्याची क्षमता आणि कला आत्मसात करावी आणि आयुष्याचा अनुभव पुन्हा नव्याने घेत रहावे.
Tuesday, 17 November 2020
If we take pride in the process, surely the result will make us proud and happy. Quote #TM192
Monday, 16 November 2020
Forgiveness will heal the heart and release all pain and sadness. Quote #TM191
*Forgiveness will heal the heart and release all pain and sadness.*
Forgiveness is an effective weapon. The person who can hold this weapon must be having outstanding competency, without it, forgiveness is impossible. Adopting forgiveness helps one to rejoice his own life.
Some people live in a world that feels like a real hoof around false ego, and ego is the biggest enemy of forgiveness. Ego is the root cause of mental anguish and the only effective solution to this is forgiveness, the process of forgiveness begins by forgiving yourself.
सुविचार १९१
*क्षमा केल्याने हृदयाला हायसे वाटते आणि सर्व वेदना आणि दु: ख नाहीसे होतात.*
क्षमा हे एक प्रभावी शस्त्र आहे. क्षमाभाव धारण करणाऱ्या व्यक्तीच्या अंगी उच्चप्रतीची गुणवत्ता असावी लागते. त्याशिवाय क्षमाभाव अंगी येणे शक्य नाही. क्षमाभाव अंगिकारण्यामुळे मानवाचे स्वतः चे जीवन सुखकरहोण्यासाठी मदत होते. आयुष्यभर काही माणसं खोट्या अहंकारा भोवती एक खरं खुर वाटणारं जग गुंफून जगत असतात आणि अहंकार हा क्षमा भावनेचा सर्वात मोठा शत्रू आहे. दुखः, मानसिक वेदना यांचे मूळ अहंकार असून त्यावर एकच प्रभावी तोडगा म्हणजेच क्षमा. आणि ह्या उपयाची सुरुवात सर्वप्रथम स्वतः ला क्षमा करण्या पासून व्हावी.
Sunday, 15 November 2020
Everyone is possible winner. Quote#TM190
*Everyone is possible winner*
The real meaning of winning is not only to achieve the measures set by the world but also to be happy in life by contributing to something that is good for you and the society. You may have set some goals at the social, economic, personal level, the infinite chances of achieving them are available to you, or even available to everyone, only the level of your awareness and knowledge gives you the ability to see that possibility.
So developing our awareness should be considered the primary responsibility.
सुविचार १९०
*प्रत्येकजण हा संभाव्य विजेतच असतो.*
जिंकण्याचा खरा अर्थ म्हणजे जगाने निर्धारित केलेले निर्देशांक गाठणे असे नव्हे, तर आपल्यासाठी आणि समाजा साठी हितकारक गोष्टीमध्ये आपले योगदान देत आनंदी असणे हे सुध्दा आयुष्यात जिंकणे च आहे. सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक स्थरावर तुम्ही काही ध्येये निश्चित केलेली असू शकतात, ती गाठण्याच्या अनंत शक्यता ही तुमच्या जवळ किंबहुना सर्वांन जवळ आहेत, फक्त आपल्या जाणिवेचा आणि ज्ञानाचा स्थर त्या शक्यतेला पाहण्याची योग्यता प्रदान करतो.
म्हणून आपल्या जाणिवेचा विकास करणे प्राथमिक कार्य समजावे.
Saturday, 14 November 2020
Work begins with the goal and continues with results. Quote #TM189
*Work begins with the goal and continues with results.*
Setting a goal is the primary step, further, the small results obtained through our actions play an important role in moving forward. In fact, during and after achieving success, potentially the results hold more responsibility, hence the process of achieving the goal border its area after accomplishing every outcome, then it continues to do the the process same forever. The milestone results achieved by pursuing the path to the goal give internal strength or breaks the confidence, use these results as a lesson, set another milestone, and continue
सुविचार १८९
*लक्ष्य निश्चिती ने काम सुरू होते आणि परिणामांमुळे सुरू राहते*.
लक्ष्य निश्चित करणे ही पहिली पायरी असली तरी त्यानंतर आपल्या कार्याद्वारे प्राप्त परिणामांची पुढील वाटचालीत महत्त्वाची भूमिका असते. किंबहुना यशप्राप्ती नंतर अधिकाधिक जबाबदारीयुक्त परिणाम मिळू लागतात त्यामुळे धेय्य प्राप्ती ची प्रक्रिया चिरंतर सुरूच राहते. ध्येय प्राप्तीच्या मार्गावर चालतांना मिळणारे हे परिणाम आत्मिक बल देतात किंवा आत्मविश्वास तोडू पाहतात, ह्या परिणामांचां शिकवण म्हणून वापर करत मार्गक्रमण सुरू ठेवावे.
Friday, 13 November 2020
Be open to learn from mistakes. Quote #TM188
*Be open to learn from mistakes*
If a person can make a decision or can work without making mistakes, then definitely he had worked hard to reach that level, it means, he may have made many mistakes and learned from them, gained the experience, and continued to walk on the path of progress by himself. Lessons learned from mistakes further sharpen our personality, judgment, and work and give it more and more shine.
Where there is no question of survival, there should be no problem in making bold decisions.
सुविचार १८८
*चुकांना सामोरे जाण्यास तय्यार राहा*
जर एखादा व्यक्ती न चुकता निर्णय घेवू शकत असेल किंवा काम करु शकत असेल तर त्याने ते त्या पायरी पर्यंत पोहोचण्यासाठी सर्वोपरी मेहनत केलेली असणार म्हणजेच अनेक चुका करत त्यातून धडा घेत अनुभव आत्मसात करून स्वतः प्रगती पथावर वाटचाल सुरू ठेवली असणार. चुकांमधून मिळालेले धडेच पुढे आपल्या व्यक्तिमत्त्वाला, निर्णयाला आणि कामाला धार देतात आणि अधिकाधिक चमक देतात.
जिथे जीवनाच्या अस्तित्वाचा प्रश्न नसेल तिथे धाडसी निर्णय घेण्यास हरकत नसावी.
Thursday, 12 November 2020
Your motivation should grow beyond all your cravings. Quote #TM187
Wednesday, 11 November 2020
Make sure your doubts are not limiting you. Quotes #TM186
*Make sure your doubts are not limiting you.*
Skepticism is a natural process. This is an arrangement made by nature so that we do not get stuck in any difficult situation. But skepticism should be used to make ourselves aware of the real situation and the danger, it should not just be an image of unrealistic imagery. This participation should be used as a gauge of risk measurement before dealing with the situation so that naturally the motivation, patience, perseverance within you can be given the right turn and you can go beyond the doubt and establish yourself on a new high step.
सुविचार १८६
*तुमच्या शंका तुम्हाला मर्यादीत तर करत नाही ना याची खात्री करावी.*
संशय ही एक नैसर्गक प्रक्रिया आहे. आपण कोणत्याही अवघड परिस्थितीत अडकु नये म्हणूनच निसर्गाने केलेली ही व्यवस्था आहे. मात्र संशय हा खऱ्या परिस्थितीची आणि धोक्याची जाणीव करून देणारा असावा फक्त अवास्तव कल्पनांच्या प्रतिमा उभ्याकरून आपले मानसिक खच्चीकरण करणारा नसावा. ह्या संशयाचा वापर परिस्थितीशी दोन हात करण्याआधी धोक्याच्या मोजमापाचे गमक म्हणून करावा त्यामुळे नैसर्गिकरीत्या तुमच्या अंतर्गत असलेल्या प्रेरणा, धैर्य, चिकाटीला योग्य ते वळण देता येइल आणि संशयाच्या पलीकडे जावून स्वतः ला नवीन उच्च पायरीवर प्रस्थापित करता येऊ शकेल.
Tuesday, 10 November 2020
We are the expression of what we allow to go in. Quote#TM185
*We are the expression of what we allow to go in*
There are always a lot of things happening around us, we allow certain things to come into our mind and gradually those things occupy our mind, and then it becomes a part of our personality.
So it is very important to watch what we allow to come inside. Often a lack of awareness makes the negative things very easy to come inside and the positive and developmental things very hard to stay in the mind.
That is why what is going to be a part of our personality, should be chosen responsibly.
सुविचार १८५
*आपण ज्या गोष्टी आपल्यामध्ये घेतो त्या गोष्टीच आपली अभिव्यक्ती बनतात.*
नेहमी आपल्या आजूबाजूला असंख्य गोष्टी घडत असतात, त्यातील काही निवडक गोष्टीना आपण आपल्या मनात येण्याची मुभा देतो आणि हळू हळू त्या गोष्टी आपलं मन व्याप्त करून टाकतात आणि नंतर त्या आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनतात.
म्हणून आपण कोणत्या गोष्टीना आतमध्ये येण्याची मुभा देतोय हे पाहणं फार महत्त्वाचं ठरतं. बऱ्याचदा जाणिवेच्या कमतरतेमुळे नकारात्मक गोष्टीना फार कुरवाळले जाते आणि सकारात्मक आणि विकासात्मक गोष्टीना फारच कमी वेळ मनामध्ये थारा दिला जातो.
म्हणूनच जी गोष्ट आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनणार आहे ती जबाबदारीने निवडण्याचा आपला प्रयत्न असायला हवा.
Monday, 9 November 2020
It is your work, not words that determine who you are. Quote #TM184
*It is your work, not words that determine who you are*.
If the spoken words are in the harmony with the mind, then the words are meaningful. Beyond that, when we respect our own words and take actions, the world will recognize us for keeping our promise. that is, the commitment of the person is measured by his actions by the society. That is why it is said that bow down to the one who walks his talk.
सुविचार १८४
*आपण कसे आहोत याचे निर्धारण आपल्या शब्दांमुळे नव्हे तर आपल्या कार्यामुळे होते*
उच्चारलेले शब्द जर मनाशी एकरूप असतील तर शब्दांना अर्थ आहे, त्याही पुढे, दिलेल्या शब्दांप्रमाने तुम्ही त्यावर केलेल्या कृतीमुळे जग तुम्हाला ओळखेल, म्हणजेच शब्द उच्चारण करणाऱ्याची वचनबध्दता समाजात त्याच्या कृतीद्वारे मोजली जाते. म्हणूनच म्हंटले जाते बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.
Sunday, 8 November 2020
Look at the world as a possibility.Quote #TM183
Saturday, 7 November 2020
Start and end the day with gratitude. Quote #TM182
*Start and end the day with gratitude*
Gratitude is a tool to receive satisfaction in life. Even if we hold ourselves accountable for what we are today, we must not forget that our family, society, loved ones, friends, nature, and life energy have all contributed unimaginably to our life. Let's thank everyone and everything for making us what we are today and enjoy the pleasant feeling of gratitude that is available to all of us.
सुविचार१८२
*दिवसाची सुरुवात आणि शेवट कृतज्ञ व्यक्त करून करा*
कृतज्ञता ही जीवनाचं समाधान देणार साधन आहे. आज आपण जे आहोत त्यासाठी जरी आपण स्वतःला जबाबदार मानत असलो तरीही, आपले कुटुंब, समाज, निकटवर्तीय, मित्र, निसर्ग आणि जीवन ऊर्जा ह्या सर्वांनी आपल्या जडणघडणीत अकल्पनीय मदत केलेली असते ती विसरता कामा नये. आज आपण जे आहोत त्यासाठी ह्या सर्वांचे अभार मानून सर्वांसाठी उपलब्ध असलेला असा हा कृतज्ञतेचा आनंद उपभोगुया.
Friday, 6 November 2020
The eternal source of energy is within you. Quote #TM181
*The eternal source of energy is within you.*
We also have an existence at an energy level than the physical and mental level. Rarely do we realize our energetic potential, the source of this life energy is deeply rooted within us, the realization of this energy we can get when we are completely focused on anything, this source of infinite flowing energy is streaming uninterrupted within all of us. With absolute devotion, we can create wonderful miracles with this energy.
सुविचार१८१
*उर्जेचा शाश्वत स्त्रोत तुमच्यामध्ये आहे.*
शारीरिक मानसिक स्तरा पेक्षा वेगळे ऊर्जेच्या स्तरावर आपले एक अस्तित्व आहे. क्वचित प्रसंगी आपल्याला आपल्या उर्जात्मक क्षमतेची जाणीव होत असते, ह्या जीवन ऊर्जेचा स्रोत आपल्यातच खोलवर रुजलेला आहे, या ऊर्जेची अनुभूती आपल्याला कोणत्याही गोष्टी वर संपूर्ण केंद्रित केल्यावर मिळू शकते, अनंत वाहणारा ऊर्जेचा हा झरा आपल्याच अंतर्मनात अखंड वाहतो आहे आणि त्याला केंद्रित करून अप्रतिम निर्मिती आपण करतो आहोत.
Thursday, 5 November 2020
Make a habit to change mindset when it is required to change. Quote #TM 180
Wednesday, 4 November 2020
Your future has a purpose. Quote #TM179
*Your future has a purpose.*
We can't experience everything which is happening in the universe with our limited ability.
Nothing in the universe happens without a purpose but we cannot experience this on a cognitive level. Your presence in this universe is of paramount importance and you are on your way to fulfilling important objectives in the future and you are going to make a significant contribution to some unique events. Believe it
सुविचार १७९
आपल्या भविष्याचा एक उद्देश आहे.
विश्वात सगळ्याच गोष्टी आपल्या मर्यादित क्षमतेला जाणवतील असे नाही. विश्वात कोणतीही गोष्ट अमूल्य उद्देश असल्याशिवाय घडत नाही. मानसिक स्थरावर आपल्याला याची अनुभूती घेणे शक्य नाही.
मात्र ह्या विश्वात आपल्या असण्याला असाधारण महत्व आहे आणि भविष्यातील महत्त्वपूर्ण उद्देशांच्या परीपूर्तीसाठी तुमची वाटचाल होत आहे आणि काही अनन्यसाधारण घटनांमध्ये तुमचं महत्त्वाचं योगदान तुम्हाला द्यायचं आहे. विश्वास ठेवा.
Tuesday, 3 November 2020
Everything is possible when your thoughts, words, and actions match with each other. Quote #TM178
Monday, 2 November 2020
Every challenge you face should fire your inner resolve.Quote #TM177
Sunday, 1 November 2020
To be with yourself is to be with the universal energies. Quote #TM176
Design the character
You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...
-
एखाद्या प्राण्याला आरश्या समोर ठेवल्यास त्याची आश्चर्यजनक वागणूक काय असेल हे आपणास वेगळे सांगावयास नको, अश्या प्रकारचे कित्येक व्हिडिओस...
-
वरील चित्र लहानां पासून मोठ्यानं पर्यंत कुणालाही दाखवून यांतील सद्गृहस्थ किंवा Gentlemen कोण असे विचारल्यास? नक्कीच अधिकाधिक लोक, डावीकडील ...
-
संदर्भ लागल्या शिवाय आपल्याला गोष्टींची उकल होणे जरा अवघडच. अचानक कुणीतरी व्यक्ती आपल्याला रस्त्यावर भेटते, आपल्याशी बोलते मात्र ती व्यक्ती ...