Thursday 29 April 2021

कोरोना काळ- पुढील वाटचाल


परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे आणि प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत. कोणतेही सरकार किंवा प्रशासन एकट्याने हे संकट थोपवणे म्हणजे वाहत्या वार्याला लहानश्या जाळ्यात पकडण्या सारखे आहे. कोरोनाच्या ह्या वादळाला थोपवायचे असेल तर पर्वत उभारावा लागेल. हा पर्वत दुसरे तिसरे कुणी नव्हे तर फक्त आणि फक्त सामान्य लोकच उभारू शकतात. सरकारी यंत्रणा तोकड्या आहेत. त्या लागलीच वाढवणे किंवा प्रगत करणे प्रत्यक्षात शक्य नाही. आणि सामान्य लोकांनी तशी परिकल्पना करण्यात वेळ घालवू नये. हि जबाबदारी आपण आणि शासन दोघांनी मिळून सांभाळायची आहे. शासन फक्त दिशादर्शक आहे तर प्रत्यक्षात शिडांची हालचाल तुम्हा-आम्हाला करायची आहे. तरच कोरोनाच्या ह्या उफ़ाळत्या महासागरातून जनसामान्यांची नाव तरून जाऊ शकेल. कोणताही अन्य पर्याय पूरक नाही हे ध्यानी असुदे. सर्व जबाबदारी इतरांची आणि सरकारची असे गृहीत धरण्याची सवय सोडून द्यावी.


आरोग्याच्या सोयी लोकांना उपलब्ध करून देण्याच्या कामाच्या वेगाची कोरोनाच्या प्रचंड संसर्ग वेगाशी तुलना करणे शक्यच नाही,

त्यामुळे संसर्गाला आळा घालणे प्राधान्य क्रमात प्रथम आहे. अकल्पित हानी होण्या आधी मोठा प्रयत्न होणे अनिवार्य आहे.


१. जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या सातत्यासाठी संपर्करहित व्यवस्थेची निर्मिती करण्यावर भर दिला जावा. आणि तिचा वापर जवळपास अनिवार्य केला जावा. जनतेने जास्तीत जास्त अश्या व्यवस्थेचा वापर कसा करता येईल यावर लक्ष्य केंद्रित करावे. संपर्करहित व्यवस्थेत घरपोच वस्तू आणि सेवा पुरवल्या जाव्यात. मात्र अश्या व्यवस्थेत कार्य करणाऱ्या सर्व कामगार आणि निगडित व्यक्तींचे लसीकरण आणि वारंवार कोवीड चाचणी अनिवार्य करावी.


२. स्थानिक संपर्काचे महत्व: उच्च स्थरावर घेतलेला परिणामकारक निर्णय जोपर्यंत स्थानिक पातळीवरील शेवटच्या घटकांकडून अंमलात आणला जात नाही तोपर्यंत सगळंच निरर्थक. लोकसहभागाशिवाय कोरोनावर मात करणे शक्यच नाही. आणि याकामी अजूनतरी सर्रार्स वापरल्या जाणाऱ्या समाजमाध्यमाचा म्हणावा तितका प्रभावी वापर केलेला दिसून येत नाही. स्थानिक पातळीवर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल, प्रशासनाचे कनिष्ठ पातळीवरील अधिकारी, तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या व्यक्तींनी व्हाट्सअप ग्रुप बनवून त्यांच्या परिसरातील जास्तीत जास्त सोसायटी, मंडळे, दबावगट, सामाजिक संस्था, यांचे पदाधिकारी आणि  जास्तीतजास्त सामान्य नागरिक यांच्या पर्यंत त्यांच्या हातातील मोबाइलला द्वारे पोहोचण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यात महत्वपूर्ण माहिती तर पाठवाविच मात्र नियम पाळणाऱ्यांचे कौतुक हि करावे आणि प्रोत्साहान द्यावे. नियम पाळण्याची जबाबदारी नागरिकांमध्ये वितरित करावी. नागरिकांमध्ये जबाबदारीचे वितरण हा या कामी सर्वात प्रभावी उपाय आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहिचण्याचा व्हॅटस्सप हा एक प्रभावीमार्ग आहे. तसेच ह्या व्हॅटस्सप ग्रुप द्वारे कोविद काळात एकमेकांना अत्यावश्यक वेळी मदत हि पोचवता येऊ शकेल.


३. फैलाव रोखणे: ह्या अदृश्य शत्रूचा फैलाव होण्याचा महत्वाचा मार्ग म्हणजे परस्पर संपर्क, हल्लीच्या संशोधनानुसार हवेतून जरी प्रसार होत असेल तरीही लोकांनी एकमेकांच्या संपर्कात न आल्यास हा फैलाव मोठया प्रमाणात रोखला जाऊ शकतो. दुसरा कोणताही उपाय न करता फक्त ह्या एकाच उपायात संपूर्ण जनता सामील झाली तरीही फार मोठा परिणाम साधता येऊ शकेल. पण उपाय जितका परिणामकारक तितकाच तो अवघड हि. महिना भरासाठी एकमेकांशी संपूर्ण संपर्क तोडणे अशक्यच. जनसामान्यांमध्ये याविषयी परिपक्वतेचा अभाव असल्याने, फक्त बळाचा वापर करूनच हे शक्य आहे असे सरकारचे मत झालेले दिसून येते, मात्र बळाचा वापर करण्यावरही मर्यादा असल्याने किंवा तसे करूनही इप्सित परिणाम साधने अवघडच. कारण शिस्त पाळण्यापेक्षा मोडण्याकडे आमचा कल जास्त. असे गृहीत धरावे कि बळाचा वापर शून्य करून हे सध्या करायचे आहे.


लसीकरण: लसीकरण आणि चाचण्या घरोघरी जाऊन केल्या गेल्यास लवकरात लवकर परिणाम साधता येऊ शकेल. या कामी स्थानिक पातळीवरील सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्तींच्या मनुष्य बळाचा वापर केल्यास मनुष्यबळाचा तुटवडा होणार नाही. फक्त याची नियमन शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्या मार्फत व्हावे.


प्रत्येकाने स्वतः ला सक्षम बनवावे. आपले आरोग्य सरकार आणि आरोग्य संस्थांवर न सोडता स्वतः हुन, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर भर द्यावा. कोरोनाच्या ह्या समस्येला एक-दोन वर्षांची समस्या न मानता पुढील १० पेक्षा अधिक वर्षांसाठी आपली रोगप्रतिकारशक्ती औषधांशिवाय उत्कृष्ट कशी ठेवता येईल याचे नियोजन करावे.


नागरिकांनी जागरूक होऊन सहभाग घेण्याची हि वेळ आहे. प्रत्येक नागरिक या युद्धातील महत्वाचा सैनिक आहे.

Corona times- Way forward

The situation is out of hand and efforts seem to be falling short. Preventing this crisis by any government or administration alone is like catching the wind in a small net. If we want to stop this storm of Corona, we have to raise mountains. This mountain can be built only by ordinary people and no one else. Government systems are fragmented, it is not really possible to increase or advance that immediately, and we people should not spend time imagining and expecting that to happen in such a short time. This responsibility should be handled by both, we and the government. The government is just a guide, but in reality, you and I should move the sailes. Only then can the ship of the general public be saved from this boiling ocean of the Corona. There is no other option. The habit of assuming all the responsibility is of others and the government should be given up.

The speed with which health facilities are made available to the public cannot be compared to the rapid transmission of the corona.

Therefore, controlling the infection is the first priority and a BIG effort must be made before unimaginable harm can occur.


1. Emphasis should be placed on creating a contactless system for the continuity of essential goods and services. And its use should be made almost mandatory. The public should focus on how to make the most of such a system. Household goods and services should be provided in a contactless system like home deliveries. However, vaccination and frequent covid testing should be made mandatory for all workers and persons working in such systems.


2. Importance of local communication: Effective decisions made at the highest level are meaningless unless implemented by the last elements at the local level. Corona cannot be defeated without public participation. And it doesn't seem to be using social media as effectively as it should be. At the local level, police constables, junior administration officials, as well as social leaders should form WhatsApp groups to reach out to as many societies, mandals, pressure groups, social organizations, office bearers and the general public in their area through their mobile phones. In addition to sending important information, those who follow the rules should be appreciated and encouraged. The responsibility of following the rules should be distributed among the citizens because the most effective solution to this crisis is to distribute responsibility among the citizens. WhatsApp is an effective way to reach more people. Also, this WhatsApp group can help each other in times of emergencies.


3. Preventing the spread: The most important way of spreading this invisible enemy is through interaction, according to recent research, even if it is spread through the air, this spread can be largely prevented if people do not come in contact with each other. Even if the entire population joins in this single measure without any other solution, it can have a huge impact. But the more effective the solution, the more difficult it is. It is impossible to completely cut off contact with each other for a month. Due to the lack of maturity in the masses, the government seems to believe that this is possible only through the use of force, but the use of force is limited or the means of coping are difficult to achieve. Because we are more inclined to break than to follow discipline. Assume that this is to be done by using zero force and use innovative ways.

4. Vaccination: Immediate results can be obtained if vaccinations and tests are done at home. If the manpower of local-level social workers and politicians is used in this work, there will be no shortage of manpower but it should only be regulated by a government medical officer.

5. Everyone should strengthen themselves. Instead of leaving your health to the government and health institutions, focus on boosting your immune system. Instead of treating corona as a problem for a year or two, plan for how to keep your immune system healthy for more than 10 years without medication.

It is time for citizens to be aware and participate. Every citizen is an important soldier in this war.

Obscurity erodes morale, while clarity boosts morale. Quote #TM348

Quote #TM348

Obscurity erodes morale, while clarity boosts morale.

Clarity about your abilities and thoughts keeps your mindset in the right state to find a way out of any situation. The most important reason behind raising morale is clear awareness.
Based on this awareness, it is possible to face a difficult situation. Therefore, you should be aware of your abilities.

सुविचार ३४८

अस्पष्टता मनोधैर्य खच्ची करते तर सुस्पष्ठता मनोधैर्य उंचावते.

आपल्या क्षमतेविषयी आणि विचारांमधील स्पष्टता कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आपली मानसिकता योग्य अवस्थेत ठेवते. मनोधैर्य उंचावण्या मागे महत्वाचे कारण म्हणजेच सुस्पष्ठ जाणीव.
या जाणिवेच्या आधारे बिकट परिस्थीला तोंड देणे शक्य होते.त्यामुळे आपल्या क्षमतांची स्पष्ठ जाणीव करून घ्यावी.

Tuesday 27 April 2021

Growing awareness will show you a new and easier form of life. Quote #TM347

 Quote #TM347

Growing awareness will show you a new and easier form of life.

Getting caught in the trap of mental games is the biggest loss in life. You exist apart from feelings and thoughts. And as soon as you realize it, your life experience will change completely. And you will begin to enjoy life from a new perspective.


सुविचार ३४७

वाढती जाणीव तुम्हाला जीवनाचे नवीन आणि सुलभ रूप दाखवेल.

मानसिक खेळाच्या जाळ्यात अडकणे हेच आयुष्यातील सर्वात मोठे नुकसान आहे. भावना आणि विचार यांच्या पेक्षा वेगळे तुमचे अस्तित्व आहे. आणि त्याची जाणीव होताक्षणीच तुमची जीवनाची अनुभूती संपूर्ण बदलून जाईल. आणि जीवनाचा आस्वाद एका नवीन दृष्टीकोनातून घेऊ लागलं.

Sunday 25 April 2021

We may be a big person but insignificant in the vast expanse of the universe. Quote #TM346

Quote #TM346

We may be a big person but insignificant in the vast expanse of the universe.

Every atom in our body is a gift from the universe, but our mental universe is self-created.
We try to become very big in the mental universe due to a lack of realization of our insignificant existence on the universal scale and underestimate the cosmic forces. This awareness of your smallness brings spiritual peace in life.

सुविचार ३४६ 
कदाचित आपण खूप मोठे व्यक्ती असू मात्र विश्वाच्या अफाट पसाऱ्यात नगण्य.

आपल्या शरीरातील प्रत्येक अणू ह्या विश्वाची देणं आहे, आपले मानसिक विश्व मात्र स्व निर्मित.
अगदीच नगण्य अस्तित्व असलेले आपण मानसिक विश्वात फार मोठे बनू पाहतो आणि वैश्विक बलांना कमी लेखू लागतो. आपल्या खुजेपणाची जाण हि आत्मिक शांती मिळवण्याचा पर्याय आहे.

It is important to have patience to do the right and necessary things. Quote #TM345

Quote #TM345

It is important to have patience to do the right and necessary things.

Patience means making decisions by keeping oneself stable. The basic premise of restraint is the ability to observe the situation by detaching oneself from any external or internal fluctuations. Patience helps to make the right decision in order to get the desired result.

सुविचार ३४५

योग्य आणि गरजेच्या गोष्टी आपल्याकडून होण्यासाठी संयम असणे फार महत्वाचे आहे.

संयम म्हणजे स्वतःला स्थिर ठेवून निर्णय घेणे. कोणत्याही बाह्य अथवा अंतर्गत चलबिचली पासून स्वतःला अलिप्त ठेवून परिस्थितीचे अवलोकन करण्याची क्षमता हीच संयमाचा मूलभूत आधार आहे. आणि संयमामुळेच योग्य निर्णय घेण्यास मदत होते आणि परिणामी इच्छित परिणाम साधला जातो.

Don't forget that you are your own best friend in difficult times. Quote #TM 344

Quote #TM 344

Don't forget that you are your own best friend in difficult times.

Whether one comes to help or not in difficult times, you should not give up your perseverance and hope. It is difficult to overcome a difficult time with a lost mind, but if you persevere, a ray of hope will surely show you the way.


सुविचार ३४४

कठीण समयी स्वतः चा सर्वात मोठा सोबती तुम्ही स्वतः आहेत, विसरू नका.

कठीण समयी कोणी कामास येवो अथवा ना येवो, तुम्ही तुमची जिद्ध आणि आशा सोडून स्वतः ची साथ सोडू नये.

हताश मनाने कठीण वेळेवर मत करणे अवघड आहे, मात्र जिद्ध कायम ठेवल्यास आशेचा किरण नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवेल.

If truth is not pleasing to our ego, then we should give up ego before denying it. Quote #TM343

Quote #TM343

If truth is not pleasing to our ego, then we should give up ego before denying it.

The ego is one of the major factors that give direction to life. The ego casts a heavy veil over our eyes which makes it difficult to see things in their original form. So, at least once, everyone must look at everything that you don't agree with, from an egoless eye.

सुविचार ३४३

सत्य हे आपल्या अहंकाराला रुचत नसेल तर ते नाकारण्याआधी अहंकार सोडून पाहावा.

अहंकार हा जीवनाला दिशा देणाऱ्या मोठ्या घटकांपैकी एक आहे. अहंकार आपल्या डोळ्यांवर घट्ट आवरण चढवतो ज्यामुळे गोष्टी त्यांच्या मूळ स्वरूपात पाहता येणे अवघड होते. म्हणून एकदा का होईना प्रत्येकाने स्वतः ला न पटणाऱ्या गोष्टीला अहंकारविरहित भावाने जरूर पाहावे.

Constantly evolving is the sign of vitality. Quote #TM342

Quote #TM342

Constantly evolving is the sign of vitality.

Every breath is a new impetus for the processes within the body, with each breath every cell is filled with new energy and we call all these collectively the process of life, that is, basically every moment you are filled with new energy and your fundamental nature is to keep evolving your energies.


सुविचार ३४२

सतत विकसित होत राहणे हाच जिवंतपणाचे लक्षण आहे.

प्रत्येक श्वास म्हणजे शरीरांतर्गत प्रक्रियांसाठी नवीन उमेद असतो, प्रयेक श्वासासोबत प्रत्येक पेशी नवीन ऊर्जेने भरून जात असते आणि आपण ह्या सर्वाना एकत्रित पाने जीवनाचे नाव देतो, म्हणजेच मूलभूत रित्या प्रत्येक क्षसनाला नवीन ऊर्जेने भरीत होत विकसित होत राहणे हाच तुमचा मूळ स्वभाव आहे.

Sunday 18 April 2021

Winning is the result of your mental state. Quote #TM341

Quote #TM341

Winning is the result of your mental state.

Often we see situations in which many gave up in spite of having the ability, the main reason for such defeats can be not able to reach and maintain the right mental state during such situations. The winning mentality can be different for each occasion, sometimes aggressive, sometimes steady and sometimes alert. And maintaining the right mental state helps to achieve victory.

सुविचार ३४१ 

जिंकणे हा तुमच्या मानसिक अवस्थेचा परिणाम आहे.

अनेकदा असे प्रसंग आपण पाहतो ज्यात क्षमता असून देखील हार पत्करावी लागते, याचे मुख्य कारण आहे कि प्रसंगादरम्यान योग्य ती मानसिक स्थिती गाठणे आणि कायम ठेवणे. जिंकण्यासाठी लागणारी मानसिकता प्रत्येक प्रसंगासाठी वेगवेगळी असू शकते, कधी आक्रमक, कधी स्तिर तर कधी सतर्क.  आणि योग्य ती मानसिकता विजयश्री साकारण्यास मदत करते.



Happiness cannot be obtained from the outside, it is created. Quote #TM340

 Quote #TM340 

Happiness cannot be obtained from the outside, it is created.

We associate our happiness with external things that change according to the situation, and this creates the impression that the mind is happy only when external things become like our mind. That is, the factory of happiness rises outside our minds. But this chemical process of happiness takes place within us, and it is controlled from within.


सुविचार 340


आनंद हा बाहेरून मिळत नसतो तर तो निर्मित होत असतो.

परिस्थिती नुसार बदलणाऱ्या बाह्य गोष्टींशी आपला आनंद आपण जोडतो, आणि त्यामुळे असा भास निर्माण होतो कि बाह्य गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या तरच मन आनंदी होते. म्हणजेच काय तर आनंदाची फॅक्टरी आपल्या मनाच्या बाहेर उभारतो. मात्र आनंदाची हि रासायनिक प्रक्रिया आपल्या अंतर्गतच होत असते, आणि तिचे नियमन  हि आतमधूनच होत असते.

Our psychology is an illusion like a rainbow, perhaps more realistic. Quote #TM 339

Quote #TM 339

Our psychology is an illusion like a rainbow, perhaps more realistic.

Love, happiness, sorrow, anger, greed, contentment, all these emotions and mental states are waves floating on the illusionary surface of the mind, it can only be experienced within us, it has nothing to do with the real cosmos, just like the colours of the rainbow seem real but actually, it doesn't exist.


सुविचार 339

आपले मानसिक विश्व् म्हणजे इंद्रधनुष्यासारखा भास आहे, कदाचित जास्त खरा वाटणारा.

प्रेम, सुख, दुःख, राग, लोभ, समाधान या सगळ्या भावना आणि मानसिक अवस्था एक भासमान प्रतलावर उमटणारे तरंग आहेत, त्याचा अनुभव फक्त आपल्या आतमध्येच घेता येतो, प्रत्यक्ष विश्वाशी मात्र त्याचा काही संबंध नाही अगदी जसे इंद्रधनुष्यातील रंग खरे वाटतात मात्र प्रत्यक्षात त्यांचे अस्तित्व असत नाही.

Maintaining an average mental state, even in difficult situations, is the ability to endure stress. Quote #TM 338

Quote #TM 338 

Maintaining an average mental state, even in difficult situations, is the ability to endure stress.


Stressful situations affect your emotions in the first place, and controlling emotions is like changing the direction of the wind. But if you cultivate a deep sense of self-detachment, you will be able to control your emotions by looking at the outside world as a witness.

सुविचार ३३८ 

बिकट परिस्थिती सुद्धा सर्वसाधारण मानसिक अवस्था कायम ठेवणे म्हणजेच तणाव सहन करण्याची योग्यता.


तणावयुक्त परिस्थिती सर्वप्रथम आपल्या भावना प्रभावित होतात आणि त्याना नियंत्रित ठेवणे म्हणजे वाऱ्याची दिशा बदलण्यासारखे आहे. मात्र मनात खोलवर त्यागवृत्ती जोपासल्यास बाह्यपरिथिती ला एक साक्षीदारा प्रमाणे पाहून आपल्या भावना नियंत्रणात ठेवता येऊ शकतात.

Tuesday 13 April 2021

Achieving more comfortable living isn't an effective goal, one must work on enhancing awareness about life. Quote #TM337

 Quote #TM337

*Achieving more comfortable living isn't an effective goal, one must work on enhancing awareness about life.*

Awareness makes everything transparent. Your higher level of awareness will keep you out of resistance. Even if there is friction, your nature will remain silent due to your increased awareness.

सुविचार ३३७ 

*अधिक आरामदायक जीवन मिळवणे हे एक प्रभावी ध्येय नाही, एखाद्याने जीवनाबद्दल जागरूकता वाढविण्यावर कार्य केले पाहिजे.*

जागरूकता सर्वकाही पारदर्शक बनवते. आपली उच्च पातळीची जागरूकता आपल्याला प्रतिकार करण्यापासून दूर ठेवेल. जरी भांडण होत असले तरीही, आपल्या वाढत्या जागरूकतामुळे आपला स्वभाव शांतच राहील.

There is something beyond the feelings and thoughts. That's real you. Absolutely still. Quote# TM336

Quote# TM336

*There is something beyond the feelings and thoughts. That's real you. Absolutely still.*

Understanding the process of life itself is so mysterious that we should not misinterpret it simply as a psychological complication. Constantly changing thoughts and emotional states are just a surface wave, our real existence is hidden even deeper.

सुविचार ३३६

*भावना आणि विचारांच्या पलीकडे काहीतरी आहे. जे खरं आहे अगदी स्तब्ध.*

आयुष्याची प्रक्रिया स्वतः समजून घेणे इतकी रहस्यमय आहे की आपण केवळ मनोवैज्ञानिक क्लिष्ठता म्हणून त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. सतत बदलणारे विचार आणि भावनिक स्थिती ही केवळ पृष्ठभागाची लाट असते, आपले वास्तविक अस्तित्त्व अगदी खोलवर दडलेले आहे.

Saturday 10 April 2021

It is a self- insult to crawl despite having the ability to stand firmly. Quote #TM335

Quote #TM335

 *It is a self-insult to crawl despite having the ability to stand firmly*

Rather than crawling and being safe on an ideological level, Stumbling to stand by our own is anytime better. It will take a lot of hard work to stand on a personal ideological level, but no matter how hard you try, trying to make yourself strong will definitely take you beyond the crawlers.

सुविचार
 *उभे राहण्याचे सामर्थ्य असून सुद्धा रांगत राहणे हा स्वतः चा अपमानच म्हणावा लागेल *

वैचारिक पातळीवर रांगून सुरक्षित राहण्यापेक्षा धडपडत उभे राहणे केव्हाही चांगले. वैयक्तिक रित्या उभे राहण्यासाठी नक्कीच जास्त मेहनत करावी लागेल मात्र धडपडत का होईना स्वतः ला प्रगल्भ बनवण्याचे प्रयत्न नक्कीच तुम्हाला रांगणाऱ्यांपेक्षा पुढे नेऊन सोडतील.

Some simple things​ have the power to make a big difference. Quote #TM334

 Quote #TM334


​*Some simple things​ have the power to make a big difference.*

Our whole life can be changed if we change some of the things that we do every day but do not notice easily. Just like your sitting posture, if you just sit up straight, you can avoid hundreds of diseases, or if you always chew for a long time while eating, stomach and other major body problems will not occur, and if you smile for only 10 seconds every morning, you will feel energetic. By doing so many small things we can make a big difference in our lives.

सुविचार
*काही सोप्या गोष्टींमध्ये मोठे बदल घडवण्याची सुप्त शक्ती असते.*

आपण रोज करत असलेल्या मात्र सहज लक्ष्यातहि न येणाऱ्या काही गोष्टींमध्ये बदल केल्यास आपले संपूर्ण जीवनाचं  बदलून  जाऊ  शकते. जसे आपली बसण्याची पद्धत, फक्त नेहमी ताठ बसल्यास शेकडो रोगांपासून दुसरं राहता येते, किंवा जेवताना नेहमी जास्त वेळ चावून खाल्यास, पोटाच्या आणि शरीराच्या इतर मोठ्या समस्या उद्भवणारच नाहीत, तसेच रोज सकाळी फक्त १० सेकंड स्मित केल्यास उर्जावान असल्याचे जाणवेल. अश्या अनेक लहान गोष्टी करून देखील जीवनात आपल्याला मोठं बदल घडवता येऊ शकतो.

While managing what is happening in the world, you also need to be aware of what is happening inside you. Quote #TM333

 Quote #TM333


*While managing what is happening in the world, you also need to be aware of what is happening inside you.*

Since our intellect is projected externally, we spend time and effort in planning all the external things, but let us not ignore the fact that true happiness and success comes from managing the things that are going on inside us.

सुविचार
जगात काय घडावं याची व्यवस्था करण्या सोबतच आपल्या आतमध्ये काय घडावं याची सुद्धा जाणीव ठेवावी.

आपली प्रज्ञा हि बाह्य प्रदर्शित होत असल्याने बाहेरील सर्व गोष्टींचे नियोजन करण्यात आपण वेळ खर्च करून कष्ट हि करत असतो, मात्र खरा आनंद आणि यश आपल्या अंतर्गत चाललेल्या गोष्टींचे व्यवस्थापन केल्याने होत असते हे ध्यानी असुदे.

Thursday 8 April 2021

If you are not happy from the inside, nothing on the outside can make you happy. Quote #TM332

Quote #TM332

*If you are not happy from the inside, nothing on the outside can make you happy.*

We think if something is happening as per our wish, then it is happiness.  But if we are calm and stable deep inside, it does not make much difference even if the external things do not happen as per our wish, as no one has control over the outside world in actuality. So everyone should study and strive for inner stability which will create a permanent touch of happiness.

सुविचार ३३२

*जर आपण आतून आनंदी नसाल तर बाहेरील कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंद देवू शकणार नाही.*

मनासारखे होणे म्हणजे आनंदी होणे असा एक समज निर्माण होतो. मात्र खोलवर मनात एक स्थिरता असेल तरीही बाहेरील गोष्ठी मनासारख्या झाल्या नाहीत तरी फारसा फरक पडत नाही.
आणि बाहेरील गोष्टींचे नियंत्रण कुणाकडे ही नसते. त्यामुळे अंतर्गत स्थिरता आणि आनंद कसा मिळू शकेल याचा प्रत्येकाने अभ्यास करून त्यासाठी प्रयत्न करावा.

Wednesday 7 April 2021

Allow yourself to be transformed. Quote#TM331

Quote #TM331

*Allow yourself to be transformed.*

We want change in many walks of our life, but we hold our old selves very tight and resist the change, unknowingly.  To shift our being, it is necessary to let go of the 'old self' that is rooted in our individuality, and only then can the desired transformation take place.

सुविचार ३३१

*स्वतःला रूपांतरित होऊ द्या*

आपल्याला जीवनातली बऱ्याच गोष्टींमध्ये परिवर्तन हवे असते. मात्र आपण स्वतः तितकच घट्ट रोखून ठेवत बदलास विरोध करतो, नकळतपणे. वृत्ती बदलण्यासाठी स्वतः मधील चिकटून बसलेला 'जुना मी' सोडणे अनिवार्य आहे. आणि त्या नंतरच हवे असलेले परिवर्तन होणे शक्य आहे.

Tuesday 6 April 2021

It cannot be a great work if you are not putting your heart into it.Quote #TM330

Quote #TM330

*It cannot be a great work if you are not putting your heart into it*.

One can put his heart into a work that is closest to his heart. This means it should not be driven by other external forces, such as prestige, lust, selfishness, etc. The heart can be involved only if the mind has a passion for work or one develops the passion later. Thereafter the work automatically begins to get better.

सुविचार ३३०

*जर आपण आपले हृदय समर्पित करत नसाल तर ते एक महान कार्य होऊ शकणार नाही.*

हृदय समर्पित करू शकू असे काम तेच असू शकते जे आपल्या हृदयाच्या जवळ असेल. म्हणजेच त्या कार्याला इतर कोणतीही बाह्य शक्ती, जसे, पत प्रतिष्ठा, लालसा,स्वार्थ प्रभावित करीत नसेल. मनात कार्या प्रती ओढ असेल किंवा नंतर ती निर्माण झाली असेल तरच त्यात हृदय गुंतू शकते. आणि कार्य आपोआपच उत्कृष्ट होऊ लागते. 

Monday 5 April 2021

Gratitude makes life blissful. Quote #TM329

Quote #TM329

*Gratitude makes life blissful.*

Every aspect of your life is influenced by someone else.  Even our birth is a gift from others.  The moment we identify ourselves as something it takes us away from reality.  The fact is that our very existence is basically an illusion that is created by the nature by putting some atoms together, this awareness and gratitude towards everything establishes inner peace.

सुविचार ३२९


*कृतज्ञता जीवन आनंदमय बनवते.*

आपल्या जीवनातल्या प्रत्येक पैलूवर इतर कुणाची तरी छाप असते. अगदी आपला जन्म ही सुध्दा इतरांची देणगी असते. आपण काहितरी असल्याची जी जाणीव आपल्या मनात उभी राहते ती आपल्याला वास्तवा पासून दूर करते. खरे वास्तव तर हेच आहे की आपले अस्तित्वच मुळात ह्या सृष्टीतील अणूरेणूनचे रचेलेला एक भास आहे. याची जाणिव आणि कृतज्ञता एक अंतर्गत शांतता प्रस्थापित करते.

Sunday 4 April 2021

Take the chance when you see it. Quote #TM328

Quote #TM328

*Take the chance when you see it.*

Opportunities often come in the form of extra work and sometimes in the form of problems.  Basically it is difficult to identify opportunities without having a participatory attitude towards the work.  And it is against destiny to let go of the opportunity once it is recognized.  Because destiny only opens its doors to a competent person.

सुविचार ३२८

*संधीची ओळख पटताच सहभागी व्हा.*

येणारी संधी बऱ्याचदा अतिरिक्त कामाच्या तर कधी समस्येच्या स्वरूपात अशी छुप्या मार्गाने येत असते.  मुळात कर्माप्रती सहभागी वृत्ती असल्याशिवाय संधी ओळखणे अवघड. आणि संधीची ओळखं पटल्यावर ती सोडून देणे म्हणजे नियती च्या विरूद्ध.  कारण नियती फक्त सक्षम व्यक्तीकडेच आपली संधी खुली करते.

Saturday 3 April 2021

The future can be created based on the past, not by staying in the past. Quote #TM327

Quote #TM327

*The future can be created based on the past, not by staying in the past*

It's hard to move forward by looking at the back. But the experience gained at every turn in the past will be useful for the next journey.  So just walk with the experience and leave the past behind.

सुविचार ३२७

*भविष्य निर्मिति भूतकाळाच्या आधारे करता येते, भूतकाळात राहून नाही*

मागे वळून पाहताना पुढे जाणे अवघड. मात्र मागील प्रत्येक वळणवर मिळालेला अनुभव
पुढील वाटचालीसाठी उपयोगाचा असेल. म्हणून फक्त अनुभव सोबत घेऊन चालावे आणि भूतकाळाला तिकडेच सोडून द्यावे.

Friday 2 April 2021

Failures are part of success.Quote #TM326

Quote #TM326

*Failures are part of  success*

Learning a lesson and using it to build success can be considered as a whole cycle of success. Obstacles and missed directions both reinforce many aspects of success, so failure should be seen as an integral part of success.

सुविचार ३२६

*अपयश म्हणजे यशाचाच भाग होय*

धडा शिकणे आणि त्यातून पुढे यश घडविणे यालाच यशाचे पूर्ण चक्र समजू शकतो. वाटेतील अडथळे आणि चुकलेली वाट हे दोन्हीं ही यशाच्या शिखरावर जाणाऱ्यांच्या अनेक पैलूंना सशक्त बनवते म्हणूनच यशाच्या मार्गावरील अविभाज्य घटक म्हणून अपयशाला पहावे.

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...