Sunday 31 January 2021

Don't let your thinking be programmed by others. Quote #TM266

Quote #TM266

*Don't let your thinking be programmed by others*

The human mind is a self-sufficient instrument, it does not need any external force to function.  When the mysterious power hidden inside the mind is unraveled, we automatically become aware of our capacities, but if we don't turn inwardly enough, some external forces begin to take over our mind, and the mind and thoughts automatically get influenced through external forces and unknowingly the person falls victim to mental slavery.  We must take full control of our mind without allowing this to happen.

सुविचार २६६

*आपल्या विचारांना इतराद्वारे कार्यान्वित होऊ देऊ नका*

मानवी मन हे एक स्वतंत्र संयंत्र आहे आणि त्याला कार्यान्वित होण्या करिता कोणत्याही बाह्य शक्तीची गरज नाही. अंतर्मनात लपलेली गूढ शक्तीची उकल झाली की आपोआपच आपल्याला सामर्थ्याची जाणीव होऊ लागते, मात्र पुरेसे अंतर्मुख न झाल्यास काही बाह्य शक्ती आपल्या मनाचा ताबा मिळवू लागतात आणि मन आपोआपच बाह्य शक्तिं मार्फत संचालित होऊ लागते अन् अनभिज्ञ पणे मानसिक गुलामीला व्यक्ती बळी पडतो. असे न होऊ देता आपल्या मनाचा सम्पूर्ण ताबा आपणच घ्यायला हवा.

Saturday 30 January 2021

The future is not just a matter of destiny, it can be shaped by hard work.Quote#TM265

Quote#TM265

*The future is not just a matter of destiny, it can be shaped by hard work.*

The time which doesn't exist yet is called the future, as, it does not exist which means it is actually an uncertainty, maybe that's why we leave it to our fate.  But we need to understand that the string which controls the future is in our hands 'right now' and this invisible cord is called 'our hard work', everyone who is ready to work hard can shape their future, and you are one of them.

सुविचार २६५

*भविष्य म्हणजे फक्त नशिबाचा भाग नव्हे तर ते मेहनतीच्या जोरावर घडवता येवू शकते.*

अद्याप अस्तित्वात नसलेला काळ म्हणजेच भविष्य, भविष्य म्हणजे अनिश्चितता हे गृहितच धरले जाते आणि नशिबावर सर्व काही सोडून दिले जाते. मात्र भविष्य नियंत्रणाची फार मोठी दोरी वर्तमानात आपल्या हाती असते अन् ही अदृश्य दोरी म्हणजेच आपली मेहनत, या कष्ट करण्याची तयारी असलेले सर्व जण त्यांचे भविष्य घडवण्याची क्षमता बाळगून असतात, तुम्ही त्यातीलच एक आहात.

Friday 29 January 2021

Your courage should not be less than your capacity. Quote #TM264

Quote #TM264

*Your courage should not be less than your capacity*

Most of the time we underestimate our potential and try to stay in a safe circle, but in reality, our ability is many times better. We often remain satisfied by achieving small goals despite having the ability to take big bounces.  Instead, we should try to know the best of our ability and take a big leap.

सुविचार २६४

*आपले धाडस आपल्या क्षमतेपेक्षा कमी नसावे*

खूपदा आपण आपली क्षमता कमी हेरतो आणि सुरक्षित वर्तुळात राहण्याचा प्रयत्न करतो, मात्र प्रत्यक्षात आपली योग्यता अनेक पटींनी जास्त असते आणि मोठी झेप घेण्याची योग्यता अंगी असूनही लहान कार्यात समाधान मानू लागतो. असे ना करता आपल्या क्षमतेच्या योग्यतेनुसार मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करायला हवा.

Thursday 28 January 2021

Mankind itself is the biggest natural miracle.Quote #TM263

Quote #TM263

*Mankind itself is the biggest natural miracle*

When nature can create a miracle like a human being, anything can happen, nothing is impossible.
Man does not find his existence miraculous because he has been living a phycological world since birth and it is difficult to observe existence apart from it, but even with effort, it is not impossible.

सुविचार २६३

*सर्वात मोठा नैसर्गीक चमत्कार म्हणजे आपण स्वतःच*

ज्या जगात मनुष्या सारखा आविष्कार निसर्गाद्वारे
निर्मित होऊ शकतो तिथे कोणताही चमत्कार होणे शक्य आहे, अशक्य असं काहीच नाही.
मानवाला त्याचं अस्तित्व चमत्कारिक वाटत नाही कारण जन्मापासून एक मानसिक जगात त्याचा वावर आहे आणि त्यापासून वेगळे होऊन अस्तित्वाला पाहणे अवघडच आहे, मात्र प्रयत्नांती तेही अशक्य नाही.

Wednesday 27 January 2021

No mental drama is true at the level of existence. Quote #TM262

Quote #TM262
*No mental drama is true at the level of existence*

The inseparable experience of this drama, which seems to be completely true, is deeply rooted in everyone, and it is so deeply rooted that despite being aware of the untruth, the existence of the fake fabricated reality seems to be true.

सुविचार २६२

*अस्तित्वाच्या स्थरावर कोणतेही मानसिक नाट्य सत्य नाही*

पूर्णपणे सत्य प्रतीत होणाऱ्या ह्या नाट्याचा विलग न करता येणारा अनुभव प्रत्येकात खोलवर रुजलेला आहे आणि तो इतका खोलवर रुजलेला आहे की असत्याची जाणीव होऊनही सगळं रचलेले अस्तित्व सत्य असल्याचे भासवत राहतो.

Tuesday 26 January 2021

Pain is temporary but gain is permanent. Quote #TM261

Quote #TM261

*Pain is temporary but gain is permanent*

The process of going beyond your safe boundaries is painful.  But when the boundaries are crossed, the pain will be transformed into a great experience and such experience is the reward for enduring pain.

सुविचार२६१

*वेदना तात्पुरती असते परंतु मिळकत कायम असते*

आपल्या सुरक्षित सिमांच्या पलिकडे जाण्याची प्रक्रिया म्हणजे एक वेदनादायी प्रक्रिया होय. मात्र सीमारेषा ओलांडल्यावर ह्या वेदनांचे रूपांतरण उत्कृष्ट अनुभवात होतें.
हा अनुभव म्हणजेच वेदना सहन करण्याच्या मोबदला होय.

Monday 25 January 2021

Everyone we meet is superior to us in certain areas. Quote #TM260

Quote #TM260

*Everyone we meet is superior to us in certain areas.*

Definitely there's something unique we can find in every person which we can learn, we just have to look at everyone with open minds. Basically, to achieve such openness, we have to give up our limited and self-centric behavior.

सुविचार २६०

*प्रत्येक माणूस ज्याला आपण भेटतो तो नक्कीच काही क्षेत्रात आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतो*

प्रत्येक व्यक्तीकडून शिकण्यासारखं काहीतरी नक्कीच  आपल्याला सापडू शकते, फक्त आपण मोकळ्या विचारांनी प्रत्येकाकडे पहायला हवं.
मुळात हा मोकळेपणा येण्याकरीता आपलं मर्यादीत आणि केंद्रित वागणं सोडून द्यावं लागेल.

Sunday 24 January 2021

Believe in yourself the most. Quote #TM259

Quote #TM259

*Believe in yourself the most.*

The situation can change, the person can change, and the habit of relying on any external thing can't give you expected result.
The one person who will always keep your trust is you.

सुविचार २५९
स्वतः वर सगळ्यात जास्त विश्वास ठेवा.

अवस्था बदलू शकते, व्यक्ती बदलू शकते, आणि कोणत्याही बाह्य गोष्टींवर विसंबून राहण्याचा गुण आपल्याला इप्सित
परिणाम देवू शकत नाही.
एक व्यक्ती जी आपला विश्वास नेहमी कायम ठेवेल ती म्हणजेच आपण स्वतः.

Saturday 23 January 2021

No improvement is possible without a change of identity. Quote #TM258

Quote #TM258

*No improvement is possible without a change of identity*

We stick our identity with many external things. And such false perception of identity becomes so 
strong that we begin to identify our habits as our nature. But habits means not you. There will be no progress without changing such thinking. That is why the first step to make progress is to separate yourself from habits.

सुविचार २५८

*ओळख बदलल्याशिवाय कोणतीही सुधारणा शक्य नाही*
अनेक बाह्य गोष्टीना आपण आपली ओळख म्हणून जगू लागतो आणि हीच आपली ओळख बनून जाते, मानसिक स्थरावर ही ओळख इतकी घट्ट होते की आपल्या कित्येक सवयी म्हणजे आपणच असे आपण समजू लागतो.मात्र सवयी म्हणजे आपण नव्हे. त्या बदलल्या शिवाय प्रगती होणार नाही. म्हणूनच प्रगतीची पाहिले पाऊल स्वतः ला सवयींपासून वेगळे करून त्यात बदल करणे होय.

Friday 22 January 2021

It is important to realize what is driving you. Quote #TM257

Quote#TM257

*It is important to realize what is driving you*

The emotions or thoughts that drive us have a huge impact on our lives, a day when we are driven by negative thoughts seems like years and everything becomes difficult, and the excitement in life is doubled by positive thoughts and emotions.  That is why which emotions and thoughts are driving our lives are significant

सुविचार २५७
*आपल्याला काय प्रेरित करीत आहे हे समजणे महत्वाचे आहे*

जी भावना अथवा विचार आपल्याला प्रेरित करीत असतो त्याचा फार मोठा परिणाम जिवनात पाहायला मिळतो, नकारात्मक विचारांनी प्रेरीत एक दिवस ही वर्षां प्रमाणे वाटू लागतो आणि सगळ कसं अवघड होऊन बसतं, अन सकारात्मक विचारांनी आयुष्यातला उत्साह द्विगुणित होतो. म्हणुनच कोणत्या भावना आणि विचार आपले जीवन प्रेरित करीत आहेत याला अनन्य साधारण महत्त्व आहे.

Thursday 21 January 2021

Don't stop until the goal is achieved. Quote 256

Quote 256

*Don't stop until the goal is achieved*

This world is not built by those who stop, but by those who achieved their objectives.  People with excellent self-confidence have made significant contributions to human well-being, and we must follow their footsteps and build our own path.

सुविचार २५६
*जोपर्यंत ठरवलेली गोष्ट पूर्ण होत नाही तो पर्यंत थांबू नका*

हे जग थांबणाऱ्यानी नव्हे तर गोष्ठी पूर्ण करणाऱ्यांनी घडवले आहे. ठाम निश्चय असलेल्या आत्मविश्वासाने परिपूर्ण लोकांनी मानवी कल्याणात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे, त्यांच्याच पावलावर चालून आपण स्वतः च मार्ग तयार करायला हवा.

Wednesday 20 January 2021

Sometimes the ability to go against the flow cannot be achieved by staying with the current. Quote #TM255

Quote #TM255

*Sometimes the ability to go against the flow cannot be achieved by staying with the current.*

There is no guarantee that the flow will always lead in the right direction.
Just as all rivers flow into the sea and merge itself, so modern human culture finds itself entangled in an intricate cycle of complex processes from which it is difficult to reverse and re-establish.
However, by realising the wrong direction of the flow at the right time and moving against the flow will make change happen, only a capable person can direct the flow towards the right direction.

सुविचार २५५

*कधी कधी प्रवाहाच्या विरोधात जावून जी क्षमता प्राप्त होते ती प्रवाहा सोबत राहून प्राप्त होणे शक्य नाही.*

प्रवाह नेहमीच योग्य दिशेने घेऊन जाईल याची शाश्वती नाही.
जसे सर्व नद्या समुद्रात जावून विलीन होतात त्याच प्रमाणे मानवी संस्कृती स्वतः ला एका क्लिष्ट प्रक्रियेतून नेवून अपरिवर्तनीय चक्रात अडकवून घेते जिथून मागे फिरणे आणि पुनः नवीन प्रस्थापना करणे अवघड होते.
मात्र योग्य वेळीच प्रवाहाची दिशा समजून घेऊन प्रवाहा विरोधात जाण्याचा मार्ग अवलंबून प्रवाहाला योग्य दिशेने नेण्याचे काम क्षमतावान व्यक्तीचं करू शकतो.

Tuesday 19 January 2021

Rising back every time you fall makes you excellent. Quote #TM254

Quote #TM254

*Rising back every time you fall makes you excellent*

An expert is someone who has gone through all the ups and downs but refused to stay down.
One achieves excellence due to his honest dedication, and dedication will never let you stay down.

सुविचार २५४

*खाली पडल्यावर प्रत्येक वेळी वर उठणे आपल्याला उत्कृष्ट बनवत असते.*

तज्ञ म्हणजे एक अशी व्यक्ती असते जी सर्व चढउतारांवरुन जावून सुध्दा उतारावर च समाधान मानण्यास नकार देते.
व्यक्ती त्याच्या प्रामाणिक समर्पणामुळे उत्कृष्टता प्राप्त करतो आणि हे समर्पण आपल्याला कधीही निराश होऊ देणार नाही आणि खाली तर मुळीच रहुदेत नाही.

Monday 18 January 2021

The return you get for the work is proportional to your loyalty to the work. Quote #TM254

Quote #TM254

*The return you get for the work is proportional to your loyalty to the work.*

Our value in society is built on the loyalty and dedication that we give to our work.
Whatever we do, if there is no loyalty to it, all is in vain.  Even a person who does small work becomes great because of his loyalty and dedication towards the small endeavor.

सुविचार २५४

*कामा प्रती तुमची निष्ठा आणि कामाबद्दल मिळणारा परतावा एकसारखाच असतो.*

आपले समाजातील मूल्य  एकनिष्ठता आणि कर्माप्रती समर्पण यातून उभारले जाते.
कोणतेही कार्य असो, त्याप्रती एकनिष्ठता नसेल तर सर्वच व्यर्थ आहे. लहान कार्य करणारी व्यक्ती सुध्द एकनिष्ठ आणि समर्पण भावामुळे महान वाटू लागते.

Sunday 17 January 2021

Clear vision can transform your energy into reality. Quote #TM253

Quote #TM253

*Clear vision can transform your energy into reality.*

It is not only the lack of energy, intelligence and planning that often causes us to fall behind, but also the lack of clear vision.
The clearer you are about life and the purpose of life, the more likely you are to live a wonderful life.
Therefore, we must always see a clear picture of our existence.  This clarity will help you establish yourself before you play your role in this world.

सुविचार २५३

*स्पष्ट दृष्टी तुमची उर्जा वास्तविकतेत बदलू शकते.*

बर्‍याच वेळा उर्जा, बुद्धिमत्ता आणि नियोजनाचा अभाव यामुळेच आपण मागे पडतो असे नाही तर स्पष्ट दृष्टी च्या अभावा मुळे ही असे होते.
आयुष्याबद्दल आणि जीवनाच्या हेतू याबद्दल आपण जितके अधिक स्पष्ट असाल तितकीच एक अद्भुत जीवन जगण्याची अधिक शक्यता जास्त.
म्हणूनच, नेहमीच आपल्या अस्तित्वाचे स्पष्ट चित्र पाहिले पाहिजे.  ही स्पष्टता आपण आपली या जगातील भूमिका बजावण्यापूर्वी स्वत: ला प्रस्थापित करण्यात मदत करेल.

Saturday 16 January 2021

Selflessness is an indicator of true power. Quote #TM252

Quote #TM252

*Selflessness is an indicator of true power*

Selflessness may be the  quality found only in humans.  Selflessness is certainly one of the qualities that clearly distinguishes humans from animals.  The inner  strength certainly makes us more powerful than the outer strength, and without the inner strength, a person cannot have selflessness.

सुविचार २५२

*निस्वार्थता ही खर्‍या सामर्थ्याचे सूचक आहे*

निस्वार्थीपण कदाचित फक्त मानवामध्ये सापडणारा गुण असावा. मानवाला पशुंपासून स्पष्टपणे वेगळे करणाऱ्या गुणांपैकी नक्कीच निस्वर्थपण एक आहे. आंतरिक शक्ती ही बाह्य शकतो पेक्षा नक्कीच जास्त सामर्थ्यवान बनवते आणि आंतरिक शक्ती असल्या शिवाय व्यक्तीमध्ये निस्वार्थीपणाचा उगम होऊ शकत नाही.

Friday 15 January 2021

Stay motivated don't lose heart. Quote #TM251

Quote #TM251

*Stay motivated don't lose heart.*

Try to accomplish whatever you have started. The ups and downs are part of the route but we should not leave the journey in the middle. Persistence and perseverance are the companions of success, without them, success cannot be achieved and sustained.  If your dream is big then maybe your ability is already extraordinary and because that you have dared to go for it. Now it's time for a great try.

सुविचार २५१ 

प्रेरीत राहा मनातून खचू नका.*

आपण सुरूवात केलेली प्रत्येक गोष्ट परिपूर्तीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करावा. चढ उतार हा मार्गाचा भागच आहे परंतु त्यासाठी प्रवास सोडू नये.
सातत्य आणि जिद्द हे यशाचे सोबती आहेत, त्यांच्या शिवाय यश मिळणे आणि टिकणे शक्य नाही. जर तुमचे स्वप्न मोठे असेल तर कदाचित तुमची क्षमता ही मोठीच असावी म्हणून ते पाहण्याचे धाडस तुम्ही केले असावे आता वेळ आहे ते पूर्णत्वास नेण्याची.

Thursday 14 January 2021

Cultivating compulsion cannot be freedom, but attaining consciousness is true freedom.

Quote #250

*Cultivating compulsion cannot be freedom, but attaining consciousness is true freedom*.

Many people around us think that they will get freedom only if some of their compulsions are allowed.  But in reality, such unavoidable habits are actually mental slavery, we have to act consciously, awareness can experience freedom at every moment and destroy unwanted habits, so raising awareness means achieving true inner freedom.

कोट # 250

*अनिवार्यता जोपासणे म्हणजे स्वातंत्र्य असू शकत नाही परंतु चैतन्य प्राप्ती म्हणजे खरे स्वातंत्र्य*

जवळपास सर्वच लोकांच्या मनात अशी भावना आहे की त्यांच्या काही सवयीना मान्यता मिळाली तरच त्यांना स्वातंत्र्य मिळेल.  परंतु प्रत्यक्षात, अश्या अनिवार्य सवयी म्हणजे प्रत्यक्षात एक मानसिक गुलामगिरीच आहे, आपण जाणीवपूर्वक कार्य केले पाहिजे, जागरूकतेमुळे प्रत्येक क्षणी स्वातंत्र्याचा अनुभव घेता येतो आणि नको असलेल्या सवयींचा नाश होतो, म्हणून जागरूकता वाढविणे म्हणजे खऱ्या अर्थाने अंतर्गत स्वातंत्र्य प्राप्त करणे होय.

Wednesday 13 January 2021

learning is a conscious choice. Quote #TM249

Quote #TM249

*learning is a conscious choice.*

It is easy to get information but to learn something is a whole new game, we need to focus, understand, think, and grasp the knowledge. Be a lifetime learner.

सुविचार २४९?

*शिकणे म्हणजे जाणीवपूर्वक केलेली निवड आहे.*

माहिती मिळवणे सोपे आहे परंतु काहीतरी शिकणे हा एक संपूर्ण नवीन खेळ आहे, आपल्याला ज्ञान केंद्रित करणे, समजणे, विचार करणे आणि त्या योगे आकलन होणे आवश्यक आहे. आपण आजीवन विद्यार्थी बनायला हवा.

Tuesday 12 January 2021

Victory is all about maintaining a stable state of mind even in the middle of the Strom. Quote #TM248

Quote #TM248

*Victory is all about maintaining a stable state of mind even in the middle of the strom.*

Stability of mind is a foundation rock on which achievements can be built. Focus and consistency which are the fundamental requirement of success are the natural outcomes of a stable mind. Thus one should not rush behind focusing on something or maintaining consistency in important walks of life, rather one should pay enough attention to stabilizing the mind.

सुविचार २४८

*वादळाच्या मध्यात ही मनाची स्थिर स्थिती राखणे म्हणजे विजय होय*.

मनाची स्थिरता हा एक पायाभूत खडक आहे ज्यावर आपल्या कामगिरीची इमारत बांधली जाऊ शकते.  यशाची मूलभूत आवश्यकता असलेले गुण जसे ध्यान आणि सातत्य हे स्थिर मनाचेच नैसर्गिक परिणाम आहेत.  अशा प्रकारे एखाद्याने एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याच्या मागे किंवा महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सातत्य राखण्यामागे धावू नये तर त्याऐवजी मनाला स्थिर करण्यासाठी आपण पुरेसे लक्ष दिले पाहिजे.

युवा दिनाच्या निमित्ताने..


आपल्या ओघवत्या वाणीने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करून सोडणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनी भारतवर्षात साजरा केल्या जाणाऱ्या युवा दिनाच्या निमित्ताने प्रत्येक उत्साही तरुणाला शुभेच्छा.
''मला १०० उत्साही तरुण द्या आणि मी भारताला संपूर्ण रूपांतरित करेन'' असे छाती ठोक पणे सांगणाऱ्या विवेकानंदांचा युवकांवरील विश्वास यातून दिसून येतो.
'उत्साह नये भारत का' हि थीम घेऊन साजरा होणार आजचा युवा दिवस, तरुणांना आशेची नवीन किरणे म्हणून पाहणारा आहे. आजची युवा पिढी आजपर्यंतच्या सर्वात शक्तिशाली युवापिढीनपैकी आहे, तंत्रज्ञानाचे धारदार अस्त्र, तल्लख आणि जाणीव निर्माण झालेली बुद्धिमत्ता, क्षणार्धात सम्पूर्ण जगापर्यंत पोहोचण्याची क्षमता, या सर्वांत पारंगत असललेला आजचा युवक मानवजातीची एक मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन उभा आहे, आर्थिक सामाजिक, भौगोलिक, वातावरणीय, जैविक अश्या अनेक उदयोन्मुख समस्या ह्याच युवकांकडे आशेने पाहत आहेत, त्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करून आपले योगदान देणे प्रत्येक युवकाने आपले कर्तव्यच समजावे.
मर्यादित वृत्तीचा त्याग करून इतरांसाठी प्रेरणा बनून युवकांनी स्वतः ची आणि समाजाची प्रगती साधण्यावर लक्ष्य केंद्रित करावे. आवाहनांना निर्भीडपणे सामोरे जाण्याची वृत्ती म्हणजेच तरुणांचा विशेष गुण. आपल्यातील तरुण वृत्तीला धाडसाची साथ देत स्वप्नपूर्तीच्या दिशेने झेप घेण्याचा संकल्प तरुणानी आजच्या दिवशी विवेकानंदाच्या प्रसिद्ध सुविचाराने करावा, "उठा, जागे व्हा आणि तो पर्यंत थांबू नका जो पर्यंत ध्येय प्राप्ती होत नाही".
विवेकानंदानी जागाल ओळख करून दिलेली समृद्ध भारतीय संस्कृती जपण्याचा संकल्प आपण करावयास हवा, पाश्चिमात्य डोळ्यांनी भारताकडे नं पाहता उत्कृष्ट जीवन पद्धती म्हणून भारतीय संस्कृतीची खोली अभ्यासावी, तर्काच्या लहानश्या चौकटीतून तुम्हाला महासागराचे दर्शन होणे शक्य नाही, भारतीय उपखंडात निर्मित संस्कृतीला आत्मदर्शनच्या माध्यमातून अनेको तेजस्वी व्यक्तींनी आकार दिलेला आहे, ह्या ऐतिहासिक खजिन्याचा स्वतः हुन अभ्यास न करता इतरांशी तुलना करू नये. भारतीय संस्कृतीच्या उगमाच्या मूळ स्रोतांचा अभ्यास करून,  तपासून पाहावे, आणि आपले मत बनवावे.
संपूर्ण जीवन परिव्राजक म्हणून व्यतीत करीत भारत भ्रमण करत पुढे देशोदेशी प्रवास करून संपूर्ण जीवन समाज उद्धाराच्या आणि जागृतीच्या वैश्र्विक कार्याला समर्पित करणाऱ्या स्वामी विवेकानंदाना आणि त्यांच्या विचारांना शतशः नमन. त्यांनी प्रज्वलित केलेला उत्सहाचा हा दीप तुमच्या मनात सदैव तैवत राहूदे.
- तुषार महाडीक

Monday 11 January 2021

Wanting to transform life and resisting to change is contradictory. Quote #TM247

Quote #TM247

*Wanting to transform life and resisting to change is contradictory*

Almost everyone on earth wants their life to be better. Everyone wants to achieve an enormous amount of success in all walks of life. But they are so rooted in their old identity that they don't even want to take a single step to shift their perspective. There is no sudden magic going to happen, one needs to improve, change, transform, and learn constantly then magic will happen for sure.

सुविचार २४७

*जीवनात बदल घडवून आणणे आणि बदलाला प्रतिकार करणे विरोधाभासी आहे*

आपले जीवन छान व्हावे अशी पृथ्वीवरील बहुतेक प्रत्येकाची इच्छा असते.  प्रत्येकास जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळवायचे आहे.  परंतु त्यांची जुनी ओळख इतकी रुजली आहे की त्यांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी त्यांना एक पाऊल उचलण्याचीही इच्छा नाही.  अचानक जादू होणार नाही, स्वतः ला सुधारणे, बदलणे, परिवर्तन करणे आणि सतत शिकणे आवश्यक आहे मग  निश्चितपणे
जादू होईल.

Sunday 10 January 2021

There is no limitations to your inner exploration. Quote #TM246

Quote #TM246

*There is no limitations to your inner exploration*

It is hard to define the limitless possibilities.
The route for inner journey is deeply rooted in to a dark but bright and pleasant dimension.
One can experience this amazing journey only by being meditative in everything we do.

सुविचार २४६

*आपल्या अंतर्गत शोधास मर्यादा नाहीत*

अमर्याद शक्यता परिभाषित करणे कठीण आहे. ह्या अंतर्गत प्रवासासाचा मार्ग गडद परंतु चमकदार आणि आनंददायी परिमाणात खोलवर रुजलेला आहे.
आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ध्यानमग्न होऊनच हा अद्भुत प्रवास अनुभवता येतो.

Saturday 9 January 2021

Where to go in life is completely our choice Quote #TM245

Quote #TM245

*Where to go in life is completely our choice*

The steering of a lifeboat is in your hands, by using which you can explore new horizons. You need to be able to adjust your sail to give life balance, speed, and direction.  You have to learn to sail properly in life. Once you become proficient in thisway of living, you become friends with high waves and your skills will take you to outstanding degrees when you choose to sail through big waves.

सुविचार २४५

*आयुष्यात कुठे जायचे ही पूर्णपणे तुमची स्वतः ची निवड आहे*

जीवनरूपी जहाजाचं शिड तुमच्याच हातात आहे, ज्याचा वापर करून तुम्ही नवनवीन क्षितिजाना गवसणी घालू शकता,मनाचे हे शिड तुम्हाला प्रसंगा नुसार समायोजित करून आयुष्याला समतोल, गती आणि दिशा देता यायला हवी, प्रत्येक जण इथे अननुभवीच असतो म्हणून वादळी वारा असो किंवा संथ पवन इथे स्वतः च शिकावं लागतं. एकदा का या खेळात पारंगत झालात की उंच लहरिंशी आपली मैत्री होते आणि तुमचे कौशल्य तुम्हाला मोठ्या लहरी द्वारे उच्च स्थानावर घेऊन जावू शकते.

Friday 8 January 2021

Quality of input determines the quality of retention. Quote #TM244

Quote #TM244

*Quality of input determines the quality of retention*

Receptivity is directly linked to the intensity of your concentration.  Only intense concentration increases your chances of gaining in-depth knowledge of the subject.  That is why the more we can focus, the more knowledge stays in our minds for a long time.  What is learned with intensity assimilates for life.

सुविचार २४४

*ग्रहणाची गुणवत्ता धारणाची गुणवत्ता निश्चित करते*

ग्रहणशिलतेचा सरळ संबंध आपल्या एकाग्रतेच्या तीव्रतेशी आहे. तीव्र एकाग्रातेमुळेच आपल्याला विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच जितक्या उत्कृष्टरित्या आपण ग्रहण करतो तितकाच जात वेळ ती गोष्ट मनात टिकून राहते. उत्तमरित्या आणि कार्यकारण संबंध लक्ष्यात घेऊन शिकलेली गोष्ट जीवनभरासाठी आत्मसात होते.

Thursday 7 January 2021

To learn means to dive into the deeper dimension. Quote #TM243

Quote #TM243

*To learn means to dive into the deeper dimension*

To fully understand or learn something completely means to gain in-depth knowledge about it. Gaining little and only superficial knowledge is like swimming in shallow water.  People who pretend to be knowledgeable based on a little information without finding the core of the subject can be harmful to themselves and others, therefore, we should be inclined to increase our knowledge only by studying the matter thoroughly.

सुविचार २४३

*शिकणे म्हणजे सखोल ज्ञान प्राप्ती करणे*

एखादी गोष्ट पूर्णपणे समजणे किंवा पूर्णपणे शिकणे म्हणजेच त्या बाबतीत सखोल ज्ञान प्राप्त करणे. थोडे थोडके आणि फक्त वरवरचे ज्ञान प्राप्त करणे म्हणजे उथळ पाण्यात पोहणे. विषयाचा गाभा न शोधता थोड्याच माहितीच्या आधारे ज्ञानी असल्याचा आव आणणारे लोक स्वतः ची आणि इतरांची ही हानी करू शकतात,म्हणूनच, गोष्टीचा सखोल अभ्यास करूनच आपले ज्ञान वाढवण्याकडे आपला कल असावा.

Wednesday 6 January 2021

Working hard is the key to achieve excellent competency. Quote #TM242

Quote #TM242

*Working hard is the key to achieve excellent competency *

Competence is the ability to do something.  There is no substitute for hard work in building the capacity. It is through hard work that skills become accustomed and abilities develop. When competence gets developed you are set to take the eagle leap.

सुविचार २४२

*क्षमतेचा विकास आपण सामोरे गेलेल्या आवाहनांमुळे होतो*

क्षमता म्हणजेच एखादी गोष्ट करू शकण्याची योग्यता. ही योग्यता संपादित होण्याकरिता मेहनती शिवाय पर्याय नाही.
मेहनती मुळेच कौशल्य अंगवळणी पडते आणि क्षमतेचा विकास होत राहतो. क्षमता  हा अंगीभूत गुण झाला की आपण गरुडझेप घ्यायला सिध्द.

Tuesday 5 January 2021

Knowledge and awareness are not just for understanding purpose it has to be applied. Quote #TM241

Quote #TM241

*Knowledge and awareness are not just for understanding purpose it has to be applied*

सुविचार २४१

If you want to make a change in real life, you have to use knowledge and awareness.  It is easy to acquire knowledge because your intelligence is brilliant but to use that knowledge, you have to have a completely different set of qualities.

सुविचार २४१

*ज्ञान आणि जाणीव फक्त माहीत करून घेण्यासाठी नसून त्याचा वापर करण्यासाठी असतात*

प्रत्यक्ष जीवनात बदल हवा असल्यास ज्ञानाचा आणि झालेल्या जाणिवेचा उपयोग व्हायला हवा. खूप वेळेस आपली बुध्दीमत्ता तल्लख आल्याने ज्ञान प्राप्त करणे सोपे होते मात्र त्या ज्ञानाचा वापर करण्यासाठी पूर्णतः वेगळ्या गुणांचा संच अंगी असावा लागतो.


Monday 4 January 2021

Disconnect to reconnect. Quote #TM240

Quote #TM240

*Disconnect to reconnect.*

We try to fit ourselves into some frame to perfect ourselves in some part of life and further we start considering such a small part of life as whole life. Then we try to establish an inelastic connection with that particular area of life. But to get an idea of ​​reality, one should try to free oneself from such limited thoughts and try to create unlimited possibilities by reconnecting with life anew.
The first step in such endeavors is to realize your limitations.

सुविचार २४०

*नव्या जोडणी करीता विभक्त व्हा.*

आपण जिवनाच्या एखाद्या भागात स्वतः ला परिपूर्ण करण्या करिता त्या प्रकारच्या साच्यात  स्वतः ला पक्के बसवण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर त्या मर्यादीत साच्यालाच संपूर्ण जीवन समजू लागतो. नंतर जिवनाच्या त्या स्वरुपा सोबत एक अलवचिक संबंध प्रस्थापित करू इच्छितो.
मात्र वास्तवाची कल्पना येण्या करीता अश्या मर्यादीत विचारांतून स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि आयुष्याशी पुन्हा नव्याने संबंध जोडून अमर्यादित शक्यता निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.
अश्या प्रयत्नांची प्रथम पायरी म्हणजेच आपल्या मर्यादेची झालेली असणे.

Sunday 3 January 2021

Make sure you are in good company when you are alone. Quote #TM239

Quote# TM239

*Make sure you are in good company when you are alone*

The only person you are accompanying for a lifetime is yourself, so at least you should be happy with this person.  You should not defeat yourself by using your infinite intellect against you, we should be joyous by being with ourselves and should never constantly use negative emotions against ourselves or blem for the things which we did not have in our life.
The experience of being alone must be pleasant.

सुविचार २३९

*आपण एकटे असताना एक चांगल्या सोबतीत असल्याचे सुनिश्चित करा*

जीवनभर सोबत असणारी एक व्यक्ती असते ती म्हणजे आपण स्वतः, आणि अश्या व्यक्ती ची सोबत आपल्याला आनंद देणारी असावी. आपली असीम बुध्दीची क्षमता वापरून स्वतः ला पराभूत करू नये, सतत आयुष्यातील कामतरते करीता स्वतः.वर दोषारोप न करता प्रथम स्वतः ची सोबत सुखमय करावी.

Saturday 2 January 2021

Flow like a river and create memories. Quote #TM238

Quote #TM238

*Flow like a river and create memories*

Just as the river does not stop at any place, its flow continues uninterrupted, so the flow of moments in life is constantly flowing, maximum moments should be confined in the crock of happy memory.

**नदीसारखे वाहा आणि आठवणी तयार करा*

जशी नदी कोणत्याही जागेवर थांबत नाही तिचा प्रवाह अखंड चालू राहतो, तसा जिवनात क्षण रुपी प्रवाह सातत्याने वाहत असतो, जास्तीत जास्त क्षणांना आनंद स्मृती च्या कुपीत बंदिस्त करावे.

Friday 1 January 2021

माझी पहिली अल्ट्रा मॅरेथॉन

अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे नेमकं काय?

मॅरेथॉन ही लांब पल्ल्याची शर्यत असून शर्यतीचे अधिकृत अंतर ४२.१९५ किलोमीटर इतके आहे. सहसा मॅरेथॉन रस्त्यांवरून धावली जाते. ग्रीस मधील मॅरेथॉन या ठिकाणी चालू असलेल्या लढाईपासून ते अथेन्सपर्यंत विजयाचा संदेश धावत जाऊन देणारा ग्रीक सैनिक फेडीपिपाईडस याच्या धावण्याच्या स्मरणार्थ अशी शर्यत जगभरात आयोजित केली जाते. अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे ४२.१९५ किलोमीटर पेक्षा जास्त अंतर धावण्याची शर्यत. काही ठिकाणी ५० किलोमीटर, १०० किलोमीटर किंवा ५०० किलोमीटर इतकं अंतर धावण्याच्या शर्यती हि आयोजित केल्या जातात. धावण्याचे आव्हान कठीण व्हावे याकरिता माउंटन अल्ट्रा रन किंवा, अल्ट्रा ट्रेल रन म्हणजेच डोंगरदऱ्यातून धावणे अश्या शर्यतींचे आयोजन केले जाते.

मी भाग घेतलेली शर्यत ह्याच प्रकारातली होती. 

SRT अल्ट्रा ज्यात 53 किलोमीटरचे अंतर डोंगर दर्यातून धावत, पुण्यातील तीन महत्वाचे किल्ले, सिंहगड, राजगड, आणि तोरणा एकाच धावेत सर करायचे होते अन तेही ठरलेल्या वेळेतच अन्यथा डिसक्वालिफाय म्हणजेच स्पर्धेतून बाद होण्याची टांगती तलवार लटकलेलीच.

SRTअल्ट्रा गेल्या तीन वर्षांपासून वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने आयोजित केली जाते. देशविदेशातील अनेक धावक या स्पर्धेच्या आवाहनात्मक स्वरूपामुळे आकर्षित होतात अन शेकडोंच्या संख्येने सहभागी होतात, किंबहुना कित्येक धावकांच्या संकल्प यादीत ह्या शर्यतीने स्थान मिळवलेले आहे, शर्यतीतील २३२० मीटर ची उभी चढाई ह्या स्पर्धेला काठिण्याच्या वेगळ्याच स्थरावर नेते, काही ठिकाणी दोरीच्या साहाय्याने चढावे अथवा मार्गक्रमण करावे लागते, अन मोबदला म्हणून वाटेत अतिशय नयनरम्य देखाव्यांची पर्वणीच मिळते. सह्याद्रीचे सौंदर्य आणि कणखरता दोन्ही हि ह्या एकाच धावेत अनुभवता येऊ शकतात.

तीन महिन्यांपूर्वी SRT अल्ट्रा ची जाहिरात पहिली अन मनाशी पक्के केले कि हे आव्हान आपण पूर्ण करायचे, अश्या प्रकारच्या शर्यतींसाठी परिपूर्ण तय्यारीची गरज असते, तो पर्यंत मी अर्ध मॅरेथॉन म्हणजेच २१ किलोमीटर चे अंतर धावू शकत असे, त्यापलीकडे फारसे धावणे होत नसे, अन डोंगरदऱ्यातून तर नव्हेच नव्हे. हाल्फ मॅरेथॉन पेक्षा जास्त धावण्याच्या कोणत्याही शर्यतीसाठी शारीरिक तयारी सोबत मानसिक तयारी होणे अतिशय गरजेचे आहे, कारण सर्वसामान्यांच्या बाबतीत २५ किलोमीटर धावल्यानंतर शारीरिक क्षमता उत्तर देऊ लागते, पेटके येऊ लागतात, थकवा जाणवू लागतो, अन पुढील अंतर पार करण्यासाठी स्वतः ला सतत प्रेरित करत राहावे लागते. तयारी सुरु केली अन सुदैवाने माझ्या सारखेच तयारीला लागलेले काही मित्र हरीश तरीकर, हॅरी अय्यर, भरत रायकर, वैभव तोडणकर, मितेश आणि गगन यांची भेट झाली, एकत्रित पणे आम्ही दोन वेळेस डोंगर दर्यातून धावण्याचा प्रबळगड आणि श्रीमलंगड या ठिकाणी  सराव केला, सरावा दरम्यान लक्ष्मण गुंडप सरांचे मार्गदर्शन मला लाभले, याचा सर्वतोपरी परिणाम म्हणूनच शर्यतीकरीता गरजेची शारीरिक तयारी पूर्ण होऊ शकली, मानसिक आणि आंतरिक तयारीच्या बाबतीत योग चैतन्य केंद्रातील योगाभ्यास, प्राणायाम आणि दीर्घ श्वसनाचा आणि सद्गुरूंच्या ध्यानाचा अभ्यास उपयोगी ठरला, वरकरणी सहज वाटणारा आणि धावकाच्या तयारीत  समाविष्ट नसलेला हा भाग व्यक्तीला आंतरिक ऊर्जा देतो याची प्रचिती मात्र स्वानुभवातूनच घेता येऊ शकते.

सकाळी अगदी ६ च्या ठोक्याला वाजत गाजत शर्यत प्रारंभ झाली, पुढे भल्यामोठ्या सिंहासारखा ध्यानस्थ बसलेल्या सिंहगडचा माथा गाठेपर्यंत पुरतीच दमछाक झाली, पुढे डोंगर माथ्यावरून अनेक लहान लहान टेकड्या पार करत कल्याण दरवाजातून खाली उतरू लागलो, अगदी त्याच वेळी तळपता सूर्य मात्र आकाशात वर सरकू लागला. सिंहगड उतरताना अगदी नाकासमोर सुदूर अंतरावर एक अस्पष्ट भला मोठा पर्वत नजरेच्या टप्प्यात येतो, तोच हा राजगड, जवळपास २५ किलोमीटर अंतरावर स्थित. ईतक्या दूरवर दिसणारा हा राजगड म्हणजे निम्मा मार्ग सुद्धा नाही याची जाणीव होते.. रानवाटेवर आणि काही गावातून धावत पुढे राजगडाच्या पायथ्यावर २५ किलोमीटर चे अंतर पूर्ण होते, इथपर्यंत पोहोचेपर्यंत माझ्यासारख्या सामान्य धावकाचे पाय मात्र बोलू लागतात, काही मिनिटांचा ब्रेक घेत पुन्हा ताजेतवाने होऊन राजगडा ची चढाई प्रारंभ केली आणि थकवा म्हणजे नेमकं काय याची अनुभूती आली, मात्र राजगड चढून पूर्ण होई पर्यंत मनाला उसंत नव्हती, अनेक वर्षे महाराजांचे वास्तव्य असलेल्या राजगडावरून सुवेळा माचीवर अन त्यानंतर संजीवनी माचीवरून पुढे जात पहिला कट ऑफ पार करे पर्यंतच्या मार्गावर सह्याद्रीच्या मनोरम्य स्वरूपाचे दर्शन होते, असीम निळ्या आकाशाची चादर पांघरलेल्या अन चहुबाजूनी अफाट पसरलेल्या ह्या निधड्या पर्वतरांगा प्रत्येकाने एकदातरी पाहाव्यात.

दैवी आणि शारीरिक कृपेमुळे पहिला ३४ किलोमीटर अंतरावरील कट ऑफ २ तास आधीच पार केला आणि पुढे तोरण्याच्या दिशेने कूच केली, राजगड ते तोरणा दरम्यानचा मार्ग म्हणजेच शिरेवरील वाट, जवळपास १०-१२ किलोमीटरचे अंतर डोंगररांगांच्या शिखरांवरून पार करावे लागते, जिवंत निसर्ग चित्रांचा खजिनाच ह्या वाटेवर तुम्हाला सापडेल.

४०-४२ किलोमीटर चे अंतर पार केल्यावर येणारी तोरणागडाची अगदी ८०-८५ अंशांची चढाई म्हणजे मानसिक खच्चीकरणाचा अतोनात प्रयत्न,  अगदी रेंगत रेंगत हि चढाई पूर्ण करून तोरणा गाठला आणि स्वराज्याचे पहिले तोरण बांधलेल्या ह्या प्रचंडगडाच्या नावाचे गमक उमगले,

पुढे तोरणा उतरून झाल्यावर जवळपास ७ किलोमीटर अंतर पार करत शर्यत एक शाळेच्या प्रांगणात पूर्ण होते. शेकडो धावकांतून फक्त ८७ धाविक ज्यांनी हि शर्यत पूर्ण केली त्यात ३३ व्या स्थानावर माझी पहिली अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करतानाच क्षण अजूनही तितकीच ऊर्जा आणि परिपूर्तीचा आनंद देतो, जितका प्रत्यक्षात फिनिशिंग लाईन पार करताना झाला होता.

अतिशय योजनाबद्ध पद्धतीने आयोजित SRTअल्ट्रा आणि तितकेच उत्साही आयोजक आणि स्वयंसेवक आणि एकमेकांना प्रेरित करीत, मदत करत धावणारे आणि मानवतेचे उत्कृष्ट उदाहरण देणारे स्पर्धक यांचा उल्लेख केल्या शिवाय लेख पूर्ण करणे अशक्यच.

ज्यांना आपल्या क्षमतांची मर्यादा थरार अनुभवत ओलांडायची आहे त्यांनी नक्कीच अश्या प्रकारच्या शर्यतीमध्ये  भाग घायला हवा आणि आयुष्य एका वेगळ्याच दृष्टिकोनातून अनुभवायला हवा.



Honestly is the foundation of self-discipline. Quote #TM237

Quote #TM237

*Honestly is the foundation of self-discipline*

When no outside restriction are present and we try to do whatever is right and give our best, is called self-discipline- the source of excellence which can never happen without a touch of honesty because self-discipline is a form of self-commitment- an honest commitment to self.

सुविचार २३७

 *प्रामाणिकपणा आत्म-शिस्तीचा पाया आहे*

 जेव्हा बाहेरील कोणतेही बंधन नसते आणि आपण जे योग्य ते करण्याचा प्रयत्न करतो आणि आपला सर्वोत्तम प्रयत्न करतो, तेव्हा त्याला आत्म-शिस्त म्हणतात - प्रामाणिकपणाचा स्पर्श असल्याशिवाय कधीही हे शक्य नाही. उत्तम कार्याचा स्त्रोत आत्म-शिस्त ही आत्म-वचनबद्धतेचाच एक प्रकार आहे-  स्वत: ची स्वतः साठी
प्रामाणिक वचनबद्धता.

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...