Tuesday, 26 May 2015

माणसा माणसा थांब रे !!-4

Continue from last blog................याचाच परिणाम म्हणून अनेक लहान राष्ट्रे  मूलभूत प्रश्नान साठी  गुदमरलेल्या श्वासने अक्षरशः चिरडून निघत आहेत.
सर्वमान्य सिद्धांता नुसार मानवाची प्रगती ही फक्त आर्थिक प्रगती नुसारच मोजली जाते, ज्ञान प्राप्ती ही एका दुर्लक्षित सूर्योदाया प्रमाणे अस्त होत आहे. 'ज्ञानम् परमम् ध्येयम्' या उक्ती प्रमाणे ज्ञान  प्रप्तीच सर्वात मोठी प्रगती आहे. स्वतः ला स्वत: कडून नेमक काय आणि का ह्वे? याच खोल वर प्रचीती आली की मानव अन्तर्ज्ञान प्राप्ती कडे आपोआप वळेल. पण 'मला' इतराणकडून आणि परिस्थिती कडून काय हवे याच प्रश्नात मानव गुरफटून बसलाय आज.
नियंत्रित मन म्हणजे हव्यसी व अकारण असलेल्या गरजा  कमी आणि कमी गरजा म्हणजे  अधिक समाधानी वृत्ती, हीच गोष्ट तांत्रीक प्रगती सोबत मानवाला कळल्यास सर्वत्र विकासा सोबत शांती नांदताना दिसेल व प्रगतीचा नावाखाली होणारी बड्या राष्ट्रांची कुरघोड कमी होईल.
ह्या अनियंत्रित मनोवृत्ती चे पडसाद फक्त आर्थिक सामाजिक स्तरवरच उमटत नसून जगण्याची मूलाधार असलेली पर्यावरण संस्था ह्यात होरपळून गेलिये, ही कृती विनाशक ठरणार आहे,नुकत्याच झलेल्यासायन्स मासिकातील एका सर्वे नुसार वातावरण बदला मुळे पृथ्वी चा तापमान 4.3 अंश नि वाढण्या ची शक्यता आहे त्या मुळे प्रत्तेक 6 पैकी 1 जीव नष्ट होईल त्यांना हा अचानक झलेला बदल सहन करणे अशक्या आहे, करोडो वर्षं पासून उत्क्रन्त झलेले जीव मानवाचा मूर्ख पणा मुळे नष्ट होतील, आणि अन्न साखलीतील त्यांचा रिकाम्या जागेचा अतिशय हानिकारक प्रभाव मानवावर पडेल ज्यातुन त्याला सावरण अगदी अशक्यच. दुसर्या बाजूने पाहता ह्या वातावरण बदला मुळे मूलभूत गरजा जसे अन्न वस्त्रा निवारा पूर्ण करणे अतिशय अवघड होऊन बसेल ज्या मुळे हालखीची आर्थिक परिस्थिती असलेली राष्ट्रे बंडखोरीत बदलतील व मूलभूत हक्कं साठी लढ सुरू करतील त्याचा वाईट परिणाम संपूर्ण जगावर होईल, आज भारता सारख्या देशांतील नैसर्गिक आपत्तीने पिढीतांची पुनर्वसना चा प्रश्ना वरुन याची कल्पना येऊ शकते पर्यावर्णाचा र्‍हास हा मानव जातीचा र्‍हास आहे याची पूसटशी कल्पना देखील आज मानवाला आर्थिक प्रगती पेक्षा कमी वाटते, सर्वात मोठा विरोधा भास असा आहे की......Continue

Tushar Mahadik

No comments:

Post a Comment

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...