continue from last blog.................सर्वात मोठा विरोधा भास असा आहे की या विनाशकतेला त्याने प्रगतीच नाव दिल आहे. मुळात पर्यावरणाच्या र्हासाची मानवाला कल्पना नाही किवा त्याला जाणीव होत नाही अस नाही. त्याच्या बुद्धीला सगळ कळत, इथे महाभारतातील एक कीस्सा सांगावासा वाटतो; अनेकान कडून भागवत गीतेवर भाष्या केला जात की जर श्री कृष्णा ने गीता अर्जुन एवजी दुर्योधनाला सागितली असती तर महाभारताच युद्ध च झाला नसता.मात्र नीट निरखून पाहिल्यास युद्धा आधी कृष्णा ने दुर्योधनाला भेटून समजवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो त्या वेळी दुर्योधनाच उत्तर आजची परिस्थिती च पारिभाषित करते
" मला सगळ कळतय की ह्या युद्धात प्रचंड हानी च होणार आहे आणि माझी बाजू चुकीची आहे पण जरी याची जाणीव मला असली तरीही अडचण अशी आहे की, आत्ता मला ते बदलता येत नाहीए"
कळून ही न वळण हाच मानवजतीचा अनियंत्रित मनाचा पाया आहे, धूम्रपान करणे वाईट हे कळल्या नंतर ही न सोडू शकणारे दुर्योधनाचे वारसदार आज सर्वत्र पाहतोच ना.
पर्यावरणाचा बाबतीत नेमक हेच चाललय मानवच , तापमान वाढ ऋतू बदल, हिमनगंच वितलन , ओझोन चा स्तर कमी होण अशा अनेक समस्या समोर येऊन देखील तो त्या कडे दुर्लक्ष करतोय, अगदी सहज. ओक्सीजन पेक्षा आज त्याला वाय फाय महत्वाचा वाटतो,, ह्या बाबतीत मानवा पेक्षा मूर्ख प्राणी जगात दुसरा कुणी नाहीये, सांस्कृतिक उद्या चा वेळेस मानवाला निसर्गाच महत्व चांगलच माहीत होत कारण बुद्धी चा विकासाचा वेग आणि त्याचा मनवीय मुल्य विकासाचा वेग समान होता म्हणूनच सर्व धर्म् ग्रंथात निसर्गला अनन्य साधारण महत्वा आहे, मग ते भारतीय उपखंडात उगम पावलेले असो की मध्या अशिया तील धर्म्. कोणतीही आर्थिक प्रगती ही पर्यावरण र्हासा पेक्षा मोठी असूच शकत नाहीय, मात्रा दिशा भरकटलेल्या मानवाला हे कळायला धक्क्यानीच जाग येईल,
खर तर मानवाच्या अफाट बुद्धी च आवाहन पेलण मानव जातीला अवघड होत चाललय अगदी छुप्या पद्धतीने .कारण ह्या प्रगल्भ बुद्धी ची वाटचाल भाव भावनांच्या जंगलातून होत असते ज्यात तिरस्कार , प्रेम, हेवेदावे , भीती , राग , असक्ती अशा अनेक भावनांचे संस्कारण तिचा वर होत असते ज्याचा परिणाम बुद्धधी ची दिशा निर्देशित करण्या वर होतो, व सामूहिक रित्या सबंध मानव जातीवर. वाईट भावनांचा सतत तच्या मार्या मुळे बुध्ढीची निर्मल ते वर आघात होत चाललेयेत नकळत पणे 'हिंसा' तिचात खोल वर रुजत चाललीये आतन्कवाद......... continue
Tushar Mahadik
No comments:
Post a Comment