CONTINUE from last blog........विद्यमान परिस्थितीचा
इतिहासात खोलवर जाऊन विचार केल्यास महत्वाचे पैलू उलगडतात. अश्मयुगा पासून ते प्रागैतिहासिक
काळा पर्यंत 'हिंसा' ही एक जगण्याची गरज होती मात्र आधुनिक काळात ती आकर्षक निवड झलीये
मग ती लहान मुलांचा वीडियो गेम मधील मारामारी असो किवा बड्या राष्ट्रांच्या चैनीच्या
गरजा पुरवण्या करिता त्यानी केलेली मध्या आशियाई देशांची आर्थिक,सामाजिक कुचंबणा यात
मानवीय तत्वांचा र्हास च दिसून येतो.
संपूर्ण पृथ्वीची
संस्कृतिक वाटचाल हा एक दिशहिनते कडे वाळणारा
अनियंत्रित प्रवाह आहे, मधेच अनेक शास्त्रज्ञ, विचारवंत , अध्यात्मिक प्रवर्तक, तत्वज्ञ यानी या प्रवाहाला दिशा देण्याचा प्रयत्न केला ,काहीसा दोलायमान परिस्थितीत राहिलाही मात्रा प्रदिर्घ काळात तो दिशाहिनच राहिला याच कारण दुसर तिसर काही नसून मानवाला स्वतःला
समजून घेण्यात होणार दुर्लक्ष हेच आहे.मध्ययुगात औद्योगिक क्रांतीला आलेल उधाण हे एका
रोगा प्रमाणे सर्वत्र पसरले व गरजेच्या गोष्टीन पेक्षा माणसाच मन चैनीचा वस्तूंचा अधिकाधिक
वापर व मागणी करू लागला ती मागणी पूर्ण करण्या साठी तंत्र शक्तीने जोर धरला व उत्पन्नाचा दर्जा, विक्री , विपणन् यावर मानवी बुद्धी केंद्रित झाली अधिकाधिक नफा मिळवण्या
साठी पच्िमात्य राष्ट्र धावू लागलीत,इथेच भौतिक प्रगती मानवीय मूल्यांचा विकासाच्या
खूप पुढे निघून गेलीत, मन म्हणजे काय , माणूस म्हणजे काय , जीवन म्हणजे काय, हे कळण्या
आधीच मनाचा ताबा प्रलोभनानि घेतला आणि त्याची सुखाची व्याख्याच बदलली अधिकाधिक पैसा
आणि वस्तूचा मागे धावण सुरू झाला कारण समाजात एषारामि आणि खोट्या प्रतिष्ठेची वृत्ती
सर्वत्रच वाढु लागली , तो शर्यतिचा भाग बनला, माणसाचे सुखाचे गमक बदलले मात्र या अहमाहमीकेच्या
स्पर्धेत त्याला सुख आणि अत्माशांती कुठे सापडली नाहीच!
जीवनाचा अर्थ आणि समाधान
बाह्या जगात सापडण अशक्यच, स्वत: ला समजून घेतल्यास च ते शक्य आहे. मात्र अंतर्मनात
पहाणे हा तितकासा रुचकर मार्ग नाहीए अस त्याला वाटत कारण हा मार्ग माणसाला इँद्रीय
तृप्ती देत नाही असा प्रचलित समज आहे त्यामुळे या मार्गाला अध्यात्मता वादचे लेबल लावून
आम्ही मात्र आधुनिक माणस असा खाक्या तो मिरवू लागला कारण आता माणसाला आणि त्याचा बुद्धी
ला प्रलोभनीक आणि भौतिक जाळ्यतून मुळीच बाहेर पडायच नाहीए, मात्र सामूहिक रित्या मानव
जातीचा नाशाच कारण बनायचाय.
इतक्या सहजा सहजी ही गोष्ट जरी कहीना पटली नाही तरी
मानव जातीचा र्हासाच कारण मनवीय मूल्यांचा र्हास च ठरेल हे अंतिम सत्य आहे.
यातच दोन्ही महायुद्धानि भर
घातली आणि…………continue
Tushar Mahadik
No comments:
Post a Comment