Friday, 29 May 2015

माणसा माणसा थांब रे !!-6

continue from last blog..........................................वाईट भावनांचा सतत च्या मार्‍या मुळे बुद्धीच्या निर्मल ते वर आघात होत चाललेयेत.नकळत पणे 'हिंसा' तिचात खोल वर रुजत चाललीये आतन्कवाद ही अशाच विचार सरणीची देणगी आहे. ज्यात बड्या राष्ट्रं च्या भोगी वृत्तीच्या वाढत्या मागण्या शमवण्या साठी आर्थिक उभारणी करताना उचललेल्या पावलंची  उत्पत्ती हा दहशतवाद. आज पूर्ण जग दहशत वादी ना ठेचायला
बळा चा  वापर निष्ठूरतेने करताना दिसतेय  ज्यातुन अधिकाधिक दहशतवाद ची उत्पत्ती होत आहे, शक्तिचा जोरावर दहशतवाद च दमन होऊ शकेल पण नायनाट कधीच नाही, ह्याची मुळे खोल वर रुजली गेलियेत, मानवी मनाचा  तळात. कोणत्या ही विशिष्ट धर्माला दहशतवदशी जोडण निरर्थक अहे. दहशतवादी वृत्तीचा नायनाट करण्या साठी ज्या प्रमाणे जिथून डासांची उत्पत्ती होतेय त्या ठिकाणाची स्वच्छता कारण आवश्यक असता त्या प्रमाणे मानवजतीचा डोक्यात तग धरून बसलेल्या हव्यसी वृत्ती ची हकल पट्टी होन गरजेचे आहे,
आज वाढत्या तेल मागणी चा मागे जी आंतरराष्ट्रीय अराजक्ता पसरावली जात आहे ती लहान बड्या राष्ट्रं तील सामूहिक रित्या असमाधानी आणि अनियंत्रित मनवीय मनाचा परिपाक आहे. जरी कितीही अवघड वाटत असल तरीही दहशतवादा च मूळ हेच आहे.आतन्कवाद हा निर्मित आहे उपजत नाही. उपजत: सगळे निर्मल च असतात. 
जगाच नेतृत्व करणार्‍या संस्था , व्यक्ती , प्रसार माध्यमे कंपन्या यांचा वर मानवाचा इतिहासात मोठा फेरबदल करण्याची क्षमता आहे. तितकच जबाबदारीने त्यांनी जगाचा विचार करायला हवा फक्त स्व राष्ट्रं पुरता मर्यादित दृष्टिकोन ठेऊ नये लोकमता चा प्रवाह.............Continue

Tushar Mahadik

Wednesday, 27 May 2015

माणसा माणसा थांब रे !!-5





continue from last blog.................सर्वात मोठा विरोधा भास असा आहे की या विनाशकतेला  त्याने प्रगतीच नाव दिल आहे. मुळात  पर्यावरणाच्या र्‍हासाची मानवाला कल्पना नाही किवा त्याला जाणीव होत नाही अस नाही.  त्याच्या बुद्धीला सगळ कळत, इथे महाभारतातील एक कीस्सा सांगावासा वाटतो; अनेकान कडून भागवत गीतेवर भाष्या केला जात की जर श्री कृष्णा ने गीता अर्जुन एवजी दुर्योधनाला सागितली असती तर महाभारताच युद्ध च झाला नसता.मात्र नीट निरखून पाहिल्यास युद्धा आधी कृष्णा ने दुर्योधनाला भेटून समजवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो त्या वेळी  दुर्योधनाच उत्तर आजची परिस्थिती च पारिभाषित करते

 " मला सगळ कळतय की ह्या युद्धात प्रचंड हानी च होणार आहे आणि माझी बाजू चुकीची आहे पण जरी याची जाणीव मला असली तरीही अडचण अशी आहे की, आत्ता मला ते बदलता येत नाहीए"
 कळून ही न वळण हाच मानवजतीचा अनियंत्रित मनाचा पाया आहे, धूम्रपान करणे वाईट हे कळल्या नंतर ही न सोडू शकणारे दुर्योधनाचे वारसदार आज सर्वत्र पाहतोच ना.
पर्यावरणाचा बाबतीत नेमक हेच चाललय मानवच , तापमान वाढ ऋतू बदल, हिमनगंच वितलन , ओझोन चा स्तर कमी होण अशा अनेक समस्या समोर येऊन देखील तो त्या कडे दुर्लक्ष करतोय, अगदी सहज. ओक्सीजन पेक्षा आज त्याला वाय फाय महत्वाचा वाटतो,, ह्या बाबतीत मानवा पेक्षा मूर्ख प्राणी जगात दुसरा कुणी नाहीये, सांस्कृतिक उद्या चा वेळेस मानवाला निसर्गाच महत्व चांगलच माहीत होत कारण बुद्धी चा विकासाचा वेग आणि त्याचा मनवीय मुल्य विकासाचा वेग समान होता म्हणूनच सर्व धर्म् ग्रंथात निसर्गला अनन्य साधारण महत्वा आहे, मग ते भारतीय उपखंडात उगम पावलेले असो की मध्या अशिया तील धर्म्. कोणतीही आर्थिक प्रगती ही पर्यावरण र्‍हासा पेक्षा मोठी असूच शकत नाहीय, मात्रा दिशा भरकटलेल्या मानवाला हे कळायला धक्क्यानीच जाग येईल,
खर तर मानवाच्या अफाट बुद्धी च आवाहन पेलण मानव जातीला अवघड होत चाललय अगदी छुप्या पद्धतीने .कारण ह्या प्रगल्भ बुद्धी ची वाटचाल भाव भावनांच्या जंगलातून होत असते ज्यात तिरस्कार , प्रेम, हेवेदावे , भीती , राग , असक्ती अशा अनेक भावनांचे संस्कारण तिचा वर होत असते ज्याचा परिणाम बुद्धधी ची दिशा निर्देशित करण्या वर होतो, व सामूहिक रित्या सबंध मानव जातीवर. वाईट भावनांचा सतत तच्या मार्‍या मुळे बुध्ढीची निर्मल ते वर आघात होत चाललेयेत नकळत पणे 'हिंसा' तिचात खोल वर रुजत चाललीये आतन्कवाद......... continue

Tushar Mahadik

Tuesday, 26 May 2015

माणसा माणसा थांब रे !!-4

Continue from last blog................याचाच परिणाम म्हणून अनेक लहान राष्ट्रे  मूलभूत प्रश्नान साठी  गुदमरलेल्या श्वासने अक्षरशः चिरडून निघत आहेत.
सर्वमान्य सिद्धांता नुसार मानवाची प्रगती ही फक्त आर्थिक प्रगती नुसारच मोजली जाते, ज्ञान प्राप्ती ही एका दुर्लक्षित सूर्योदाया प्रमाणे अस्त होत आहे. 'ज्ञानम् परमम् ध्येयम्' या उक्ती प्रमाणे ज्ञान  प्रप्तीच सर्वात मोठी प्रगती आहे. स्वतः ला स्वत: कडून नेमक काय आणि का ह्वे? याच खोल वर प्रचीती आली की मानव अन्तर्ज्ञान प्राप्ती कडे आपोआप वळेल. पण 'मला' इतराणकडून आणि परिस्थिती कडून काय हवे याच प्रश्नात मानव गुरफटून बसलाय आज.
नियंत्रित मन म्हणजे हव्यसी व अकारण असलेल्या गरजा  कमी आणि कमी गरजा म्हणजे  अधिक समाधानी वृत्ती, हीच गोष्ट तांत्रीक प्रगती सोबत मानवाला कळल्यास सर्वत्र विकासा सोबत शांती नांदताना दिसेल व प्रगतीचा नावाखाली होणारी बड्या राष्ट्रांची कुरघोड कमी होईल.
ह्या अनियंत्रित मनोवृत्ती चे पडसाद फक्त आर्थिक सामाजिक स्तरवरच उमटत नसून जगण्याची मूलाधार असलेली पर्यावरण संस्था ह्यात होरपळून गेलिये, ही कृती विनाशक ठरणार आहे,नुकत्याच झलेल्यासायन्स मासिकातील एका सर्वे नुसार वातावरण बदला मुळे पृथ्वी चा तापमान 4.3 अंश नि वाढण्या ची शक्यता आहे त्या मुळे प्रत्तेक 6 पैकी 1 जीव नष्ट होईल त्यांना हा अचानक झलेला बदल सहन करणे अशक्या आहे, करोडो वर्षं पासून उत्क्रन्त झलेले जीव मानवाचा मूर्ख पणा मुळे नष्ट होतील, आणि अन्न साखलीतील त्यांचा रिकाम्या जागेचा अतिशय हानिकारक प्रभाव मानवावर पडेल ज्यातुन त्याला सावरण अगदी अशक्यच. दुसर्या बाजूने पाहता ह्या वातावरण बदला मुळे मूलभूत गरजा जसे अन्न वस्त्रा निवारा पूर्ण करणे अतिशय अवघड होऊन बसेल ज्या मुळे हालखीची आर्थिक परिस्थिती असलेली राष्ट्रे बंडखोरीत बदलतील व मूलभूत हक्कं साठी लढ सुरू करतील त्याचा वाईट परिणाम संपूर्ण जगावर होईल, आज भारता सारख्या देशांतील नैसर्गिक आपत्तीने पिढीतांची पुनर्वसना चा प्रश्ना वरुन याची कल्पना येऊ शकते पर्यावर्णाचा र्‍हास हा मानव जातीचा र्‍हास आहे याची पूसटशी कल्पना देखील आज मानवाला आर्थिक प्रगती पेक्षा कमी वाटते, सर्वात मोठा विरोधा भास असा आहे की......Continue

Tushar Mahadik

Sunday, 24 May 2015

माणसा माणसा थांब रे !!-3

continue from last blog..........यातच दोन्ही महायुद्धानि भर घातली आणि ही दरी अतिशय रुंद केली, यात नव्यं भर पडली ती 'संरक्षक साहित्य पुरवठा' .अतिशय विध्वंसक शास्त्रांची निर्मिती ची स्पर्धा सुरू झाल याची तुलना आपण स्वत: चा चिते साठी लाकडा गोळा करणार्‍या मूर्ख माणसाशी करू शकतो, जगात शांतता नांदवी म्हणून अणुबॉम्ब ची निर्मिती हाच एक विरोधाभास आहे, विद्यमान विचारसरणी एक तकलादू समज आहे.शांतता ही कधीच हिंसा करून नष्ट करता येणार नाही, तात्पुरत्या स्वरुपात ती दिसुशकेल मात्रा तिची पळे मुळे मानवी मनाच्या अनियंत्रित पणात दडलेली आहेत, या भयानक शस्त्र स्पर्धे मुळे जग छुप्या पधतीने अधिकाधिक असुरक्षित बनत चाललेय. बड्या राष्ट्रांचा शस्त्रास्त्रे विकून  स्वत: चा अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्नात त्यानी या स्पर्धेत अक्षरशः झोकून घेतलेय, ही स्पर्धा नक्कीच मानव जातीला विपरीत दिशेत घेऊन जातेय शांतता ही शांततेनेच प्रस्थापित होऊ शकेल आणि तिचा मार्ग स्वताहा चा अत्मिक नियंत्रणातून जातो. अद्ययावत शस्त्र निर्मिती मुळे जगच नेतृत्व आज ह्या राष्ट्रं कडे फेल गेलय त्यांचा निर्णया वर आज मानव जातीच भवितव्या अवलंबुन आहे, आपल्या फयद्या साठी ही राष्ट्रे जगाचा वापर करताना दिसून येतात, राजकीय अराजक्ता ही बड्या राष्ट्रांचा हव्यासाची देणगी आहे बर्‍याचदा ही अराजक्ता छुप्या पद्धतीने निर्मित असते,राष्ट्राला आर्थिक बळकटी देण्याचा तो प्रयत्नअसतो, आणि या आर्थिक मागणीचा मुळाशी जाउन पाहिल्यास आपल्यला मानवी मनाचा अनियंत्रित पणा च सामूहिक रित्या जबाबदार दिसेल, जर आज अचानक सगळी शस्त्रास्त्रे आपोआप नाहीशी झालीत तर........सर्व प्रश्न सुट्टील? जगात शांतता सुरक्षितता नान्देल? नाही कधीच नाही . मानवी मन अजुन नवीन घातक शस्त्रे शोधून काढेल आणि पुन्हा ही स्पर्धा चालू ठेवील, याचा कारण  आजची मनाची गंजलेली अवस्था, त्याला खरच माहीत नाहीए की तो दिशा चुकलय हीच मोठी शोकांतिका.याचाच परिणाम म्हणून अनेक लहान राष्ट्रे  मूलभूत प्रश्नान साठी  गुदमरलेल्या श्वासने अक्षरशः चिरडून...........CONTINUE 


TUSHAR MAHADIK

Friday, 22 May 2015

माणसा माणसा थांब रे !!-2

CONTINUE from last blog........विद्यमान परिस्थितीचा इतिहासात खोलवर जाऊन विचार केल्यास महत्वाचे पैलू उलगडतात. अश्मयुगा पासून ते प्रागैतिहासिक काळा पर्यंत 'हिंसा' ही एक जगण्याची गरज होती मात्र आधुनिक काळात ती आकर्षक निवड झलीये मग ती लहान मुलांचा वीडियो गेम मधील मारामारी असो किवा बड्या राष्ट्रांच्या चैनीच्या गरजा पुरवण्या करिता त्यानी केलेली मध्या आशियाई देशांची आर्थिक,सामाजिक कुचंबणा यात मानवीय तत्वांचा र्‍हास च दिसून येतो.
संपूर्ण पृथ्वीची संस्कृतिक वाटचाल हा एक दिशहिनते कडे वाळणारा अनियंत्रित प्रवाह आहे, मधेच अनेक शास्त्रज्ञ, विचारवंत , अध्यात्मिक प्रवर्तक, तत्वज्ञ यानी या प्रवाहाला दिशा देण्याचा प्रयत्न केला ,काहीसा दोलायमान परिस्थितीत राहिलाही मात्रा प्रदिर्घ काळात तो दिशाहिनच राहिला याच कारण दुसर तिसर काही नसून मानवाला स्वतःला समजून घेण्यात होणार दुर्लक्ष हेच आहे.मध्ययुगात औद्योगिक क्रांतीला आलेल उधाण हे एका रोगा प्रमाणे सर्वत्र पसरले व गरजेच्या गोष्टीन पेक्षा माणसाच मन चैनीचा वस्तूंचा अधिकाधिक वापर व मागणी करू लागला ती मागणी पूर्ण करण्या साठी तंत्र शक्तीने जोर धरला व उत्पन्नाचा दर्जा, विक्री , विपणन् यावर मानवी बुद्धी केंद्रित झाली अधिकाधिक नफा मिळवण्या साठी पच्िमात्य राष्ट्र धावू लागलीत,इथेच भौतिक प्रगती मानवीय मूल्यांचा विकासाच्या खूप पुढे निघून गेलीत, मन म्हणजे काय , माणूस म्हणजे काय , जीवन म्हणजे काय, हे कळण्या आधीच मनाचा ताबा प्रलोभनानि घेतला आणि त्याची सुखाची व्याख्याच बदलली अधिकाधिक पैसा आणि वस्तूचा मागे धावण सुरू झाला कारण समाजात एषारामि आणि खोट्या प्रतिष्ठेची वृत्ती सर्वत्रच वाढु लागली , तो शर्यतिचा भाग बनला, माणसाचे सुखाचे गमक बदलले मात्र या अहमाहमीकेच्या स्पर्धेत त्याला सुख आणि अत्माशांती कुठे सापडली नाहीच!


जीवनाचा अर्थ आणि समाधान बाह्या जगात सापडण अशक्यच, स्वत: ला समजून घेतल्यास च ते शक्य आहे. मात्र अंतर्मनात पहाणे हा तितकासा रुचकर मार्ग नाहीए अस त्याला वाटत कारण हा मार्ग माणसाला इँद्रीय तृप्ती देत नाही असा प्रचलित समज आहे त्यामुळे या मार्गाला अध्यात्मता वादचे लेबल लावून आम्ही मात्र आधुनिक माणस असा खाक्या तो मिरवू लागला कारण आता माणसाला आणि त्याचा बुद्धी ला प्रलोभनीक आणि भौतिक जाळ्यतून मुळीच बाहेर पडायच नाहीए, मात्र सामूहिक रित्या मानव जातीचा नाशाच कारण बनायचाय.
इतक्या सहजा सहजी ही गोष्ट जरी कहीना पटली नाही तरी मानव जातीचा र्‍हासाच कारण मनवीय मूल्यांचा र्‍हास च ठरेल हे अंतिम सत्य आहे.

यातच दोन्ही महायुद्धानि भर घातली आणि…………continue

Tushar Mahadik

Thursday, 21 May 2015

माणसा माणसा थांब रे !!-1

माणसा माणसा थांब रे !!

जगातली सर्वात मोठी आणि अनियंत्रित शक्ति कोणती असेल तर ती आहे 'मानवी मन'. सृजन आणि विध्वंस अशा दोन्ही दिशामधे अफाट कार्य करण्याची क्षमता ती बाळगते. या दुधारी शक्तिचा प्रत्यय चहु ओर दिसून येतो,मात्र एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, तिची विनाशक बाजू नकळत पणे अधिकाधिक धारदार होत चाललीये. मानवी मनाचा कल गेल्या काही शतका पासूनतांत्रीक प्रगती कडे झुकत आहे यात अनियंत्रित शक्ति कोणती असेल तर ती आहे 'मानवी मन'. सृजन आणि विध्वंस अशा दोन्ही दिशामधे अफाट कार्य करण्याची क्षमता ती बाळगते. या दुधारी शक्तिचा प्रत्यय चहु ओर दिसून येतो,मात्र एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, तिची विनाशक बाजू नकळत पणे अधिकाधिक धारदार होत चाललीये. मानवी मनाचा कल गेल्या काही शतका पासूनतांत्रीक प्रगती कडे झुकत आहे यात वावग अस काही नाहीए मात्र तांत्रीक विकासा सोबत त्याच स्वताहा ला समजून घेण्याच तत्वज्ञान संथ गतीने रेंगालात आहे, एकंदर काय तर भौतिक प्रगती सोबत मानवीय मुल्य विकासा च समान आणि प्रभावी वितरण आज प्रतेका पर्यंत पोहोचो शकले नाहीए, तांत्रीक आणि चैनीचा उपकरणांचा भडिमार होत आहे आणि अंतज्ञान मिळवण्याचा मार्ग मात्र कोल्मडात चाललाय. याच कारणास्तव आज सबंध जग अनियंत्रित रित्या कोळाहलिक दरीत कोसळत आहे , अगदी सोप्या शब्दांत सांगायायचे झाल्यास' अफाट शक्तिचा वापर करण्यास तितकाच संयम हवा तो अत्मिक विश्लेषणाने प्राप्त होतो आणि त्यावरच मानव जातीच भवितव्य अवलंबुन आहे.

विद्यमान परिस्थिती खोलवर इतिहासात ज़ाऊन पाहता ....CONTINUE


TUSHAR MAHADIK

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...