प्राचीन विज्ञान
विद पासून उगम पावलेल्या वेद शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान असाच आहे जसा scientia ह्या लॅटिन शब्दापासून तय्यार झालेल्या सायन्स शब्दाचा आहे. मात्र वेदांची शात्रोक्त बांधणी आधुनिक विज्ञानाच्या उगमाच्या हजारो वर्षां पूर्वी च झाली होती. आधुनिक विज्ञान आणि पौर्वात्य आत्मिक ज्ञान हे परस्पर विरोधी मानावेत कि एकाच वृक्षाच्या दोन फांद्या म्हणाव्यात. एकाला तार्किक चौकटीतून तर दुसऱ्याला तर्कविसंगतीतून पाहावे काय? याविषयी उहापोह पुढील लेखांमध्ये आपण करूच. किंबहुना ती काळाची गरजच आहे म्हणा. भौतिक शास्त्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ नील्स बोहर, ताओ ऑफ फिज़िक्स (१९७५) या पुस्तकात, “I go to the Upanishad to ask questions.” असे का म्हणतो याचे उत्तर शोधावेच लागेल. प्राचीन विज्ञान लेखांच्या मालिकेच्या माध्यमातून अश्याच काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
भारतीय संस्कृतीचा मूलाधार मानल्या गेलेल्या वेदांच्या रचनेमागिल कारण थोडक्यात पाहुयात, म्हणजे पुढील अभ्यास सोपा ठरेल. वेद शब्दापासून विद्या म्हणजेच अर्जित ज्ञान, आणि ज्ञानार्जन केलेला व्यक्ती विद्वान असे शब्द रचले गेलेत. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आजच्या काळातील कोणतेही अद्ययावत भौतिक उपकरण अस्तित्वात नव्हते. तेव्हाही मानवाला अनेक प्रश्न पडत असत. मात्र Google करून उत्तर शोधणे शक्य नसल्यामुळे जीवनाशी संबंधित प्रश्नांची उकल करण्यासाठी तो स्वतः प्रयत्न करीत आणि अतोनात प्रयत्न करून त्याला जे ज्ञान प्राप्त होई ते आत्मिक ज्ञानावर आधारित असे. म्हणजेच जाणिवेच्या माध्यमातून प्रत्यक्ष आकलन केलेले. पुढील पिढीला हे प्राप्त ज्ञान द्यायचे असल्यास तेही प्रत्यक्ष जाणिवेच्या माध्यमातूनच दिले जाई, कोणत्याही प्रकारे निव्वळ विश्वास न ठेवता.
प्रत्येक विषयावर हजारो प्रश्न उपस्थित करून जो पर्यंत समाधानपूर्वक उत्तर मिळत नाही तो पर्यंत कोणतेही सांगितले गेलेलं ज्ञान अर्जित केले जात नसे. जगात क्वचितच कोठे अश्या प्रकारे शिक्षण देण्याची प्रथा असावी.
भारतीय भूमीवर जन्मलेली कोणतीही संकल्पना किंवा तत्वज्ञान अस्तित्ववादाच्या प्रखर परीक्षेतून गेल्यावरच मान्य होत असे. निव्वळ परिकल्पना म्हणून नव्हे. कदाचित पुढे आत्मज्ञानाने प्राप्त झालेले कल्याणकारी आत्मसाक्षात्कार सामान्यांना समजण्यास सोपे आणि सुलभ व्हावेत म्हणून प्रतीके आणि गोष्टी च्या स्वरूप सांगितले जाऊ लागले. वेळ आणि अवकाशाचा अल्बर्ट आईन्स्टाईन चा सापेक्षता वादाचा सिद्धांत सुद्धा सामान्यांना गोष्टीरूपात सांगावा लागतो तसेच काहीसे. साक्षात्कारातून साकारलेली आणि मानवोपयोगी शिकवण दीर्घकाळ टिकून राहावी याकरिता प्रथा आणि परंपरा निर्माण केल्या गेल्यात, परंपरा निर्माण होण्यामागील विज्ञान हेच आहे कि, कल्याणकारी गोष्ट परंपरेच्या स्वरूपात अधिकाधिक पिढ्यांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. ह्याच परंपरांचा संग्रह म्हणजे आधुनिक भाषेततिल धर्माची संकल्पना गणले गेले. मानवी मन स्थिर नसल्याने पुढील काही काळात त्या परंपरांमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी समाविष्ट होत गेल्या. मात्र सामाजिक दृष्ट्या लाभकारी असलेल्या कित्येक सर्वसमावेशक आणि कल्याणकारी परंपरा आजही तग धरून. प्राचीन विज्ञान ग्रहण करण्या करीता गरजेची असलेली गुरुशिष्य परंपरा गेल्या ३०० वर्षांत लुप्त होत गेल्यामुळे, जमेल तसा अर्थ देऊन हे ज्ञान पुढे ढकलण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो, त्यामुळे आधुनिक तर्कसंगत पिढीद्वारे अश्या गोष्टीना भ्रामक मानून त्या हळू हळू दुर्लक्षित केल्या जाऊ लागल्यात.
तर्कसंगत बुद्धी तुमच्या बाह्य प्रगतीकरिता आणि टिकून राहण्याच्या कामात मोलाचे योगदान देते, मात्र अस्तित्वाविषयी जाणून घेण्याच्या प्रयत्नात तर्क अपुरा पडतो. एबीओजेनेसिस ह्या पृथीवरील जीवनाच्या उगमाचा शोध घेणाऱ्या विज्ञानाच्या शाखेमध्ये जीवनाचे उगम स्थान शोधताना सगळे तर्क अपुरे पडून निव्वळ एक जादुई योगायोग म्हणून पृथ्वीवरील जीवनाची सुरुवात मानवी लागते. कृष्ण विवर, डार्क energy डार्क मॅटर, ऑबसर्वर पॅराडॉक्स, quantum एंटॅगलमेंट सारख्या आधुनिक विज्ञानाला सतावणाऱ्या अनेक प्रश्नांपुढे तर्कबुद्धी गुढगे टेकते. कारण सर्वत्र प्रस्थापित भौतिक नियम येथे लागू होत नाहीत. मग तर्क विसंगती म्हणजे अज्ञान असे म्हणून ह्या किचकट गणितांना सोडून द्यावे काय? अगदी जसे काही आत्मज्ञानावर आधारित आणि कल्याणकारी परंपरांना अज्ञानी म्हणून हिणवत सोडून दिले गेले? नाही. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आज उपलब्ध असलेल्या ज्ञानाच्या आधाराव सापडत नसेल तर कदाचित पुढे ज्ञान संवर्धन झाल्यास सापडू शकेल, उदाहरणादाखल. भारतीय संस्कृतीमध्ये ठरावीक वेळेनंतर संपूर्ण उपवास करण्याची प्रथा सामील आहे. हि प्रथा कुणी आणि का सुरु केली असावी याचा काही पुरावा नाही, मात्र कुठेतरी लाभकारी असल्यामुळे ती अजूनही तग धरून आहे. आधुनिक या नावाचे बिरुद मिरवणाऱ्या काहींनी कित्त्येक वर्षे उपवासाची खिल्ली उडवली मात्र एक आधुनिक जपानी cell biologist Yoshinori Ohsumi यांनी २०१६ सालचे नोबेल पारितोषिक उपवास का करावा हे सांगूनच जिंकले. या संदर्भात Intermediate fasting च्या नावाने बरीचशी माहिती आज इंटरनेट वर उपलब्ध आहे आपण स्वतः च या संदर्भात माहिती मिळवावी आणि संपूर्ण शोध निबंध आणि भारतीय संस्कृतीचा भाग असलेला उपवास या दोन्हींचा
अभ्यास करून यांच्यात काही साधर्म्य आहे काय पडताळून पाहावे. एक ना अनेक गोष्टी ज्या आज तुमच्या ज्ञानानुसार कोणत्याही तार्किक चौकटीत बसूशकणार नाहीत मात्र कल्याणकारी आहे, या संस्कृतीने जपलेल्या आहेत, मात्र याची जाणीव होण्याकरिता
कोणीतरी पाश्चिमात्याने ती तुम्हाला सांगावी लागेल. कारण भारतीय संस्कृती कशी तर्क विसंगत आहे याचा साचेबंद गेल्या दोनशे वर्षांत आपल्या बुद्धीवर साचलेला आहे. मात्र एकी गोष्ट ध्यानी असुदे, कोणतीही गोष्ट
अभ्यासल्या शिवाय त्याविषयी मत बनवणे हीच सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे, आधुनिक संस्कृती असो किंवा प्राचीन संस्कृती असो अंधश्रद्धेला भारतीय भूमीवर थारा नाही. पुढील लेखात आपण अश्याच काही निवडक संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत.
No comments:
Post a Comment