१९७५ साली भारताचा पहिला उपग्रह सोवियेत युनियन च्या मदतीने अवकाशात झेपावला आणि महान भारतीय गणित तज्ज्ञ आणि खगोलशात्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव उपग्रहाला देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा एक लहानसा प्रयत्न केला.
आजच्या पिढीला आर्यभट्ट आणि त्यांच्या कार्याची थोडक्यात नव्याने ओळख करून द्यावी लागेल, कारण इतिहासाच्या पानांवर आर्यभट्ट आणि त्यांच्या सारख्या महान व्यक्तिमत्वाना जागा उरलेली दिसत नाही. काही ठिकाणी तुटपुंजा उल्लेख आढळतो.
आर्यभट्टांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारसे पुरावे उपलब्ध नसल्याने अंदाजे इसवीसन पूर्व ४७६ साली त्यांचा जन्म झाला असे मानले जाते. त्यांनी त्यांच्या ७४ वर्षाच्या जीवनकाळात तत्कालीन प्रस्थापित विचारधारे सोबत न वाहून जाता अनके गूढ रहस्यांची उकल स्वतः केली. त्यांचे कार्य पाहिल्यास ते त्या काळातील नाहीच असे वाटू लागते.
जर आज तुम्हाला सांगितले कि पृथ्वी सूर्याभोवती किती वेळात प्रदक्षिणा पूर्ण करते याचे उत्तर स्वतः हुन शोधा, तर कदाचित आपण विचारात पडू. मात्र आज पासून दोन हजार वर्षांपूर्वी आणि आपण शाळेत शिकलेल्या कोपर्निकस ने पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सांगण्याच्या एक हजार वर्षांपूर्वी आर्यभट्टाने पृथ्वी प्रदिक्षिणेचा जो काळ सांगितलं तो आहे, ३६५.२५८५८ दिवस आणि आजची अद्ययावत उपकरणे आणि वापरून मोजलेला काळ आहे ३६५.२५६३६ दिवस, म्हणजे ३ मिनिटे २० सेकंदांचा फरक. तसेच आर्यभट्टाने मोजलेला एक दिवसाचा कालावधी होता २३ तास
५६ मिनिटे आणि ४.१ सेकंड्स, आज आधुनिक पद्धतीने गणला गेलेला काळ आहे २३ तास ५६ मिनिटे ४.०९१ सेकंड, आत्ता आपणच शोधावे नेमका किती मायक्रोसेकंदांचा फरक आहे ते. दोन हजार वर्षांपूर्वी गुप्त काळातील समृद्ध पाटलीपुत्र या राजधानीत राहत आणि शिष्याना आपली शिकवण देत आधुनिक गणित आणि खगोलशास्त्रालाही सहज सोपे न वाटणारे त्रिकोणमिती आणि बीजगणितातील संकल्पनांचाअचूक शोध घेतला. ग्रहणे आणि इतर ग्रहांचे सूर्याभोवती फिरण्याची गणिते मांडलीत, पाय ची किंमत निर्धारित केली, शून्याचा वापर प्रचलित केला.
त्याकाळी आपला सिद्धांत आणि शोध मोजक्या शब्दांत श्लोकबद्ध करण्याची उपयुक्त रीत प्रचलित असल्याने आर्यभट्टाने आपले संशोधन श्लोकबद्ध केले. ज्यातील अनेक रचना आज काळाच्या ओघात नष्ट झाल्या असून १०८ श्लोकांचा आर्यभटीय आणि आर्यसिद्धांत हे ग्रंथ आजही अभ्यासास उपलब्ध आहेत. अनेक परकीय विद्यापीठांनी आर्यभट्टाच्या कार्याची दाखल घेत अनेक शोध निबंध प्रसिद्ध केलेलं आहेत आपण ते जरूर अभ्यासावे. आणि प्राचीन मात्र प्रगत भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यावी.
No comments:
Post a Comment