चुकांमधून शिकता येते हि गोष्ट कळायला लागली कि बऱ्याचदा आयुष्य सोपे वाटू लागते. कधीकधी लहान
गोष्टीसुद्धा मोठा बोध देऊन जातात. जसे बुद्धिबळाचा खेळ, बुद्धिबळाच्या खेळातून शिकण्यासारख्या तश्या असंख्य गोष्टी आहेत. एक सामना गमावल्यानंतर अशीच एक शिकवण माझ्याही पदरी पडली.
मी निष्णात खेळाडू नाही, मात्र कधी कधी बुद्धिबळ खेळणे मला आवडते. एके सायंकाळी ऑनलाईन पद्धतीने खेळत असताना खेळ रंगात आला अन चाल प्रतिचाल करीत एकमेकांना पराभूत करण्यासाठी मी आणि माझा प्रतिस्पर्धी एकाग्र होऊन खेळू लागलो. खेळाला वेळेची मर्यादा असल्याने कमीत कमी वेळेत योग्य निर्णय घेऊन उपलब्ध सोंगट्यांची उपयुक्त मांडणी करणे आवश्यक असते. त्यामुळे बुद्धिबळातील बुलेट प्रकारच्या खेळात फक्त एका मिनिटाच्या वेळेत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नांना एक वेगळाच थरार प्राप्त होतो. प्रयत्न करून हि हा सामना मी ०.००.१ मिनिटे म्हणजेच एका सेकंदाच्या सहाव्या भागाच्या फरकाने गमावला.
सामना संपल्यावर विचारचक्र सुरू झाले. अनेक प्रसंगात आपल्याजवळ खूप वेळ असूनदेखील योग्य नियोजन करायला आपण फार वेळ लावतो तसेच जिथे लवकर निर्णय घेता येतील अश्या प्रसंगातही गरज नसताना आपण
खूप विचार करत बसतो. वेळ मात्र सतत निसटून जात असतो...
प्रत्येक क्षणाचे महत्व ओळखून त्याचे नियोजन आणि लवकर अचूक निर्णय घेण्याची क्षमताच आपल्याला जिंकावत असते, आयुष्यातही. कौशल्य असूनदेखील वेळेचे महत्व न ओळखल्यास आणि निर्णय घेण्यास दिरंगाई करीत बसल्यास काही उपयोग होत नाही. जसे वर नमूद केलेल्या खेळात माझ्या प्रतिस्पर्ध्याने फक्त काही मिलिसेकंद कमी घेतलेत आणि तो जिंकू शकला. प्रत्येक क्षण महत्वाचा असून त्याचे महत्व मात्र आपल्याला त्या क्षणी जाणवत नाही आणि हाच अजाणतेपणा वेळेचा सदुपयोग करण्याच्या कामातील सर्वात मोठा अडसर ठरतो.
वेळेचे महत्व वेळीच ओळखावे त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी नक्कीच मदत होईल.

No comments:
Post a Comment