*The primary task is to keep our originality intact.*
What does originality mean exactly? It simply means not to establish any falsehood. Originality doesn't mean that staying undeveloped and as it is but maintaining the natural character of our lives in any situation. It is necessary to make progress by uplifting ourselves as per the situation and time and make necessary personality change, but while doing so we should not hide our natural identity from ourselves and become a copy of the personality of others. The original you should blossom.
सुविचार २२७
*आपली मौलिकता जपणे हे प्राथमिक कार्य समजावे*
खरं पण म्हणजे नेमक काय? तर अंतर्मनाला कोणत्याही खोट्या गोष्टीचा आधार न जोडणे. खरं पण जपणे म्हणजे अपरिपक्व अवस्थेत राहणे असे नव्हे तर कोणत्याही अवस्थेत, परिस्थितीत स्वतः च्या मनाला पटू शकणारे नैसर्गिक आचरण कायम ठेवण्याची योग्यता. काळानुरूप परिस्थितीशी समायोजन साधने आणि स्वतः मध्ये बदल करत प्रगती करणे ही गरजच आहे, मात्र तसे करत असताना आपले नैसर्गिक स्वत्व स्वतः पासूनच लपवून इतरांच्या व्यक्तिमत्वाची प्रत आपण बनू नये. तुमच्यातील खरे तुम्ही बहरायला हवे.
No comments:
Post a Comment