Thursday 31 December 2020

New dawn brings a new ray of hope and strength. Quote #TM236

Quote #TM236

*New dawn brings a new ray of hope and strength.*

May all your feebleness disappear, may you have the ability to take on new heights with new vigor, may the Creator grant you all strength, may the new rays of this new dawn illuminate every corner of your mind, and may the time to come be extremely beautiful for you.

सुविचार २३६

*नवीन पहाट आशेचा आणि सामर्थ्याचा एक नवीन किरण घेउन आली आहे.*

तुमचा सर्व क्षीण नाहीसा होवो, नव्या जोमाने नवी भरारी घेण्याची क्षमता तुमच्या अंगी येवो, सृष्टी कर्ता तुम्हाला सर्व सामर्थ्य प्रदान करो, आजच्या नव्या पहाटे अशेची नवीन किरणे तुमच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्याला प्रकाशमान करो अन् येणारा काळ तुमच्या साठी अप्रतिम सुंदर जावो.

Wednesday 30 December 2020

The uncertain curves on the path of life will teach us how to balance. Quote #TM235

Quote #TM 235

*The uncertain curves on the path of life will teach us how to balance*

Uncertainty is an integral part of life.  Since the logical capacity of the human mind is very limited, not all the twists and turns of life can be seen from the logical framework.  Basically, it is this uncertainty that inspires us to stay motivated in life and it makes us excited for the next moment, if we face each new turn in life with enthusiasm, we can certainly find the power to balance.
For each of these uncertain turns, may you get the power to balance.

सुविचार २३५

*जीवनाच्या मार्गावरील अनिश्चित वक्र आपल्याला संतुलित कसे करावे हे शिकवेल*

अनिश्चितता हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मानवी मनाची तार्किक क्षमता फारच मर्यादित असल्यामुळे तार्किक चौकटीतून आयुष्यातील सर्वच वळणे आणि चढ उतार दिसू शकतील असे नाही. मुळात हीच अनिश्चितता आयुष्यात प्रेरित राहण्यासाठी उद्युक्त करते आणि पुढील क्षणासाठी आपल्याला उत्साही बनवते, जिवनात प्रत्येक नव्या वळणावर उत्साहाने सामोरे गेल्यास नक्कीच समतोल साधण्याचे सामर्थ्य मिळू शकते.
अश्या प्रत्येक अनिश्चित वळणा करीता तुम्हाला समतोल राखण्याची शक्ती मिळो.

Tuesday 29 December 2020

If you want to experience the magical energy of absolut involvement, join any sport in life. Quote #TM234

Quote #TM234

*If you want to experience the magical energy of absolut involvement, join any sport in life.*

When we involve absolutely, the mind becomes concentrated and all the energies come together which is the first step of spiritual progress.  As Swami Vivekananda said, kicking a football is more spiritual than praying.  Because the level of concentration of the mind is elevated to the next level while playing. 
We can experience our energy through higher awareness which can happen only when we are in the same state of absolute involvement, playing sport is one of the easiest and highest ways to experience this.

सुविचार २३४

*जर आपल्याला सम्पूर्ण सहभागितेची जादूई उर्जा अनुभवायची असेल तर आयुष्यात कोणत्याही खेळा ला सामील करा.*

कोणत्याही गोष्टीत सम्पूर्ण सहभाग साधल्यास मन एकाग्र होते आणि सगळ्या उर्जा एकवटतात, आत्मिक प्रगतीची हीच पहिली पायरी. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्या प्रमाणे, फुटबॉलला किक मारताना तुम्ही जास्त अध्यात्मिक असता ज्यावेळी प्रार्थना करत असता त्या पेक्षा. कारण खेळते वेळी मनाच्या एकाग्रतेचा स्थर उंचावलेला असतो. अन् ह्याच अवस्थेत
उच्च जगृक्तेच्या माध्यमातून आपल्या उर्जा अनुभवता येवू शकतात. म्हणुन कोणताही खेळ खेळून याची अनुभूती घेणे हाच सर्वोच्च पर्याय आहे.

Monday 28 December 2020

It is difficult to keep it simple. Quote #TM233

Quote #TM233

*It is difficult to keep it simple*

As Albert Einstein said, to make anything simple, it is necessary to understand it thoroughly.
Sometimes, in life, it becomes difficult to keep things simple because the mental entanglement is perceived as bigger than anything, but as we get wiser, we go beyond this entanglement and try to keep many things simple and live a simple life.

सुविचार २३३

*गोष्टीना सोपे ठेवणे कठीण आहे*

अल्बर्ट आईन्स्टाईन ने म्हटल्या प्रमाणे, कोणतीही गोष्ट सोपी करून सांगण्या करिता ती संपूर्ण रित्या समजणे गरजेचे आहे.
जिवनात ही अनेक गोष्टीना सोप्या स्वरूपात ठेवणे कधीकधी कठीण होऊन जाते, मानसिक गुंता मोठा वाटू लागतो, मात्र प्रगल्भता लाभल्यावर ह्याच गुंत्याच्या पलीकडे जावून आपण अनेक गोष्टीना सोप्या पद्धतीतच ठेवण्याचा आणि सोपे जीवन जगण्याचा प्रयत्न आपण करू लागतो.

Sunday 27 December 2020

It is easy to come up with new plans, but the game is all about implementation and continuity. Quote #TM232

Quote #TM232

*It is easy to come up with new plans, but the game is all about implementation and continuity.*

As the new year approaches, a lot of effort is put into planning to achieve the goals we want. Later, at the end of the next month, the plans are finally given up. The main reasons behind this are procrastination, laziness, lack of deep thought, chasing the temptations of the goal, not knowing our true skills, not feeling happiness during taking the action, etc. It is important to keep in mind that a new plan will work better if we improve on these qualities primarily so that the chances of continuity in the action will definitely increase.

*नवनवीन योजना बनवणे सोपे आहे, सगळं खेळ तर अंमलबजावणी आणि सातत्य टिकवण्याचा आहे.*

नविन वर्ष जवळ आले की आपल्याला हव्या असलेल्या गोष्ठी मिळवण्यासाठी योजना तयार करण्याचा प्रयत्न बऱ्याच प्रमाणात केला जातो. अन् पुढील महिना अखेर तो सोडूनही दिला जातो, या मागील महत्त्वाचे कारण म्हणजेच आपले अंतर्भूत गुण जसे, चालढकल करण्याचा स्वभाव, आळस, गोष्टींच्या खोलात जावून विचार न करणे, ध्येयाच्या प्रलोभनांच्या मागे धावणे, आपले खरे कौशल्य न ओळखणे, कार्यात प्रसन्नता नसणे अश्या अनेक गोष्टी आधीच लक्ष्यात घ्यायला हव्यात आणि त्यात सुधारणा करून नंतरच नवीन योजना बनवायला हवी त्यामुळे कार्यात सातत्य टिकुन राहण्याची शक्यता नक्कीच वाढेल.

Saturday 26 December 2020

Stability of mind in a challenging time is the greatest human trait. Quote #TM231

Quote #TM231

*Stability of mind in a challenging time is the greatest human trait*

Nowadays, there are very few tools and methods that can give the right direction to the mind.
In the ancient Indian culture, the first tendency was to achieve mental stability and accordingly traditions and culture were formed, later it became somewhat contaminated but the attempt to reach the mental stability and bring everyone to the stable mental state is the core of this culture. We need to think a little bit in this direction and use some of the tools and methods that are still available and try to strengthen our mental stability.

सुविचार २३१

*आव्हानात्मक वेळी मनाची स्थिरता हा मानवी स्वभावाचा महान गुण होय.*

पूर्वापार चालत आलेल्या भारतीय संस्कृतीत सर्वप्रथम मानसिक स्थिरता साधण्याकडे कल होता आणि त्यानुसारच परंपरांची आणि संस्कृतीची निर्मिती झाली, पुढे ती काही अंशी दूषितही झाली मात्र मानसिक स्थितीत गाठून स्थितप्रज्ञ अवस्थे कडे सर्वाना नेण्याचा प्रयत्न हाच या संस्कृतीचा गाभा. आपण हि थोडा या दिशेने विचार करायला हवा, आणि  इतिहास जमा होत असलेली काही उपलब्ध साधने आणि साधनांचा वापर करून आपले मानसिक स्थैर्य बळकट करण्याकरिता राहायला हवे.

Friday 25 December 2020

Morning is another opportunity to make yourself better. Quote #TM230

Quote #TM230

*Morning is another opportunity to make yourself better*

A new day is a new ray of hope, a new opportunity, a new enthusiasm.  Maybe you have been wanting to do something for many years, you can start today, without waiting for any special occasion, the moment when a wave of excitement rises in your mind should be considered the best moment to start. Today's morning time is also one of the best moments.
 
सुविचार २३०

*सकाळ म्हणजेच स्वतः ची प्रगती साधण्याची आणखीन एक संधी*

नविन दिवस म्हणजेच आशेचा नवीन किरण, नवीन संधी, नवं चैतन्य. कदाचित अनेक वर्षां पासून एखादी गोष्ट करायची राहून गेली असावी, आजच्या दिवशी सुरुवात करू शकता, कोणत्याही खास सुरुवातीची वाट ना पाहता, तुमच्या मनात ज्या क्षणी उत्साहाची लहर उठेल तोच सर्वोत्तम मुहूर्त समजावा. आणि आजच्या सकाळचा हा क्षण त्याच सर्वोत्तम क्षणांपैकी एक.

Thursday 24 December 2020

The opportunities and possibilities you get are in line with your potential. Quote #TM229

Quote #TM229

*The opportunities and possibilities you get are in line with your potential.*

It is easy to dream, set goals, plan, create excitement but it may be difficult to develop the ability to achieve it.  Because the path to capacity development is a difficult one, it is not just a matter of playing imagination horses, but of actually working and taking action. Therefore, priority and importance should be given to the capacity building.

सुविचार २२९

*आपल्याला मिळणाऱ्या संधी आणि शक्यता आपल्या क्षमतेशी समानूपातात असतात.*

स्वप्न पाहणे, धेय्य ठरवणे, नियोजन करणे, उत्साह निर्माण करणे सोपे आहे मात्र ते मिळवण्यासाठी क्षमतेचा विकास करणे कदाचित अवघड. कारण क्षमतेच्या विकासाचा मार्ग खडतर आहे त्या मार्गावर फक्त कल्पंनाचे अश्व धावते ठेवून चालत नाही त्यासाठी प्रत्यक्षात कार्य करावे लागते. म्हणूनच, प्राधान्य आणि महत्त्व क्षमतेचा विकास करण्या करिता दिले जावे.

Wednesday 23 December 2020

Compassion is strength. Quote #TM228

Quote #TM228

*Compassion is strength*

One can attain strength with the help of ability and focus, but to have a stream of compassion in the mind, one should have an all-inclusive heart, only a strong person can understand the meaning of compassion.
The confluence of strength and compassion is the divine virtue, the new generation should be made to cultivate such a personality. Because without compassion, power becomes destructive and peace in the inner and outer world will become impossible.

सुविचार २२८

*करुणा म्हणजे सामर्थ्य*

क्षमता आणि एकाग्रता यांच्या जोरावर कोणीही शक्ती प्राप्त करू शकतो, मात्र मनात करुणेचा झरा निर्माण होण्यासाठी केवळ सर्वसमावेशक ह्रदय असावे लागते आणि सामर्थ्यवान व्यक्ती च करुणेचा अर्थ समजू शकतो.
शक्ती आणि करुणेचा संगम म्हणजेच दैवी गुण, असे व्यक्तिमत्व संपन्न करण्याचा अठ्ठाहास नवीन पिढीने करावा.
कारण करुणे शिवाय अंतर्गत आणि बाह्य जगात शांती अशक्यच.

Tuesday 22 December 2020

The primary task is to keep your originality intact. Quote #TM227

Quote #TM227

*The primary task is to keep our originality intact.*

What does originality mean exactly?  It simply means not to establish any falsehood. Originality doesn't mean that staying undeveloped and as it is but maintaining the natural character of our lives in any situation.  It is necessary to make progress by uplifting ourselves as per the situation and time and make necessary personality change, but while doing so we should not hide our natural identity from ourselves and become a copy of the personality of others.  The original you should blossom.

सुविचार २२७

*आपली मौलिकता जपणे हे प्राथमिक कार्य समजावे*

खरं पण म्हणजे नेमक काय? तर अंतर्मनाला कोणत्याही खोट्या गोष्टीचा आधार न जोडणे. खरं पण जपणे म्हणजे अपरिपक्व अवस्थेत राहणे असे नव्हे तर कोणत्याही अवस्थेत, परिस्थितीत स्वतः च्या मनाला पटू शकणारे नैसर्गिक आचरण कायम ठेवण्याची योग्यता. काळानुरूप परिस्थितीशी समायोजन साधने  आणि स्वतः मध्ये बदल करत प्रगती करणे ही गरजच आहे, मात्र तसे करत असताना आपले नैसर्गिक स्वत्व स्वतः पासूनच लपवून इतरांच्या व्यक्तिमत्वाची प्रत आपण बनू नये. तुमच्यातील खरे तुम्ही बहरायला हवे.

Monday 21 December 2020

Quality of life depends on how long we can focus. Quote #TM226

Quote #TM226

*Quality of life depends on how long we can focus.*

Individuals with the ability to focus on something for more than 6-7 seconds are always at the forefront of life.  As the period of being able to focus increases, so will your ability to understand things.  Focused Intelligence is the key to a higher quality of life.

सुविचार २२६

*कितीवेळ लक्ष केंद्रित करू शकतो यावर जीवनाची गुणवत्ता ठरते.*

6-7 सेकंद पेक्षा जास्त वेळ एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकण्याची क्षमता असलेल्या व्यक्ती आयुष्यात नेहमीच अग्रेसर असतात. लक्ष्य केंद्रित करू शकण्याचा कालावधी जस जसा वाढत जाईल तशी गोष्टीना समजण्याची आपली क्षमता वाढत जावून प्रगल्भता येईल. प्रगल्भ बुद्धिमत्ता म्हणजेच गुणवत्तापूर्ण जीवनाची गुरुकिल्ली.

Sunday 20 December 2020

If the basis of what is known is wrong, it is a bigger problem than ignorance. Quote #TM225

Quote #TM225

*If the basis of what is known is wrong, it is a bigger problem than ignorance.*

Often ignorance is not the real problem, but the perception which most people have that they have full knowledge becomes the real problem.  Especially in the case of controversial issues like religion, political, economic developments, sensitive events, social and mental changes, etc.
Everyone should base their knowledge on these topics by analyzing the information they have.  And then they should participate in the social contribution.

सुविचार २२५

*ज्ञात गोष्टीचा आधार चुकीचा असल्यास ती अज्ञाना पेक्षा मोठी समस्या आहे.*

अनेकदा अज्ञान ही समस्या नसून बऱ्याच लोकांना पूर्ण ज्ञानी असल्याचा होणारा आभास हीच खरी समस्या बनून जाते. खासकरून विवादित विषयांच्या बाबतीत जसे धर्म, राजकीय, अर्थिक घडामोडी, संवेदनशील घटना, सामाजिक आणि मानसिक बदल इत्यादी.
प्रत्येकाने आपल्याकडील माहितीचे विश्लेषण करूनच ह्या विषयांमधील ज्ञानाचा आधार पक्का करायला हवा. आणि त्यानंतर सामाजिक योगदान द्यायला हवे.

Saturday 19 December 2020

Nothing in life is unimportant. Quote #TM224

Quote #TM224
*Nothing in life is unimportant*

There is nothing irrelevant or disorganized in this universe which is created and operated by the best creator nature.  It may not make sense to our logical intellect, but the alchemy of nature, which extends beyond material experience, is beyond our comprehension.  In this self-aware universe, the existence of every moment has meaning, so there is nothing in this universe that is insignificant.

सुविचार २२४
*जीवनात काहीही महत्वहीन नसते*

सर्वोत्कृष्ट रचनाकार निसर्गाद्वारे निर्मित आणि संचालित ह्या विश्वात असंबद्ध किंवा अव्यवस्थित असे काहीच नाही. कदाचित आपल्या तार्किक बुद्धिमत्तेला ते जाणवू शकत नसेल मात्र वैषयीक अनुभवा पेक्षा अधिक विस्तार असलेली निसर्गाची किमया आकलनाच्या कक्षे पलीकडील आहे. ह्या स्वयंसिद्ध विश्वात प्रत्येक क्षणाच्या अस्तित्वाला अर्थ आहे, म्हणुनच महत्त्वहिन असे काहीच नाही.

Friday 18 December 2020

One good mindset can overcome all external odd circumstances. Quote #TM223

Quote #TM223

*One good mindset can overcome all external odd circumstances*

Most people are wasting their time and life energy suffering imaginations that do not exist. No matter how difficult the situation in the external world may be, if our intellect is not working against us, then the mind can remain stable. If the ray of hope is kept in such a stable core of the mind, then it will be possible to overcome any of the dark external situations.

सुविचार २२३

*एक चांगली मनस्थिती सर्व बाह्य विषम परिस्थितीवर मात करू शकते*

बहुतेक लोक अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा त्रास मनात सहन करत वेळेचा आणि जीवन ऊर्जेचा अपव्यय करत असतात.
बाह्य जगतातील परिस्थिती कितीही बिकट असेल मात्र आपले मन आपल्याच विरोधात काम करत नसेल तर चित्त स्थिर राहू शकेल. मनाच्या स्थिर गाभाऱ्यात जर आशेचा एक ही किरण तेवत ठेवला तर नक्कीच अंधारमय बाह्य परिस्थितीवर मात करणे शक्य होईल.

Thursday 17 December 2020

If you aren't facing uncertainties, you aren't exploring new. Quote #TM222

Quote #TM222
*If you aren't facing uncertainties, you aren't exploring new.*

When setting foot in unfamiliar territory,
The uncertainty of the innumerable possibilities that came to mind is the preparation to take life in a new dimension.  It is easily possible to walk in an ordinary place with your eyes closed because there is nothing new in it. It is better to give it a try and explore a new aspect of life than to spend a whole life doing the same thing thousands of times.

सुविचार२२२

*आपणास अनिश्चिततेचा प्रश्न पडत नसल्यास आपण जीवनाचे नवीन स्तर अनुभव नाही आहात.*

अनोळखी ठिकाणी पाय ठेवताना
मनात होणारी असंख्य शक्यातांचि चलबिचल म्हणजेच आयुष्याला नवीन स्वरूपात घेवून जाण्याची तय्यारी. ठरलेल्या ठिकाणी डोळे बंद करून ही चालणे शक्य होते कारण त्यात काही नाविन्य नसते, हजारो वेळेस एकच गोष्ट करत संपूर्ण जीवन व्यतीत करण्यापेक्षा, जीवनाचे नवनवीन पैलू जगणे अधिक सरस.

Wednesday 16 December 2020

Surpass your limitations. Quote #TM221

Quote #TM221

*Surpass your limitations*

Sometimes our belief that we can't do something can be false, the only way to check it is to try to cross our mental limits.  The stronger the effort, the higher the chances.
And once this limit is exceeded, the fixed mindset will disappear and new possibilities will come into sight.

सुविचार २२१

*आपल्या मर्यादांच्या पलिकडे जावे*

कधीकधी आपण एखादी गोष्ट करू शकत नाही यावर असलेला आपला विश्वास खोटा ही असू शकतो, तो तपासण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच आपल्या मानसिक मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करून पाहणे. जितका प्रयत्न जोरदार तितकीच शक्यता जास्त.
आणि एकदा का ही मर्यादा ओलांडली, की चाकोरी बद्ध साचेबंद नाहीसा होईल आणि नविन शक्यता दृष्टिक्षेपात येतील.

A challenge that cannot change you is not a challenge at all. Quote #TM220

Quote #TM220

*A challenge that cannot change you is not a challenge at all.*

Challenges bring life to life, a person in whom the source of life energy begins to overflow, it becomes impossible for him to seat without accepting the challenges.  This attitude works to bring about positive change in oneself and society.

सुविचार २२०

*जे आव्हान तुम्हाला बदलवू शकत नसेल ते आव्हानच नाही.*

आयुष्याला जिवंतपणा आणण्याचे काम आव्हाने करतात, ज्या व्यक्तीमधील जीवन ऊर्जेचा झरा उस्फुर्तहोऊन वाहू लागतो, त्याला आव्हाने स्वीकारल्या शिवाय स्वस्थ राहणे अशक्य होऊ लागते. हीच वृत्ती स्वतः मध्ये आणि समाजा मध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम करते.

Tuesday 15 December 2020

Keep experimenting in life.Quote #TM219

Quote #TM219

*Keep experimenting in life*

It is always best to explore new possibilities to reach the desired destination instead of walking in any one direction.  The development of various aspects of life can only be achieved through such experiments.  But this is exactly what the man starts to forget and gets stuck in a routine habit.

Suvichar २१९

*जिवनात निरनिराळे प्रयोग करत राहावे*

कोणत्याही एकाच दिशेने मार्गक्रमण करीत न राहता इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी नवनवीन शक्यता पडताळून घेणे कधीही चांगलेच. जीवनाच्या विविध पैलूंचा विकास अश्या प्रयोगान द्वारेच होऊ शकतो. पण नेमका हेच माणूस विसरू लागतो आणि एक साचेबंद सवयींमध्ये अडकून पडतो.

Monday 14 December 2020

You are always free to take charge of your Destiny. Quote #TM218

Quote #TM218

*You are always free to take charge of your Destiny*

With the exception of a few rare things in our lives, we can control a lot of things, our life is 10% luck and 90% is our choice.  Only your choice should not be influenced by emotion, greed, overzealousness etc, but it should be made consciously.

सुविचार२१८
*आपण आपल्या नशिबाची नेमणूक करण्यास नेहमीच मोकळे आहात*

आपल्या जीवनातील काही तुरळक गोष्टी सोडल्या तर बऱ्याच गोष्टींवर आपण नियंत्रण आणू शकतो, आपले जीवन म्हणजेच 10% नशिब आणि 90% आपली निवड असे समीकरण म्हणायला हरकत नाही. फक्त आपली निवड ही भावभावना, लोभ,अतिउत्साह ह्यामुळे प्रभावित नसावी तर ती जाणीपूर्वक केलेली असावी.

Sunday 13 December 2020

Results are a consequence of multiple factors like hard work, Focus, efforts, etc. Quote #TM217

Quote #TM217
*Results are a consequence of multiple factors like hard work, Focus, efforts, etc.*

Everyone can see the sun shining in the sky, but he knows the flames of the huge explosion behind that glow. Person's success is due to his tireless efforrs, that's how he achieves great success, it is a combined result of many factors, hence it is said that success is not a one-night journey at all.

सुविचार २१७

*यश म्हणजे कठोर परिश्रम, फोकस, प्रयत्न इत्यादी एकाधिक घटकांचा परिणाम.*

आकाशातील सूर्य दुरून सर्वांना चमकताना दिसत असतो मात्र त्या चमकण्या मागे सुरू असलेला प्रचंड स्फोट विस्फोटाचा दाह त्याचा त्यालाच माहीत. दैदिप्यान यश संपादित करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अथक प्रयत्नांती आणि अनेकविध घटकांच्या एकत्रित परिणाम म्हणून ये यश साधले जाते, म्हणूनच म्हंटले जाते की, यश मिळवणे हा एका रात्रीचा खेळ मुळीच नसतो.

Saturday 12 December 2020

Turning within is the only way to transform your life. Quote #TM216

Quote #TM216
*Turning within is the only way to transform your life.*

Our entire life is a reflection of our own interpretation of everything arround us.
When we try to go beyond interpretation we touch the innermost dimention, and that's she the transformation begins


सुविचार २१६
*आपल्या जीवनात परिवर्तन करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे  अंतर्मुख होणे.*

 आपले संपूर्ण आयुष्य हे आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे आपण केलेल्या अक्लानाचे प्रतिबिंब असते.
जेव्हा आपण आकलनाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण सर्वात अंतर्गामी मितीला स्पर्श करतो आणि तिथेच आपल्यात परिवर्तनची सुरुवात होते.

Thursday 10 December 2020

Your thoughts affect your action and your actions affect your life. Quote #TM215

Quote #TM215

*Your thoughts affect your action and your actions affect your life.*

If we want to change the basic nature of life, we need to change our way of thinking.  We hold our abilities responsible for the successes or failures we have achieved but the original source of our abilities lies in the profoundness of thoughts. If thoughts are profound, it develops capacity and a capable person cannot settle without achieving the desired results

सुविचार २१५

*आपल्या विचारांमुळे आपले काम प्रभावित होते आणि आपल्या कामामुळे जीवनातील परिणाम.*

जीवनाचे मूळ स्वरूप बदलायचे असल्यास आपल्या विचारसरणीत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. आपण मिळवलेल्या यशाला किंवा अपयशासाठी आपण आपल्या क्षमताना जबाबदार धरतो मात्र क्षमतेचा मूळ स्त्रोत आपल्या वैचारिक प्रगल्भतेत दडलेला असतो. विचार प्रगल्भ तर मनुष्य क्षमतावान अन् सक्षम व्यक्ती इप्सित परिणाम साधल्या शिवाय राहू शकत नाही.

Wednesday 9 December 2020

The secret to excellence is to work as if your whole life depends on it. Quote #TM214

Quot#TM214

*The secret to excellence is to work as if your whole life depends on it.*

We need to look at how we can contribute to the work rather than what we will get out of it.  Instead of comparing any work to a reward, we should try to see if we have contributed to it to the best of our ability.  Our focus can be maintained 
on doing the best work only when we go beyond that reward and look at the work as an essential part of our lives.

सुविचार २१४

*उत्कृष्ठ कार्याचे रहस्य म्हणजे अश्या प्रकारे कार्य करणे जणू त्यावर तुमचे संपूर्ण जीवनच अवलंबून आहे.*

कोणत्याही कार्यातून आपल्याला काय मिळणार आहे ह्या पेक्षा आपण त्या कार्यात कसा हातभार लावू शकतो हे पाहणे गरजेचे आहे. कोणत्याही कार्याची त्याच्यातून मिळणाऱ्या मोबदल्याशी तुलना न करता,  आपण आपल्या क्षमतेनुसार त्यात हातभार लावला आहे काय हे पाहावे. आपले लक्ष सर्वोत्तम कार्य करण्याकडे तेव्हाच असू शकते जेव्हा आपण मोबदल्याच्या ही पलीकडे जावून आपल्या जीवनाचा आवश्यक भाग म्हणून त्या कार्याकडे पाहू लागतो.

Tuesday 8 December 2020

Wherever you don't blossom is not for you. Quote #TM213

Quote #TM213

 *Wherever you don't blossom is not for you*

Naturally, your mental, physical, and energy body gets attracted towards a nourishing environment. Sometimes we try to fit a few individuals or environments into the intellectual and logical framework by assuming it as a perfect one but after a while, the logical perception begins to weaken and its natural tendency begins to unfold and we find it difficult to cope up with it. So, try to live your life with whom you feel energetic. And spend time wherever you feel your life is nourishing.

सुविचार २१३
*जर तुम्ही एखाद्या गोष्टीच्या सहवासात बहरत नसाल तर ती तुमच्या साठी नाहीये.*

नैसर्गिक रित्या तुमच्या मानसिक, शारीरिक आणि ऊर्जा शरीराला पोषक वातावरणाची ओढ असते.
काही गोष्ठी आणि व्यक्ती आपण परिपूर्ण मानून बौद्धिक आणि तार्किक चौकटीत ओढून ताणून बसवण्याचा प्रयत्न करतो मात्र काही कालावधी नंतर तर्क ढिले पडू लागतात आणि नैसर्गिक अंतरंग उलगडून लागतात. म्हणूनच जिथे आणि ज्यांच्या सोबत आपल्याला आपले जीवन उर्जावान असल्याचे जाणवते तेथेच आपलं आयुष्य व्यतीत करण्याचा प्रयत्न करावा.

Monday 7 December 2020

Your mind is a treasure. Quote#TM212

Quote#TM212

*Your mind is a treasure.*

All experiences are created in our minds.
Not only the response to external events but also the meaning of external events is given by mind, therefore, the experience of our life comes from within us.  The treasure of innumerable experiences is established within you.  One should be aware of this before reacting to any external situation.

सुविचार २१२

*आपले अंतर्मन म्हणजे एक खजिनाच.*

सर्व सृष्टीचा अनुभव आपल्या मनामध्ये घटित होत असतो.
बाह्य घटनांना दिले जाणारे प्रतिसादच नव्हे तर बाह्य घटनांना अर्थ सुध्दा अंतर्मनातच दिले जातात, म्हणजेच काय, तर आपल्या जीवनाचा अनुभव हा आपल्या आतूनच येत असतो. असंख्य अनुभवांच्या निर्मितीचा खजाना तुमच्या मध्येच प्रस्थापित आहे. कोणत्याही बाह्य परिस्थितीला प्रतिक्रिया देण्या आधी याची जाणीव मनात राहुद्यावी.

Sunday 6 December 2020

If you want to transform yourself, recreate your routine.Quote #TM 211

Quote #TM 211
*If you want to transform yourself, recreate your routine.*

Your routine is the magic wand in your hand to shape your destiny.
Make sure, you are using this stick consciously, failure to do so will not develop your ability to convert.  So first of all you have to create your routine according to your goal and follow it.

सुविचार २११

स्वतः मध्ये परिवर्तन करावयाचे असल्यास आपली दिनचर्या पुनः निर्माण करा.

तुमची दिनचर्या म्हणजेच तुमचं नशिब घडवण्यासाठी तुमच्या हातात असलेली जादुई छडी.
ही छडी आपण जाणीवपूर्वक वापरतोय काय हे एकदा निश्चित करून घ्यावे. तसे होत नसल्यास आपली रुपांतरीत होण्याची क्षमता विकसित होणार नाही. म्हणूनच सर्वप्रथ आपली दिनचर्या आपल्या ध्येयानुसार निर्मित करून तिचे पालन करावे.

Saturday 5 December 2020

Always stay hungry to learn. Quote #TM210

Quote #TM210

*Always stay hungry to learn*

 The key to a progressive life is a burning desire to learn. People stop learning due to the fear of mistakes, but one must have the courage to make mistake and then try to correct it.  If you continue to be a student at every level of life, you will naturally stay motivated to learn things, because of which you will continue to progress in the inner and outer dimensions of your life.

सुविचार २१०

*शिकण्याची भूक सदैव कायम ठेवा*

प्रगतीशील जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे शिकण्याची तीव्र इच्छा.  चुकांच्या भीतीमुळे लोक शिकणे थांबवतात, परंतु आपल्यात चूक करण्याचे धैर्य असणे आवश्यक आहे आणि नंतर त्यास दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  आपण आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर विद्यार्थी बनून राहिल्यास, आपण नैसर्गिकरित्या गोष्टी शिकण्यास प्रवृत्त रहाल, ज्यामुळे आपण आपल्या जीवनातील अंतर्गत आणि बाह्य स्तरावर प्रगती करत रहाल.

Friday 4 December 2020

Realizing potential is harder than developing capacity. Quote #TM209

Quote #TM209

*Realizing potential is harder than developing capacity*

We draw an invisible boundary and limit ourselves to it.  But the flow of human life is never towards stability, progress and dynamism are integral aspects of our lives.  Therefore, to recognize our abilities, we should throw ourselves in all possible directions, then after finding a definite path, we should try to reach a far distance and make progress in that direction.

सुविचार २०९

*क्षमतेची जाणिव होणे क्षमतेचा विकास करण्यापेक्षा अवघड आहे*
एक अदृश्य सीमा आपण आखून घेतो आणि स्वतः ला त्यात सीमित करून घेतो. परंतु मानवी जीवनाचा ओघ कधीही स्थिरावण्या कडे नसतोच, प्रगतिशीलता आणि गतिमानता आपल्या जीवनाचे अविभाज्य पैलू आहेत. म्हणूनच आपल्या क्षमतांना ओळखण्यासाठी स्वतः ला सर्व दिशांनी झोकून द्यावे मग निश्चीत मार्ग सापडल्या नंतर त्या मार्गाने प्रगतीच्या सुदूर दिशा गाठण्याचा प्रयत्न करावा.

Thursday 3 December 2020

Naturally we are calm and stable. Quote #TM208

Quite #TM208
*Naturally we are calm and stable.*

We experience instability in our world which is unknowingly constructed by us. Our mental perception is a reflection of the response we give to the outside world, it can be different from person to person, which means it is temporary but it feels permanent. Our wakefulness can take the mind beyond this play to its naturally stable state.  Your mental wave should not be your identity, you should try to go deep into your mind to experience your natural stability

सुविचार २०८
*नैसर्गिकरित्या आपण शांत आणि स्थिर असतो.*

अनभिज्ञरीत्या रचलेल्या मानसिक भाव विश्वात आपण चढ उतार अनुभवतो, हे मानसिक अंतरंग म्हणजे आपण बाह्य जगताला दिलेल्या प्रतिसादाचे प्रतिबिंबच होय. व्यक्ती परत्वे ते भिन्न असू शकतात म्हणजेच ते तकलादू असतात, वास्तवाशी त्याचा जोडलेला अर्थ म्हणजे एक मानसिक खेळ, मात्र अगदी खरा वाटणारा, जणू मनाच्या पृष्भागावर उमटणारे मानसिक तरंग. या खेळाच्या ही पलीकडे असणारे आपले बाह्य संस्करण रहित चित्त निसर्गतःच स्थिर आहे. आपले मानसिक तरंग आपली ओळख मानून बसू नये, आपल्या नैसर्गिक रीत्या स्थिर आणि स्तब्ध असलेल्या चित्ताचा अनुभव घेण्यासाठी मनाच्या खोलवर जाण्याचा प्रयत्न करावा

Wednesday 2 December 2020

You are living an amazing life If you are in the habit of making self-commitment, pushing yourself, and fulfilling the commitment. Quote TM#207

Quote TM#207

*You are living an amazing life If you are in the habit of making self-commitment, pushing yourself, and fulfilling the commitment.*

Self-commitment is a beautiful flower that grows in our life. How do we cultivate it will determine how better it will bloom and spread its aroma.  If you take care of this flower, its fragrance will linger for the rest of your life and you will be able to achieve fulfillment at every moment of your life.

सुविचार २०७

*जर आपण स्वत:ला वचनबद्ध करून प्रेरित करून वचनपूर्ती करण्याची सवय लावलेली असेल तर आपण एक सर्वोत्कृष्ट जीवन जगत आहात.*

वचनबध्दता जीवनातील एक सुंदर फुल आहे, तुम्ही त्या साठी केलेल्या मशागतीवर अवलंबून आहे की ते किती फुलणार आहे आणि त्याचा सुगंध कसा दरवळत राहणार आहे. या फुलाची काळजी घेतल्यास आयुष्यभर त्याचा सुवास दरवळत राहील आणि जीवनात क्षणोक्षणी परिपूर्तीचा आनंद आपण घेवू शकाल.

Tuesday 1 December 2020

Degree of awareness determines your place in life. Quote #TM206

Quote #TM206

*Degree of awareness determines your place in life*

Awareness is not just about knowing your strengths and weaknesses, but understanding the reality of your being.  It is this awareness that develops your abilities and it is this awareness that makes your work more and more participatory and takes you to the next level.

सुविचार २०६

*जागरूकतेची श्रेणी जीवनात आपले स्थान निर्धारित करते*

जाणीव म्हणजे फक्त आपले सामर्थ्य आणि दुर्बलता याविषयी ज्ञान असणे नव्हे तर आपल्या असण्याचे वास्तव समजणे. हीच जाणीव आपल्या इतर क्षमंताना विकसित करते आणि ह्याच जाणिवेमुळे आपले कार्य अधिकाधिक सहभाग युक्त होऊन ते आपल्याला पुढील स्तरावर घेऊन जाते.

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...