Wednesday, 31 March 2021

Only when a person wants to be limitless can he realize his true potential .Quote#TM325


Quote#TM325

*Only when a person wants to be limitless can he realize his true potential*.

Drawing conclusions about your abilities means to stand on the last rock beyond which no possibility exists.  Belief-conclusion determines the boundary line of one's ability.  But once we become fully aware of our potential, a vast field of opportunity opens up which allows us to run on the path of true limitlessness and show the courage to leap beyond the rocks of belief, because the awareness of ability is the awareness of having wings.

सुविचार ३२५

*जेव्हा एखादी व्यक्ती अमर्याद होऊ इच्छिते तेव्हाच तिला तिची खरी क्षमता जाणवु शकते*.

स्वतः च्या क्षमते विषयी निष्कर्ष काढणे म्हणजे शेवटच्या खडकावर उभे राहणे ज्याच्या पलीकडे कोणतीही शक्यता अस्तित्वात नाही.  विश्वास-निष्कर्ष एखाद्याच्या क्षमतेची सीमा रेखा निश्चित करते. परंतु एकदाका आपल्या क्षमतेबद्दल स्पष्ट जाणीव झाली की संधींचे एक मोठे क्षेत्र खुले होते ज्यामुळे आपण खऱ्या अर्थाने अमर्याद होण्याच्या मार्गावर धावू लागतो अन् विश्वासाच्या खड्का पलीकडे झेप घेऊन उंच उडण्याचे धैर्य दाखवतो कारण क्षमतेची जाणीव म्हणजेच पंख असल्याची जाणीव होय.

Tuesday, 30 March 2021

If anything is meaningful to you, you should go for it, no matter how difficult it is. Quote #TM324

Quote #TM324

*If anything is meaningful to you, you should go for it, no matter how difficult it is.*

Often the meaningful things are just difficult ones. But if you know its value then you should continue to work on it without leaving it for anyone else's efforts. Perhaps you are the only one who has realized the true value of that thing.

सुविचार ३२४

*अर्थपुर्ण असलेली गोष्ट कितीही अवघड असली तरी ती करायला हवी.*

बऱ्याचदा आपल्यासाठी अर्थपुर्ण असलेली गोष्ट तितकीच अवघड ही असते. मात्र जर त्या अर्थाचे मूल्य आपण जाणत असल्यास, त्या गोष्टीची पूर्तता इतर कुणीतरी करावी अशी आशा न बाळगता आपणच निश्चय करून त्यासाठी प्रयत्न चालू ठेवावा. कारण कदाचित त्या अर्थाचं मूल्य फक्त तुम्हालाच तुमच्या योग्यते मुळे उमगले असावे.

Monday, 29 March 2021

Some opportunities come easily, some in exchange for failures. Quote #TM323

Quote #TM323

*Some opportunities come easily, some in exchange for failures*

Every failure leads to new teachings that offer new learning and create new opportunities.  We have to prepare ourselves for every opportunity that comes our way.

सुविचार ३२३

*काही संधी सहज मिळतात तर काही अपयशाच्या बदल्यात*

प्रत्येक अपयश नविन शिकवणं देवून जाते ज्यातून शिकण्याची आणि घडण्याची नवीन संधी निर्माण होते. आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक संधी साठी आपण स्वतः ला तयार करायला हवं.

Sunday, 28 March 2021

The sure a consequence of dissolving ourselves with existence is stable mind. Quote #TM322

Quote #TM322

*The sure a consequence of dissolving ourselves with existence is stable mind*

If your mind is stable by choice, and a calm mind is your identity, then you are one of the billions.
A stable attitude is a kind of miracle, and to some extent, it develops from the surrender of the negative dominant feeling in us.  That is, where one sees oneself as a part of the surrounding creation without considering oneself to be supreme, the mind automatically all at the place and achieve stability

सुविचार ३२२

*जिथे स्वतः ला अस्तित्वाशी एकरुप केले जाते, तेथे परिणामी स्थीर चित्त निर्माण होते.*

मानसिक स्थिरता जर तुमची स्वतः ची निवड असेल आणि शांत चित्त तुमची ओळख असेल तर नक्कीच तुम्ही अब्जावधी लोकांमध्ये एक आहात.
स्थिर चित्त वृत्ती म्हणजे एक प्रकारचा चमत्कारच असून काही अंशी आपल्यातील नकारात्मक वर्चस्व भावनेच्या समर्पणातून ही वृत्ति विकसीत होते. म्हणजेच जिथे स्वतः ला सर्वोच्च न मानता सभोवतालच्या सृष्टीचा एक भाग म्हणून पाहिले जाते, तेथे परिणामी स्थीर चित्त वृत्ती निर्माण होते.

Saturday, 27 March 2021

Observation is an art that is closely linked to success. Quote #TM321

Quote #TM321

*Observation is an art that is closely linked to success.*

Focusing on something just for a few seconds reveals many aspects that have never been seen before.  Observations made with an unbiased attitude uncovers answers from the impossible ground. But adopting the art of absolute observation is not so easy, it requires developing a sight that has zero-assumptions.

सुविचार ३२१

*निरीक्षण एक कला असून यशाशी तिचा जवळचा संबंध आहे.*

कोणत्याही गोष्टीवर फक्त काही सेकंद ध्यान केंद्रित करून पाहिल्यास कधीही न दिसलेले अनेक पैलू समोर येतात. निरपेक्ष वृत्तीने केलेले निरिक्षण कोणत्याही प्रश्नावर उत्तर सापडणे अशक्य नाही. मात्र निरपेक्ष निरीक्षणाची कला अंगीकारणे तितकेसे सोपे नसून त्यासाठी गृहितक विरहित शून्य नजर विकसित करणे गरजेचे आहे.

Thursday, 25 March 2021

There is no shortage of new ideas, but there should be a strong desire to implement them. Quote #TM320

Quote #TM320

*There is no shortage of new Ideas, but there should be a strong desire to implement them.*

Ideas that can transform the whole world come in many minds. Many give a deep thought on how to make those concepts a reality, but they remain in the core of the head as it is. However, the world continues as it is.
It takes the intense desire to get the concept out of our heads and make it a reality.

सुविचार ३२०

*नवनवीन संकल्पनांची कमी नाहीये मात्र त्या अंमलात आण्यासाठी लागणारी तीव्र इच्छा हवी.*

सम्पूर्ण जगाचा कायापालट करू शकणाऱ्या कल्पना कित्येकांच्या डोक्यात साकारल्या जातात. त्या संकल्पनांना प्रत्यक्षात कसे आणावे यावर अनेकदा मग्न होउन विचार ही केला जातो मात्र, त्या तश्याच डोक्याच्या गाभाऱ्यात पडून राहतात. प्रत्यक्षात मात्र जग आहे तसेच चालू राहते. कारण संकल्पनेला डोक्यातून बाहेर काढून प्रत्यक्षात उतरवण्या साठी साथ हवी ती तीव्र इच्छेची.

Wednesday, 24 March 2021

Self-discipline is impossible without purpose. Quote #TM319

Quote #TM319

*Self-discipline is impossible without purpose.*

Many want to get up early in the morning and do many things that are considered a form of self-discipline. To fulfill that, firm determinations are made but after a few days, everything gets again as usual.
The main reason for this is imparting discipline from the outside without an inspiring purpose is difficult. But the self-discipline emerges from within and lasts for a long time when it comes to achieving the purpose of life.

सुविचार ३१९

*उद्देश्या शिवाय आत्मशिस्त अशक्य.*

अनेकांना पहाटे लवकर उठायचे असते आणि अशी अनेक कामे करायची असतात जी आत्मशिस्तीच्या प्रकारात गणली जातात. कठोर निश्चय ही केला जातो मात्र काही दिवसांनी पुन्हा नेहमी सारखच सगळ सुरू होत.
याच मुख्य कारण म्हणजे ठळक उद्येशा शिवाय शिस्त बाहेरून लादली गेल्यास पडणारा फरक तकलादू असतो, मात्र जिवनाचा उद्देश गाठण्यासाठी निर्माण झालेली अत्मशिस्त आतून निर्माण होत असल्याने ती दीर्घकाळ टिकते.

Tuesday, 23 March 2021

A complete transformation is possible only if one dares to go for it. Quote #318

Quote #318

*A complete transformation is possible only if one dares to go for it.*

Courage is the only option for those who want to take the next step in life and change the existing situation because change cannot be achieved by desire alone, it is an act of determination to change what is established, desire is not enough.

सुविचार ३१८

*एखाद्यामध्ये धैर्य असेल तरच संपूर्ण परिवर्तन शक्य आहे.*

ज्यांना आयुष्यात पुढील पायरीवर जाण्याची इच्छा आहे आणि विद्यमान परिस्थितीत परिवर्तन करायचे आहे त्यांच्यासाठी धैर्य हाच एकमेव पर्याय आहे, कारण फक्त इच्छेने परिवर्तन होणे शक्य नाही, प्रस्थापित गोष्टीना बदलणे हे जिद्दीचे काम आहे. त्यासाठी इच्छेचे पुरेशी नाही.

Monday, 22 March 2021

The number of assumed thoughts should be minimum. Quote #TM317

Quote #TM317

*The number of assumed thoughts should be minimum.*

We often unknowingly assume many things and form our opinion based on such assumptions.
A large section of society is interested in drawing conclusions based on assumptions as it is easier to assume things according to their convenience than to find hidden reasons behind relationships, political, social events.
Because assumptions are not based on information, the emphasis should be on knowing. One should not trust assumed thoughts when forming an opinion.

सुविचार ३१७

*गृहीत धरलेल्या विचारांची संख्या कमीतकमी करावी.*

आपण अनेकदा नकळतच कित्येक गोष्टी गृहीत धरत असतो आणि त्यावर आपले मत बनवत असतो.
कौटुंबीक, राजकीय, सामाजिक घटनांमध्ये दडलेली कारणे शोधण्यापेक्षा आपल्या सोयी नुसार गोष्ठी गृहीत धरणे सोपे असल्याने समाजातील मोठा वर्ग गृहितकांच्या आधारे निष्कर्ष काढण्यात स्वारस्य दाखवतो.
गृहितकांना माहितीचा आधार नसल्या कारणाने मत तयार करताना त्यांवर विश्वास न ठेवता जाणून घेण्यावर भर द्यावा.

Sunday, 21 March 2021

You are separate from your feelings. Quote #TM316

Quote #TM316

*You are separate from your feelings*

Our own emotions play the biggest game with us, they take us away from the existential reality and create a seemingly real world, it's hard to imagine the existence of emotions different from ourselves because we have been conditioned to attach to it since birth, in fact, many of us consider that they are their emotions.  But don't take emotions too seriously, emotions are the magic of nature, which keep on changing according to the situation, emotions exist to support our survival on the earth, they are deceptive, only your existence is true.

सुविचार३१६

*तुमच्या भावना आणि तुम्ही यामध्ये अंतर आहे.*

सर्वात मोठा खेळ आपल्या स्वतःच्या भावना खेळत असतात, त्या आपल्याला अतित्वापेक्षा दूर घेऊन जातात आणि अगदी खरे वाटणारे भासमान विश्व तयार करतात, जन्मा पासूनच आपल्याशी जोडलेल्या असल्या कारणाने भावनांचे अस्तित्व आपल्यापेक्षा वेगळे असल्याची कल्पनाच महा कठीण. किंबहुना आपल्या भावना म्हणजेच आपण असे अनेकांना वाटते. मात्र परिस्थितीनुसार बदलणाऱ्या ह्या निसर्गाच्या जादुगिरी असलेल्या भाव भावना म्हणजेच तुमचे पृथ्वीवरील अस्तित्व टिकून राहण्यासाठी केलेली उपाययोजनाच आहे याचे भान ठेवून भावनांच्या आहारी जाऊ नये, त्या फसव्या आहेत फक्त तुमचे अस्तित्व खरे आहे.

Saturday, 20 March 2021

Your imagination unknowingly affects your life to a great extent.Quote #TM315

Quote #TM315

*Your imagination unknowingly affects your life to a great extent.*

All the time when we are not doing an activity, we are experiencing different dimensions of imagination, like fear, worry, daydreaming, etc. Thinking of the activity which is not happening or doesn't exist in the 'now' moment, is our imagination. Sometimes it is positive, sometimes negative, sometimes it is about the future, sometimes about the past. Unknowingly we spend a lot of time imagining things. This visualization affects the shaping of your personality in the long run, so there should be a tendency to know without relying on any form of imagination, or the nature of the imagination should be constructive.

सुविचार ३१५

*आपल्या कल्पना नकळतच आपल्या जीवनाला मोठ्या प्रमाणात प्रभावित करतात*.

ज्या क्षणी आपण प्रत्यक्षात कार्य करत नसतो अश्या सर्व वेळेस आपण कल्पनेच्या वेगवेगळ्या मितींचा अनुभव घेत असतो, जसे भीती, चिंता, दिवा स्वप्ने इत्यादी. ज्या गोष्ट प्रत्यक्षात आत्ताच्या क्षणात घटित होत नाहीये त्यांचा विचार म्हणजे आपली कल्पनाच. कधी कधी ती सकारात्मक असते तर कधी नकारात्मक, कधी भविष्या विषयी तर कधी भूतकाळातील. नकळत आपण फार मोठा वेळ ह्या कल्पनांमध्येच घालवतो. हे कल्पनेचे चित्रीकरण आपल्या व्यक्तिमत्वाला आकार दिल्याशिवाय राहत नाहीत, म्हणूनच कल्पनेच्या कोणत्याही प्रकारावर अवलंबून न राहता प्रत्यक्षात जाणून घेण्याकडे कल असावा, अथवा कल्पांचे स्वरूप विधायक असावे.

Friday, 19 March 2021

You can't do great things if you don't love what you're doing.Quote #TM314

Quote #TM314

 *You can't do great things if you don't love what you're doing*

Doing something for the rest of your life that you are not interested in is an injustice in itself.
On the other hand, if you do what you love, life will be a pleasant journey.
And that's the decent thing to do. No matter how small the task, if you do it with devotion, that small task automatically becomes great.
And to get involved oneself in any task, one has to be interested or develop an interest in it, Only then can we be counted as the sculptors of great work.

सुविचार ३१४

*तुम्ही जे काही करत असाल त्यावर जर तुमचे प्रेम नसेल तर तुम्ही महान गोष्ठी करू शकत नाहीं*

ज्या गोष्टीत रस नाही अशी गोष्ट आयुष्यभर करणे म्हणजे स्वतः वरील अन्यायच म्हणावा लागेल.
याउलट जर तुम्हाला प्रिय असलेली गोष्ट तुम्ही करत असाल तर आयुष्य म्हणजे सुखद प्रवास वाटू लागेल.
महान काम करायचं हेच गमक आहे. कोणत्याही कामात अगदी कितीही लहान असेल तरीही जर आपण भक्तिभावाने ते केले तर आपोआपच ते लहानसे कार्य महान बनून जाते.
आणि स्वतःला एखाद्या कार्यात असे वाहून घेण्या साठी मुळात रस असणे अथवा निर्माण होणे गरजेचे आहे. तरच आपण एका महान कार्याचे शिल्पकार म्हणुन गणले जावू शकतो.

Thursday, 18 March 2021

We should think about how much we can give as much as we think about how much we can take. Quote #TM313

Quote #TM313

 *We should think about how much we can give as much as we think about how much we can take*.

Human expectations are never-ending, it is difficult to get the expectations down, whether you are expecting from others or yourself. Human relationships are examples of such limitless expectations.
If the ratio of receiving is the same as the amount of unexpected giving, the balance will be more likely to be achieved.


सुविचार ३१३

*आपण किती देवू शकतो याचाही विचार तितकाच व्हायला हवा जितका आपण किती घेवू शकतो याचा विचार करतो*.

मानवी अपेक्षा कधीही न संपणाऱ्या आहेत. मग त्या इतरांकडून असो किंवा स्वतः कडून त्यांचा तळ लागणे अवघड. नाते संबंध आणि व्यावसायिक व्यवहारात याची जाणीव प्रकर्षाने होते. घेण्याचं आणि अपेक्षांचे प्रमाण हे आणि अनपेक्षित रित्या देण्याच्या प्रमाण इतकाच असेल तर समतोल साधला जाण्याची शक्यता अधिक असेल.

Wednesday, 17 March 2021

Take care of the thought process, your thoughts are reflected in everything you do. Quote #TM312

Quote #TM312

*Take care of the thought process, your thoughts are reflected in everything you do.*

The thought process is a crucial part. Our way of thinking affects all areas of our lives. If the thought process is negative due to negative experiences, then every event will reflect negative side in our mind, and if such negative patterns are formed in the mind, then positive thoughts can be omitted from these negative filters every time. That is why we should consciously look at the fabric that is being woven into the core of our mind.

सुविचार ३१२

*वैचारिक प्रक्रियेची काळजी घ्या आपले विचार आपल्या प्रत्येक गोष्टीतून प्रतिबिंबित होतात.*

विचार प्रक्रिया हा अतिशय महत्व पूर्ण भाग असून आपल्या जीवनातील सगळ्याच भागांना आपली विचार पद्धती प्रभावित करते. जर नकारत्मक अनुभवांमुळे वैचारिक चौकट जर नकारात्मक झाली असेल तर प्रत्येक प्रसंगाचे प्रतिबिंब नकारात्मकच दिसू लागते, आणि मनात जर नकारत्मक पॅटर्न बनले असतील तर त्यातून सकारात्मक विचार गाळला जाऊ शकतो. म्ह्णूनच आपल्या मनाच्या गाभाऱ्यात कोणते जाळे विणले जात आहे हे जाणीवपूर्वक पाहावे.

Tuesday, 16 March 2021

You don’t always need a plan, if you learn to change the direction of sails, the wind will take you to the right place. Quote #TM311

Quote #TM311

*You don’t always need a plan, if you learn to change the direction of sails, the wind will take you to the right place.*

Sometimes we observe that a plan implemented after following a complicated logical process does not lead to much success, but an easily surfaced idea takes us to the pinnacle of success if combined with effort. There is something in this universe that cannot be seen by the logical eye but is constantly trying to keep you in the right place. We often resist this natural flow because it doesn't fit into a logical frame. The cosmic flow is already working to take us to where we want to be, we only need to adjust ourselves and be in the right state.

सुविचार ३११

*आपल्याला नेहमीच योजनेची आवश्यकता नसते, जर आपण शीडाची दिशा बदलणे शिकले असेल तर वारा आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाईल.*

कधी कधी आपण पाहतो कि क्लिष्ठ तार्किक प्रक्रिये नंतर तयार केलेली योजना तितकेसे यश मिळवून देत नाही, मात्र सहजच सुचलेली कल्पना प्रयात्नांची जोड दिल्यास यशाच्या शिखरावर घेऊन जाते. या विश्वात काहीतरी असे आहे जे तार्किक डोळ्यांना दिसू शकत नाही मात्र सतत आपल्याला प्रवाहात ठेवून योग्य त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करीत असते, अन आपण बऱ्याचदा तार्किक बुद्धीला ना पटल्यामुळे विरोध हि करीत असतो मात्र, अनेक अनुभवांती आपणास याची जाणीव मात्र नक्कीच होईल कि आपल्याला फक्त स्वतःला योग्य स्थितीत आणायचे आहे, बाकी वैश्र्विक प्रवाह आपल्याला इच्छित स्थळी घेऊन जाण्यास सक्रिय आहे.

Monday, 15 March 2021

One best thing to think upon every morning is what big changes can we make in the next 24 hours? Quote #TM310

Quote #TM310

One best thing to think upon every morning is what big changes can we make in the next 24 hours?

The quality of life is determined by how much time we spend on the things that are important in life in 24 hours. If you spend a lot of time in the midst of negative imagination, negative thoughts and feelings, then of course a very large part of your life is going to waste. When planning for the next 24 hours, you should resolve to spend as much time as possible doing important and effective tasks.

रोज सकाळी विचार करण्या सारखा मुद्दा म्हणजे पुढील २४ तासांत आपण आयुष्यात कोणते मोठे बदल घडवू शकतो?

२४ तासांत किती वेळ आपण आयुष्यात महत्वपूर्ण असलेल्या गोष्टींवर खर्च करतो यातून आयुष्याची गुणवत्ता आपण निर्धारित करत असतो. जर नकारत्मक कल्पना, नकारत्मक विचार आणि भावना यांच्या मध्ये जर बव्हतांशी वेळ जात असेल तर नक्कीच तुमच्या जीवनातील फार मोठा भाग व्यर्थ जात आहे. पुढील २४ तासांचे नियोजन करताना अधिकाधिक वेळ महत्वपूर्ण आणि प्रभावी कामे करण्यासाठी व्यतीत करण्याचा संकल्प आपण करायला हवा.

Sunday, 14 March 2021

Uncertainty and challenges make the goals more glorious. Quote #TM309

Quote #TM309

*Uncertainty and challenges make the goals more glorious*

By swimming in the direction of the stream, how can one celebrate the joy of swimming against the current?
If you face minimal difficulties and challenges in the way of fulfilling your dream, then you are not lucky.  You will not be able to enjoy the infinite joy of fulfillment.  The level of happiness and contentment is heightened by difficulties and challenges, so why settle satisfaction at the low level?

सुविचार ३०९

*अनिश्चितता आणि आव्हाने लक्ष्याला अधिक तेजस्वी बनवतात*

प्रवाहा विरूध्द पोहून किनारा गाठल्याचा आनंद प्रवाहा सोबत पोहून कसा मिळणार?
जर तुमच्या स्वप्नपूर्तीचा मार्गात कमीत कमी अडचणी आणि आवाहने असतील तर तुम्ही सुदैवी नाहीत. तुम्ही कर्मपूर्तीचा असीम आनंद उपभोगू शकणार नाहीत. आनंद आणि समाधानाचा स्थर अडचणी आणि आवाहनेच वाढवतात. मग कमीत कमी स्थरावर समाधान का मानावे?

Saturday, 13 March 2021

Find out the reasons behind the consequences and work on those reasons. Quote #TM308

Quote #TM308

*Find out the reasons behind the consequences and work on those reasons*

Whether the result is positive or negative, its root cause will be some reason. Sometimes it is easy to find the cause but sometimes it is difficult. Finding the causes of negative consequences, in particular, is difficult because negative emotions spread irrationally on the mind, making it difficult to see clearly. In such cases, seek the help of others. But more energy should be spent on finding the causes and controlling them than controlling the consequences.

सुविचार ३०८

*परिणामांच्या पाठी लपलेल्या कारणांचा शोध घ्या आणि त्या कारणांवर काम करा*

परिणाम सकारात्मक असो किंवा नकारात्मक त्याचा मूळ उगम कोणत्यातरी कारणात सापडतो. कधीकधी कारण सापडणे सोपे असते तर कधी अवघड. खास करून नकारात्मक परिणामांची कारणे शोधणे क्लिष्ट होते कारण नकारात्मक भावना मनावर विवेकविरहित आवरण पसरतात त्यातून स्पष्ट पाहणे अवघड होऊन बसते. अश्या वेळी इतरांची मदत घ्यावी. मात्र परिणामांना नियंत्रीत करण्यापेक्षा जास्त ऊर्जा कारणे शोधून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी खर्च करावी.

Friday, 12 March 2021

There is more to be grateful for, than just being sad. #TM307

Quote #TM307

*There is more to be grateful for, than just being sad

The oxygen that you breathe every few seconds today has been released into the atmosphere by millions of living cellular bacterium who lived only for a day, and a handful of meal in your diet is made up of millions of living cells which gave its life to you.  We carelessly ignore hundreds of such things and grieve over some unfulfilled desires?  The realization that your head, which can think, is the only unique creation in this infinite black space, should gives us infinite joy.

सुविचार ३०७

*आयुष्यात कृतज्ञ राहण्यासाठी पुष्कळ गोष्टी आहेत दुःखी राहण्या पेक्षा.*

काही सेकंदाने जो श्वास तुम्ही आज घेता त्यातला प्राणवायू एक दिवस जगणाऱ्या एक पेशिय जिवाणू ने वातावरणात लाखो वर्षांपूर्वी पासूनच तुमच्या साठी सोडलेला आहे, तसेच तुमचा जेवणाचा प्रत्येक घास सजीव पेशींनी आपले जीवन देवून तयार केलेला आहे. अश्या शेकडो गोष्टीना आपण बेफिकिरीने दुर्लक्षित करतो आणि कुठली शी इच्छा अपूर्ण आहे म्हणून दुखः करत बसतो? निसर्गाच्या लाखो वर्षांच्या उत्तम करागिरीचा नमुना म्हणजे विचार करू शकणारे तुमचे डोके ही ह्या अथांग काळ्याकुट्ट अवकाशात एकमेवअद्वितीय निर्मिति आहे याची जाणीवच असीम आनंद देवून जाते.

Thursday, 11 March 2021

Fear can be overcome by action, not just by thinking. Quote #TM306

Quote #TM306

*Fear can be overcome by action, not just by thinking.*

Fear is a non-existent negative event of the future. The solution to fear is the realization of the appropriate action. There is no way to free from fear other than action, to face fear by direct action is an intelligent choice.

सुविचार ३०६

*भीतीवर मात कृतीतून करतायेते, फक्त भीतीचा विचार करून नाही.*

भीती म्हणजेच भविष्यातील अस्तित्वहीन नकारात्मक घटना.
योग्य कृती करण्याची उकल होणे म्हणजेच भीतीतून मुक्तता. कृती पेक्षा कोणताही मार्ग भीतीतून मुक्त करू शकत नाही, प्रत्यक्ष कृतीद्वारे भीतीचा सामना करणे म्हणजेच बुद्धिमानीपूर्ण निर्णय.

Wednesday, 10 March 2021

Intense desire and determination overcome the talent. Quote #TM305

Quote #TM305
*Intense desire and determination overcome the talent*

Talent is the set of qualities obtained, it takes intense will and hard work to maintain the quality of talent.
 Otherwise, there are many examples of talent being pushed back by the strength of perseverance and strong will.
 Basically, these two qualities also play an important role in building talent.  So talented people should not give up these two qualities even if they are tallented.

सुविचार ३०५

*तीव्र इच्छा आणि दृढनिश्चय प्रतिभेवर मात करते*

प्रतिभा म्हणजे प्राप्त गुणांचा संच, प्रतिभेची योग्य ती गुणवत्ता टिकवण्यासाठी तीव्र इच्छा आणि मेहनत हवीच.
अन्यथा सातत्य आणि तीव्र इच्छेच्या जोरावर प्रतिभा मागे टाकल्या गेल्याची अनेक उदाहरणे पाहता येतात.
मुळात प्रतिभेची उभारणी होण्यासाठीही या दोन गुणांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे प्रतिभावान लोकांनी प्रतिभा असल्या कारणाने या दोन्ही गुणांची साथ सोडू नये.

Tuesday, 9 March 2021

The effects of internal reality are greater than real and external reality. Quote #TM304

Quote #TM304

*The effects of internal reality are greater than real and external reality*

Internal reality means our own mental state, anxiety, imagination, conflict of thoughts, etc. All of these are created by ourselves.
We feel most anxious in this illusionary world but often the external situation is not as bad as we think.  That is why we should control our jumping horses from running over unrealistic grounds.

सुविचार ३०४

*अंतर्गत वास्तवाचे परीणाम खऱ्या आणि बाह्य वास्तव पेक्षा जास्त असतात*

अंतर्गत वास्तव म्हणजे आपण स्वतः निर्मिति केलेली आपली मानसीक अवस्था, चिंता, कल्पना, वैचारिक द्वंद्व इत्यादि.
ह्या खऱ्या खुर्या वाटणाऱ्या भासमान जगात आपण सर्वात जास्त चिंताग्रस्त असतो. अन् बऱ्याचदा प्रत्यक्षात परिस्थिती आपल्या कल्पेन इतकी बिकट नसते. म्हणुनच अवास्तव धर्तीवर धावणाऱ्या आपल्या भासमान वारुंना आवर घालावा.

Monday, 8 March 2021

Prefer duty in times of confusion. Quote #TM303

Quote #TM303

*Prefer duty in times of confusion*

 At times, all of us face the confusion of making decisions.  At times like these, sticking to a sense of duty is the best decision you can make.  Decisions that are appropriate to the situation are mostly found to be inclined towards a sense of duty.

सुविचार ३०३

*संभ्रमाच्या वेळी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्यावे*

काही ठराविक वेळेस आपण अश्या संभ्रमाचा सामना करतो ज्यामध्ये निर्णय घेणे अवघड होऊन बसते. अश्या वेळेस दुरदृष्टी ने विचार केल्यास कर्तव्य भावने सोबत टिकून राहणे कधीही उत्कृष्ट निर्णय गणला जातो. परिस्थितिला साजेशे निर्णय सुध्दा कर्तव्य भावनेच्या दिशेने झुकेलेल आढळतात.

Sunday, 7 March 2021

Changing the dimension of our thinking is difficult, but not impossible. Quote #TM302

Quote #TM302

*Changing the dimension of our thinking is difficult, but not impossible.*

 Changing one's own ideological framework is considered a very difficult task.  But a person who can do that has to be on a different level of awareness.
 One has to be able to examine oneself from an absolute viewpoint, this is possible only after reaching a stable mental state, keep trying.

सुविचार ३०२

*आपल्या वैचारिक आयामांना बदलणे अवघड असले तरी अशक्य मात्र नाही.*

स्वतः ची वैचारीक चौकट स्वतः बदलणे अतिशय कठीण काम गणले जाते. मात्र असे करू शकणारा व्यक्ती जागरूकतेच्या वेगळ्याच थरावर असावा लागेल.
स्वतः ला निरपेक्ष भावाने तपासता यावे लागेल. फक्त स्थीर मानसिक अवस्था गाठल्या नंतरच हे करणे शक्य आहे. म्हणून तसा प्रयत्न आपण करत राहायला हवा.

Saturday, 6 March 2021

Doing the best you can is the easiest way to be happy. Quote #TM 301

Quote #TM 301

*Doing the best you can is the easiest way to be happy.*

Our karma and happiness are closely related.  In any case, if you give less than the best contribution you can make, mental problems arise, some grief begins to erupt, then no matter how intelligent and rich are we, the feeling of accomplishment remains insatiable.
So try to enjoy your best contribution in all areas of life.

सुविचार ३०१

*तुम्ही करू शकत असलेली सर्वोत्तम कामगिरी करणे म्हणजेच आनंदी राहण्याचा सोपा उपाय.*

आपले कर्म आणि आनंद यांचा घनिष्ठ संबंध असतो. कोणत्याही बाबतीत आपण देवू शकत असलेल्या सर्वोत्तम योगदाना पेक्षा कमी दिल्यास मानसिक समस्या उद्भवतात, अन् एक खंत पोखरू लागते, मग कितीही बुध्दीमान आणि श्रीमंती का असेना, कार्यपूर्तीची भावना अतृप्त राहते.
म्हणून जीवनातील सर्वच क्षेत्रात आपले सर्वोत्तम योगदान देवून आनंद लुटण्याचा प्रयत्न करत रहा.

Friday, 5 March 2021

Sometimes it is more important to go to a place where there is no road. Quote #TM300

Quote #TM300

*Sometimes it is more important to go to a place where there is no road.*

Some experienced steps paved the way and today it became a well-traveled road, on which many can walk confidently.  Even today, there are many opportunities where no one has turned around, maybe you have the alchemy to make the same path of your dreams a useful road for many.

सुविचार ३००

*कधी कधी जिथे वाट नाहीये अश्या ठिकाणी जाणे अधिक गरजेचे असते.*

काही अनुभवी पावलांनी नविन वाट शोधात आजचे हमरस्ते तयार केलेत. ज्यावरून आज अनेक जण विश्वासाने चालू शकतात. आजही अश्या अनेक संधी उपलब्ध आहेत जिथे कोणी फिरकलेही नाहीये, कदाचित तुमच्या स्वप्नांची तीच पाऊलवाट अनेकांसाठी हमरस्ता बनवण्याची किमया तुमच्यातच दडलेली असावी.

Pay more attention to what you have. Quote #TM 299

Quote #TM299

*Pay more attention to what you have.*

Billions of people don't have what we have today. Also, the things we have today we did not have yesterday, therefore, firstly we need to check that whether we are paying enough attention to what we have gained.

सुविचार २९९

*आपल्याकडे काय आहे याचा जास्त विचार करावा.*

ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, कदाचित त्याचं गोष्ठी आज अब्जावधी लोकांकडे नाहीत याचे भान असुदे. आणि ज्या गोष्टी आपण आज मिळवल्या आहेत त्या काल आपल्याकडे नव्हत्या. म्हणून, मिळवलेल्या गोष्टीना आपण पुरेसे लक्ष्य देत आहोत काय हे ही तपासून घेता येईल.

Thursday, 4 March 2021

More darkness outside means more sharpness inside. Quote #TM298

Quote #TM298

*More darkness outside means more sharpness inside*

We become more focused in the dark, maybe more than in the light. Life desires become more intense in adverse circumstances.  And maybe we start working up to our true potential.  That is why the difference between success and failure is the same as the difference in concentration when we walk on the edge and when we walk on a flat road. Only those who remain extremely focused on their task can cross this rift.

सुविचार २९८

*बाहेर अधिक अंधार म्हणजे आतुन अधिक एकाग्रता*

अधिक अंधारात लक्ष्य अधिक केंद्रीत होते, कदाचित उजेडात असल्या पेक्षा ही जास्त.
जीवन ईच्छा विपरीत परिस्थितीत अधिक तीव्र होतात. आणि कदाचित त्यांच्या खऱ्या क्षमते नुसार काम करू लागतात. म्हणूनच टोकावरून चालताना आणि सपाट रस्त्यावरून चालताना जो एकाग्रतेचा फरक आपल्याला जाणवतो तोच यश आणि अपयश यांच्यातली दरी ठरतो. आपल्या कामात टोकाची एकाग्रता निर्माण करू शकणाराच ही दरी पार करून जावू शकतो.

Wednesday, 3 March 2021

The problems of those who blame others for their problems never end. Quote #TM297

Quote #TM297

*The problems of those who blame others for their problems never end*

Whether it is a problem or happiness, the actual experience is created within us.  This experience has nothing to do with the outside world.  But we connect its relationship with outer world only on a mental level.  This means that most of the time our reaction is the only thing that can cause or solve the problem.  It is impossible to manage 100% of the external world, but it is 100% in your hands to control your internal reactions.  The question of how much we take it into our own hands is different.

सुविचार २९७

*इतरांना आपल्या समस्येचे कारण समजणाऱ्यांच्या समस्या कधीच संपत नाहीत*

समस्या असो किंवा आनंद प्रत्यक्ष अनुभव मात्र आपल्या अंतर्गतच निर्मीत होत असतो. बाह्य जगाशी हया अनुभवाचा काहीच संबंध प्रत्यक्षात नसतो. मात्र हा संबंध ही आपण मानसिक स्थरावरच जोडत असतो. म्हणजेच बहुतांश वेळेस आपली प्रतिक्रिया ही एकच गोष्ट समस्येचं कारण किंवा निरसन बनू शकते. बाह्य जगताचे १००%  व्यवस्थापन करणे अशयक्यच, मात्र आपली अंतर्गत क्रिया प्रतिक्रीया नियंत्रित करणे १००% आपल्याच हातात आहे. आपण ते कितपत आपल्या हातात घेतो हा प्रश्न वेगळा आहे.

Tuesday, 2 March 2021

Our mental stability depends on how we handle everything. Quote #TM296

Quote #TM296

*Our mental stability depends on how we handle everything*

External conditions and uncertainty are almost the same equation.  No matter where we put gold, its price does not decrease.  In the same way, we have to prepare for our mental stability.
Our mind should not lose its balance under any circumstances.  This stability will become the foundation of our whole personality and contented life.

*कश्या प्रकारे आपण सगळ हाताळतो यावर आपले मानसिक स्थैर्य अवलंबून आहे*

बाह्य परिस्थीती आणि अनिश्चितता हे जवजवळ एकच समीकरण आहे. सोन्याला कोठेही टाकले तरी त्याची किंमत कमी होत नाही. अगदी तशीच आपली मानसीक स्थिरता आपण तय्यार करायला हवी. आपली मानसिकता कोणत्याही परिस्थितीत ढासळू नये. ही स्थिरताच तुमच्या चौफेर व्यक्तिमत्वाचा आणि समाधानी जीवनाचा पाया बनेल.

Monday, 1 March 2021

It is against self-loyalty to believe in something that is not in our experience or understanding. Quote #TM295

Quote #TM295

*It is against self-loyalty to believe in something that is not in our experience or understanding*

If you look around, you may witnesses many situations where only the opinions and speeches of others are considered as standard.  Be it religious or political or personal, to believe without examining or understanding things is to disrespect one's own intelligence.

सुविचार २९५

*आपल्या अनुभवात किंवा समजुतीत नसलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणे आत्मनिष्ठेच्या विरूध्द आहे*

सभोवताली नजर फिरवली तर असे अनेक प्रकार दृष्ठीक्षेपात पडतात जिथे फक्त इतरांच्या मतांना आणि बोलण्याला प्रमाण मानून अविचारी समर्थन दिले जाते. मग ते धार्मिक असो किंवा राजकीय अथवा वैयक्तिक, गोष्ठी स्वतः तपासून घेतल्या शिवाय विश्वास ठेवणे म्हणजेच स्वतः च्या बुद्धिमत्तेला शुल्लक ठरवणे होय.

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...