एक जग प्रसिद्ध राजा आपल्या दरबारात नेहमी प्रमाणे विराजमान होता त्याचे नित्य नेमाचे व्यवहार सुरु होते, मात्र एक चाणाक्ष मंत्री त्याच्या कडे फार कुतूहलाने पाहत होता.राज्या शी निगडित अनेक विषयांवर चर्चा करून झाल्यावर राजा आपला दरबार बरख्वास्त करून निघाला; तोच तो चाणाक्ष मंत्री त्याच्या जवळ जाऊन मुजरा करीत म्हणाला, "हे राजा जर आपली अनुमती असेल तर आपल्या करीत एक प्रश्न आहे". राजाने लागलीच होकार दिला.
मंत्री म्हणाला, हे राजन मी आपल्या सोबत कित्येक वर्षां पासून काम करीत आहे, मात्र एका गोष्टीचं नेहमीच मला अप्रूप वाटत आले आहे, तुम्ही जेव्हा दरबारात राजकीय गोष्टींविषयी मसलत करत असता तेव्हा तुमच्या राजकीय ज्ञाना समोर बाकीचे सर्व निष्णात मंत्रीगण हि खुजे वाटू लागतात, जेव्हा तुम्ही राज्याच्या आर्थिक विषयांवर निर्णय घेता तेव्हा राज्यातला सर्वोत्कृष्ट अर्थशास्त्री सुद्धा त्या सहज मान्य करतो, आणि मी पाहिलं आहे जेव्हा तुम्ही रणांगणावर उतरता, सर्वोत्कृष्ट सेनानायक तुमच्या पेक्षा वेगळा कोणी असूच शकत नाही असे वाटते, जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत असता तेव्हा तर एक प्रेमळ पिता पुत्र आणि पती ह्या तिन्ही भूमिका अगदी चोख बजावता.
यातील कोणत्या हि एक भूमिकेत सर्वोत्कृष्ठ करीत कित्येकांना जीवनभर धडपड करावी लागते, तर राजन आपल्या सारखा एकच व्यक्ती ह्या अनेकविध भूमिकांमध्ये सर्वोत्कृष कसा असू शकतो?
राजा ने मंद स्मित करत म्हंटले, तुला एक गुपित सांगतो, ते समजणं तसं अगदी सोप आहे मात्र त्याची प्रत्यक्षात अंमल बजावणी झाल्यास आपल्यातला प्रत्येक व्यक्ती जीवनातील अनेक विषयात मध्ये पारंगत बानू शकतो.
आपल मन म्हणजेच एक खूप मोठं कपाट आहे, त्यात अनेक कप्पे आहेत, आर्थिक, राजकीय, सैन्य, पारिवारिक आणि अनेक.. ह्या सर्व काप्यानं मध्ये अनेक विचार, तर्क वितर्क, कल्पना जपल्या जातात पोसल्या जातात आणि त्याना प्रगल्भता प्राप्त करवून दिली जाते. माझ्या बाबतीत, जेव्हा मी ह्यातील एखादा कप्पा उघडतो तेव्हा मनातील बाकीचे सर्व कप्पे पूर्ण पणे बंद ठेवतो, जर मी रणांगणावर असेन तर मी कोणताही राजा नसतो ना कुणाचा पती, उभा असतो तो फक्त आणि फक्त एक सेनानायक, इतर कोणताही विचार मनाला शिवतही नाही, कारण मनातील बाकीचे सर्व द्वार मी पूर्ण पणे बंद केलेले असतात, तसेच जेव्हा मी परिवारासोबत असतो तेव्हा कोणताही राजा किंवा सेनानायक नसून फक्त एक पिता पुत्र आणि पती असतो. समोर आलेल्या प्रसंगावर पूर्ण पणे लक्ष्य केंद्रित करून आपले सर्वोत्कृष्ट योगदान देणे हेच माझ्या यशामागचा रहस्य आहे. पुढे अनेक वर्ष ह्या राजाचे सुराज्य अस्तित्वात राहिले.
आपल्या जीवनातही अनेक गोष्टीं मध्ये आपल्याला पारंगत व्हायचे असते मात्र त्याची गुरुकिल्ली म्हणजेच लक्ष्य केंद्रित करण्याची कला शिकण्यात आपण फारसा रस घेत नाही, स्वामी विवेकांनदांचं एक वाक्य आहे, "जर मला पुन्हा माझा शिक्षण सुरु करण्याची संधी मिळाली तर मी सर्वप्रथम लक्ष्य केंद्रित करायला शिकेन, त्यानंतर स्वेच्छेने इतर कोणतीही गोष्ट मला शिकता येईल". अनेक वेळेस आपण पहिले आहे, २-३ तास वाचन आणि पाठांतर करून सुद्धा एखादी संकल्पना आपल्याला लहानपणी आपल्या शालेय वयात समजली नव्हती मात्र परीक्षा जवळ आल्यावर थोडा अधिक लक्ष्य केंद्रित केल्याने त्या कळू लागल्या. परीक्षांमुळे एक प्रेरणा मिळाली ज्याचा परिणाम होऊन लक्ष्य अधिक वेळ आणि अधिक चांगल्या रीतीने केंद्रित होऊ शकले आणि इप्सित परिणाम साधला गेला.
आपल्या सर्वांचा लक्ष्य केंद्रित करून ठेवण्याचा कालावधी वेग वेगळा असतो. लक्ष्य केंद्रित करीत असताना काही वेळेतच इतर विचार मनाच्या इतर कप्प्यातून बाहेर येऊन मधेच डोकावू लागतात अन लक्ष्य विचलित होते. मात्र तासनतास एखाद्या विषयावर एकाग्रते ने लक्ष्य बांधून ठेवण्याची कला ज्याला सध्या झाली त्याला नक्कीच आयुष्यात अनेक विषयामध्ये नैपुण्य प्राप्त होते आणि यशाची अनेक शिखरे गाठता येतात.
लवकरच लक्ष्य केंद्रित करण्याचा च्या पद्धतीवर एक लेख प्रसिद्ध केला जाईल.
No comments:
Post a Comment