Friday 26 June 2015

राजमाची@ धम्माल 21 JUNE

         

                             
मुसळधार कोसळणार्‍या पावसाची चिंता आणि ट्रेकिंग ची उत्कंटा यांचा सरी वर सरी रात्रभर मनात येऊन जात आणि हळूच पावसाळी गारव्यात पुन्हा झोप लागे. पहाटे मात्र त्या साखर झोपेला बाजूला सारून डोळे अलगद जागे झाले मन मात्रा अजूनही झोपलेले च, अचानक घड्याळाकडे लक्ष गेले आणि ताडकन उठून बसलो, कारण ही तसच दमदार होता ना.
गेल्या कित्तेक दिवसान पासून सरकारी प्रकल्पा प्रमाणे प्रलंबित असलेला आमचा फ्रेंड्स चा ट्रेकिंग चा प्लान आज प्रत्यक्षात उतरावायचा होता.
खरतर दोन दिवसान पासून चाललेल्या संततधार पाऊसा मुळे सर्व लोकल ट्रेन बंद ठेवण्यात आलेल्या, त्यामुळे कर्जत पर्यंत जाण्याच्या सर्वात सुकर मार्गवर टांगती तलवार च जणू, आणि पाउस पहाटे अजुन ही थांबलेला नाहीए , सकाळी उठल्या पासून टी वि वर बात्म्यात कुठे ट्रेन बद्दल सांगतायेत काय पाहाण चालू होत मधे च विचार येऊन जाई जर चालू असतील पण कर्जत ला गेल्या वर ट्रेन बंद पडल्या तर? अडकून बसू. उद्या सोमवार; ऑफीसवर्क च गोंधळच उडेल.
पण निसर्गाच्या सनींध्यात भटकंती करण्याच्या प्रबळ इच्छे पुढे हा नेहमीचा गोंधळ काय टिकणार? कसाबसा आवरत मित्रा सोबत को- ऑर्डिनेट करत ठाणे स्टेशन ला पोहोचलो आणि इंडिकेटर पाहून मन प्रसन्न झाल .हुश्श! ट्रेन्स् चालू होत्या. पुढच आवाहन तस सोप होत  वेग वेगळ्या ठिकाणा हून येणार्‍या सगळ्यांशी संपर्क साधत आम्ही कर्जत ला पोहोचलो आणि थोडा नाश्ता करून रिमझिम पाउसात 8-9 km अंतरावर असलेल्या कोंदिवडे गावात गणपती मन्दिर जवळ पोहोचलो. हाच राजमाची गडा चा पायथा.
ट्रेकिंग ची उत्कंठा आणि उत्साह प्रत्येकाच्या चेहरया वरुन रिम झिम त्या पाउसा पेक्षा जास्त ओसंडून वाहत होता. काहींचा हे पहिलाच आरोहन असणार होत आणि त्यांचा चालण्या बोलण्या तून अगदी सहज तो उत्साहा जाणवत होता
छत्रपति शिवाजी महाराज की जय च्या एका दमदार गर्जनेने सुरूवात झाली
अजुन ही प्रत्यक्षा चढाई सुरू व्हायला 700-800 मीटर च अंतर होत. चालता ना गप्पा रंगायला लागल्यात जुन्या ट्रेकिंग ची आठवणी पासून ते शेवटच्या बेंच वर शाळेत केलेल्या मस्ती पर्यंत , वातावरण प्रसन्न होत. मित्रIन मधला वेळ हा नेहमीच प्रसन्नपने जातो आणि प्रसन्नता हरवलेली असेल तर मैत्री जिवंत नाहीए असा सम्जव. प्रत्यक्षा डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो आणि पुन्हा एकदा शिव गरजनेने वातावारणात चेव आला.
डोंगराच्या चिंचोळ्या वाटा सुरू झाल्यात रिम झिम धारा ही पूर्ण थांबल्या. संपूर्ण ग्रूप आता वरूलतील मुंग्यां प्रमाणे एका रांगेत चालू लागला , एका ओढ्या वरुन उडी मारताना मधेच कुणाला तरी आठवल अरे! गणपती बाप्पा मोरया राहिलाच. आणि दुसर्‍याच क्षणी गणेशाचा जय जय कर झाला.
एरव्ही मुंबईत थोड्याशा पावसात चालायचा म्हंतल तर आभाळ कोसला असत, इथे मात्रा प्रत्येक जण चिखलातून , दगडा धोंद्या तून आणि पाना फांद्यातून अगदी मज्जा घेत आधून मधून आरोळ्या आणि गाणी बोलत मार्गक्रमण करत होत. कधी कधी असा वाटून जाता की जीवनाचा खरा अर्थ निसर्गाच्या सनींध्यातच उमागतो शहरातल्या माणसांच्या जंगलात दिवस फक्त ' उजडतो आणि अंधरतो'. इथे तो उगवतो प्रसंनतेला घेऊन नाचतो खेळतो भिजतो आणि उत्साह देऊन मIवळतो, तोच असा उत्साह इथे आल्यावर आपल्यात संचारतो.
थोडा चढ उतार करत लहान मोठी ओहोल पार करत आणि फोटो सेशन करत पहिला टप्पा 'कोंढाणा लेणी' पर्यंत पोहोचलो आम्ही. गावा पासून अर्ध्या अधिक तसा च्या अंतरावर जवळपास 400 वर्षं पूर्वीची बुध्द कालीन लेणी त्या काळी बहरलेल्या व जगाला शांती चा संदेश देणार्‍या धम्मा सोबत सुंदर नक्षीकाम चा नमूना बनली आहेत. उंचा वरुन कोसळणारा एक लहानसा झरा लेण्यांच्या सुंदरतेवर खोवलेला शिरपेच च भासत होता. पाऊस वाढला की हा झरा धबधब्यात बदलून जातो. अजुन ही पाऊसने दडी मारल्याने आलेला थकवा अनेकानी त्या झरर्यात धुवून काढला उंचावरून पडणारे टपोरे थेंब झेलत मनमुराद आनंद लुटत आम्ही पुन्हा राजमची च्या दिशेने कूच केली, चढाई आत्ता थोडी अवघड झालयाने आमचात थोड अंतर पडू लागला. सभोवर हिरव्या रानातून वाहणारा गार गार वारा तकलेल्या चेहरया वरुन स्पर्शून जाताना अगदी हवा हवासा वाटे, प्रत्येक झूळुक एक नवीन उमेद देऊन जाते आणि इथे बाह्या जगाचा विसर पडतो.
अचानक कुठून तरी दूरवर कोसळणार्‍या सरीनचा तो धुंद ध्वनी घुमू लागला आणि थोड्याच वेळेत आम्ही जोर जोरात गायलेल्या ' येरे येरे पाऊसा......' गIण्या ला प्रतिसाद मिळाला. कोण म्हणता की निसरगा आणि मानवाचा गमक जुळत  नाहीत,  ती जूळतात. फक्त निसर्गाशी संवाद साधता यायला हवा कुरघोड नव्हे. निसर्गाचा भाग म्हणून त्याचा कुशीत खेळता यायला हवा, आपली जीवनाची नवीन व्याख्याच तो देईल.
हलू हलू पाऊसने जोर धरला टपोरे थेंब आता युद्धातल्या सैनिकन सारखे सर्वांगा वर आणि झाडं वर तुटून पडू लागलेत, म्हणता म्हणता पौल वाटण चा रुपांतर वाहत्या ओढ्या मधे झले त्या
मालकट रंगाचा वाहत्या पाउल वाटेवर गाणी गात तोल सावरत चालण्या ची मज्जच निराळी, ती घरात निवांत बसून अनुभवतच येणार नाही, उत्कृष्ट खलाशी जसा वादळा शी झुंज घेण्यातली मज्जा जाणतो तत्सम धुंदी ट्रेकर्स मधे पसरलेली असते म्हणूनच तर रविवार चा सुट्तीच्या दिवशी घरात आराम करण्या पेक्षा हा थरार अनुभवण्याची मज्जा सगळे लुटत होते.. कंफर्ट ज़ोन सोडला की आयुष्यात खरी मज्जा सुरू होते, सगळ्या च बाबतीत.
एव्हाना अरधी अधिक चढाई झाळी होती ह्या बेफां पाऊसठ सर्वांचा जोश ही अजुन असा बेफां चढत चाललाय, चेहरे अजुन ही उत्सहिच. इथेच जाणीव होऊन जाते ती मानवाच्या अनंत इच्छा शक्ति ची. जीवसृष्टीत सर्वात प्रगत असण्या मागच हे महत्वच कारण असावा न थांबता नवीन शिकत आणि पुढे जाण्याच्या प्रयतनं मुळेच बुध्धी चा विकास होत गेला असावा आणि
मानवाला नवीन  क्षितिज गाठता आली, असो-
आमचा राजमची च क्षितिज गाठण्या साठी आत्ता पर्यंत एक मेकांचा हात धरत आणि प्रेरणा देत एक मोठा टप्पा पार केला होता रस्त्यात एक झोपडी वजा खुले घर लागल, इथे सहसा गावातील लोक लिंबू पाणी वागरे घेऊन बसतात, आज मात्रा कुणीच नव्हता, थोडा वेळ इथे विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा चालू लागलो, आत्ता मात्र किल्या ची मॅनरंजन गदा कडील बाजू आणि तटबंदी स्पाश पाने दिसू लागल्या होत्या मोठे मोठे दगड एक मेकन वर रचून तयार केलेली ती भक्कम तटबंदी शिवकाळच उत्स्फूर्त स्मरण करून देत होती
 पाऊसने मात्रा आत्ता अकरल विक्राळ रूप धरण केला होता सोसाट्याच्या वार्‍या बरोबर सलगी करत आमचा वर धावा बोलत होता जणू, पण मावल्यांचे वंशज आम्ही तितक्याच जोमाने अस्मनीच्या पाऊस रूपी सुलतानिला उत्साहात मार्गक्रमण करत उत्तर देत होतो, जणू गडच फत्तेह करायचाय, मुळात ही गढूळ लेली वाट दात धुके पाऊसचा मारा, पायवाते वरुन चितवणी देत नागी वर करून पॅळणारी खेकदी या सर्वांत बाजी मारुन जात होती ती 'एक मेकन ची सोबत' सोबातीमुळे कोणतीही समस्या ही समस्या वाटतच नई भीती वगैरे सारखी भवने चा डोक्यात लवलेश ही नव्हता. या प्रसंगात 'एकटा' सापडलो तर मात्रा नक्कीच ' सोबती' ची किंमत समजू शकेल, प्रत्येक नात्यात जर अशी मैत्री ची सोबत नसेल मग ते अगदी पालक आणि मूळ असो किवा नवरा आणि बायको च जर ह्या नात्यात मैत्री जिवंता नसेल तर मात्रा प्रत्येक समस्येत एकटयानेच भरकताव लागता
मात्रा इथे तर सगळे अस्सल मित्राच मग कशाल कुणाची भीती फक्त आगे बढो तेज चलो....
भर भर अर्ध्या तासांचा रस्ता पार करत आल्या वर समोरच आई च्या मंडीवर शांत झोपलेल्या बाळा प्रमाणे गदा च्या पायथ्याशी वसलेल टुमदार उंधेवाडी गाव दिसल, गावात शिरल्या वर वेळ ना दवादता गड सर करण्या चा निर्णय झाला आधी गड आणि  गावात येऊन मग जेवण.
 मुखया गडला इथे सुरूवात होते 3 वाजले होते . गडा कडे उंचा मानेने पाहाताना सळसळणार्‍या वार्‍या सोबत जोश ही सळसळू लागला. mtdc ने काळभैरव मंदिर पर्यंत पहिला टप्पा नीट बांधकाम केले ला आढळतो, ग्रामस्थानचा देवस्थान असलेल्या मंदिर जवळ दगडी बांधकाम पडिक अवस्थेत आढळते एक लहानशी तोफ ही इथे ठेवलेली आहे. क्षणभर पाहून गाढ चढाई सुरू केली मधूनच सभोवर नजर गेली की सुंदर दृश्यांची एक मेजवानीच मिळे हिरवळीने अच्छाडलेला आणि तब ताबून भीजलेला डोंगर आणि त्या वरुन काप्सा च्या पुंजक्या प्रमाणे पळणारे ढग कसा मन हरवून टाकतात कुठे तरी दूरवर शांता पाने कोसळणारअ धबधबा जणू त्या मेजवानीला रंगात दर चव च आणत होता . असली अस्सल मेजवानी डोळे नुसते घाटा घाटा पिऊन टाकत होते.
 पायवाता अगदी अरुंद झाल्या एका वेळी एकाच माणूस चालू शकेल तोही तोल सावरत च. जाणून बुजून त्या अरुंद ठेवण्यात आल्या असाव्यात शत्रू पक्षाच्या आक्रमणाला तोपवण्या साठीच कदाचित, आम्ही श्री वर्धन गडाच्या मुखया दरवाजा जवळ पोहोचलो अजुन ही भक्कम अवस्थेत असलेल्या त्या उंच प्रवेश द्वारा पाशी अनपेक्षित रित्या भरलेल्या कंबर भर पाण्याने आंच स्वागत च केल. जवळ पास 25-30 फुट पायवाट संपूर्णपणे पाण्यात बुडलेली. एक मेकांच्या साथीने आणि फोटो सेशन करत मज्जेत तो जलभाराव पार केला आणि राजमची च्या दिशेने चढाई ला सुरूवात केली डोंगरा दगडांच्या पोटात खोडलेल्या गुफा आणि मोठे पाण्याचे खंदक वाटेतील खास आकर्षण आहेत, सगळे आत्ता बर्‍या पैकी उंची वर आलो होतो वार्यने कसा रुद्रावतारच धरण केला होता जणू त्यामुळे सरळ उभे राहून चालण्या पेक्षा डोंगराच्या बाजूने झुकत तोल सावरत चलावे लागे. वर्यचा वेग उंची प्रमाणे वाढु लागला आणि टपोरे थेंब वेगात चेहरया वर अडलू लागलेत , डोंगराला आपटून निसटण्या करिता वारा शिखराच्या दिशेने येत होता ह्या मॅद्मास्ट हत्ती प्रमाणे वागनार्‍या वार्यात काही जन अगदी बसून  पुढे सरकत होते. आमचा वेग जरी त्या मुळे मांडवला असला तरीही इच्छा शक्ति तितकीच प्रखर होत चालेली इथे आठवता कोलंबस चे गर्वागीतातील ओळ 'अनंत आमुची ध्येयासक्ती अन् अनंत अशा किनारा तुला पामराला' खुल्या ख्वाललेल्या महासागराला बजावून सांगताना बेभान वार्‍या समोर हात ना टेकटा नाव नवीन क्षितिज पालटी घालताना नक्कीच त्याला मानवी मनाच अगाध समर्थ्या आणि दुरदम्या इच्छाशक्तीच गमक उमगला असावा. एव्हाना गडाचा गौरव्षाली इतिहासाचा पोवाडा गणर्‍या सम फॅड फॅड करणार्‍या उत्तुंग भगवा निशाण नजरेत पडला शून्या तून विश्व निर्माण करण्यार्‍या विजुगीषे च दुसरा नाव आहे 'शिवाजी'.
राजमाचीच्या उत्तुंग टोकावरून टपोरे थेंब चेहरया वर घेत फोटो ग्राफी करत धमाल करत आणि सुंदर देखावा पाहत त्या रमनीय शिखराचा आनंदा सरवनी लुटलात्या अभरच्छादित शिखरावरून खाली पाहाताना हवेत च असल्या चा आभास होत होता, वातावरण कसा च्ण आणि हरषोल्हस हीच खरी जगण्याची मज्जा आणि  जिवंत रहन आणि जागणा यातील फरक.
थोडा वेळ तिथे घलवुन आम्ही गड उतरू लागलो ढगांच्या पाला पाळीत मधूनच दिसणारा ते सुंदर दृष्या पाहत पाहत पायथा गाठला आणि गावात मस्त गरम गरम भाकरी भाजी आणि वरण भाता वर तव मारला, सगळा आटोपून पर्तीच्या वाटेवर निघे पर्यंत पाउने सहा झालेत . आलेला रस्ता पुन्हा खाली उतरायचा होता आणि ते ही अंधार व्हायच्या आत, अंधार टाळण्या साठी सगळे लगबगीने खाली उतरू लागलेत पायवटंच्या घासरगुंड्या झाल्या होत्या आणि तोल ना सावरल्या मुळे काही जन त्यावर घासरगुंदी खेळूंही झालेत. संपूर्ण जीव पायात आणून एक मेकन हात देत सावध रीतीने उतरू लागलो पावसाला आता तितकासा जोर नव्हता मात्रा हलू हलू अंधरू लागला बराच अंतर बाकी होत, जर खूप अंधार पडला तर मारगा शोधणे अवघड होईल समोर असलेला रस्ता ही त्या मुळे दिसेनासा होतो, त्या साठी अनुभव असणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा प्रसंगी 'चकवा' लागण्याची शक्यता असते असा झाळ्यास घोर अंधारात पावसात जंगलात रात्र काढावी लागू नये म्हणून  सगळे थोडी घाईच करत होते जवळपास निम्मा अधिक मार्ग उतरलो होतो की अचानक पुढे चालत असलेल्या मित्रांची हक एकू आली आणि लगबगीत त्यांचा पर्यंता आम्ही सगळे पोहोचलो, भेदरलेल्या चेहर्यांचे दोन नवीनच व्यक्ती मित्रण सोबत उभेा होत्या, प्रेमी युगुल असावा कदाचित त्यांचा ग्रूप पासून वेगळा होऊन जंगलात हरवून बसलेले आणि मदती साठी आरडा ओरडा करत असताना मित्राने त्याना शोधला होत, कोणत्या ही जंगलात आननुभवी व्यक्तीने एक एकट्याने रहन वेदेपणाच ठरू शकता त्या साठी आपत्कालीन व्यवस्थेच योग्या ज्ञान असावा. आमच्या संपूर्ण टीम ने त्याना धीर देत आमचा त सामावून घेतला, आता ते सावरळेही असतील मानाने मात्रा काही मिनिटं पूर्वीची त्यांच्या भर पावसात अंधरतया जंगलात कुणीच सोबत नसताना ची अवस्थेची नुसती कल्पनाच केलेली बारी
काही गोष्टी कशा प्री प्लान असल्या सारख्या वाटतात कर्जतला पोहोचायला लागलेला अधिक वेळ शिखरावर पोहोचण्यात झलेली डिरंगाई कसा जाणून बुजूनच झाल्या सारखा वाटून गेल, काही मिनिटा आधी उतार लो असतो तर त्या जोडप्याला कुणाची सोबत कदाचित सापाडलीच नसती असो-
 अजुन ही पायथ्याशी जायला बराच वेळ होता आता मात्रा रस्ता गडप होइसतॉवर अंधार पडला होता आमचा जवळच्या तौरच लागल्या त्या टीम टिंत्या प्रकाशात दात अंधरातून आम्ही चालू लागलो, आकाश अभरच्छादित असल्या मुळे एकही तारा किवा कसलच प्रकाश नव्हता. भीजलेला रस्ता आणि दगडी आमच्या एकाग्रतेची जणू पराकाष्तच करत होत्या, पायवाट काहीशी लक्षात होती मात्रा या दात अंधारात तर्कशक्ति आणि भाकितं वरच मार्गक्रमण चालू होत  निष्णात व्यक्ती पण गोंधळून जाईल अशाबहुतेक ठिकाणी मार्गाला फाटा फुटायचा, एक चुकीच वळण आणि सगळे अंधारात हरून बसू आता मात्रा सगळे एकत्र चालत होतो जास्त अंतर पडू देत नव्हतो
खरा तर हा थरार म्हणजे एक अविस्मरणीय मज्जाच त्या घनघोर अंधारत्तून चमचामनारे कजवे आणि ती किरर्र आणि त्यात हळूवार वाहणारा वारा सारा कसा रोमांचित करणार, फक्त अनुभवाव,
सरळ मारगा वर आहोत की भटकत चलोय याचा अंदजा घेत असताना एक शेर आठवला आणि तो बोलूनही दाखवला 'मजीले मिल ही जयएंगी भटकते हुए ही सही, गुमरहा तो वो ह्य, जो घरसे निकले ही नही'
मुळात सगळ्यांचा स्वतहा वर विश्वास होता की आपण योग्य मार्गI वर आहोत त्यामुळे भीतीच वर्चस्वा कुणावर ही दिसत नव्हता, गाणी आणि मज्जा सुरुच होती आधून मधून, त्यात पॉआवसने दादी मारल्या मुळे मार्ग सुकर झाला होता, अजूनही नेमका किती मारगा बाकी आहे याचा अंदजा येत नव्हता राटरा वाढत होती, अचानक समोरच अजगरा सारखी वळणे घेत वाहणार्‍या ओढ्याची खूण दिसली आणि योग्या मार्गI वर असल्याचा हवाला मिळाला, इथूनच जंगलात शिरलो होतो आम्ही, तोंडातून YES अशे मुखोदगार निघIलेत. पायथ्याशी पोहोचताना पुन्हा मIन वर करूंन जेव्हा जंगाला कडे पहिल तेव्हा विश्वासच बसला नाही की थोड्या वेळा पुर्वी इतक्या अंधारात आम्ही भटकत होतो.
दैव कृपेने सगळ सुकर झIल, जवळ पास पाउणे नउ च्या सुमारास आम्ही पायथा गाठला आणि छ्त्रपति शिवाजी व गणपती बाप्पा च्या जयघोषत आमच्या धम्माल ट्रेक ची सांगता झIली, आणि चालता चालता पुढील ट्रेक च्या प्लॅनिंग च डिस्कशन सुरू झाल…………….

Tushar Mahadik
9819567211/8082035645
To Join Our Upcoming Trek  CLICK here

Website











Sunday 7 June 2015

माणसा माणसा थांब रे !!-7


continue from last blog.........तितकच जबाबदारीने त्यांनी जगाचा विचार करायला हवा फक्त स्व राष्ट्रं पुरता मर्यादित दृष्टिकोन ठेऊ नये लोकमता चा प्रवाह अनभिज्ञ पणे ते प्रभावित करतात सर्व बाबींचा एकत्रित विचार केल्यास एक गोष्ट्लक्षात येते की नजीकच्या काळात जर मानव जातीला शानतीपूर्ण वातावरणात टिकून राहायचे असेल तर स्वताहा ला खर्या अर्थाने समजून घेणे अनिवार्या आहे, तरीही गाढ झोपेत असलेल्या  बुध्ढीचा स्वामी मानवाला याची जाणीवच होऊ नये हाच मोठा विरोधाभास. आज अनेक राष्ट्रं मधे युध्जान्य परिस्थिती विस्फोटक बनत चाललीये आणि जागाच विभाजन अमेरिका प्रभावी WTO आणि चीन प्रभावी APEC च्या दोन गटा मधे होत असून नकळत पणे अनेक राष्ट्रे यात खेचली जात आहेत, यांचा एकमेकन नामोहरम करण्या पेक्षा फक्त विकासत्मक दृष्टिकोन नक्कीच जगाला एक सकारात्मक बदल देईल, पण पुन्हा याची पळे मुळे मानवी मेंदूच्या अनियंत्रिततेत रुजलीत. त्या साठी प्रत्येकाणे समान सामूहिक जबबदारीने आत्म् परीक्षण करून स्वताहत सकारात्मक बदल घडवण गरजेचे आहे, ही अवघड असले तरीही  एकमात्र कायम स्वरूपी उत्तर आहे. स्व संयम हाच गुण सबंध जगाला उज्ज्वल भवितव्य देईल

Tushar Mahadik

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...