लग्न म्हंटलं तर तरुणांच्या मनातबागडणारं फुलपाखरू, लगेचच डोळ्यां समोर उभी राहते ती रेशमी अनुबंधांची सुरुवात.
पुराण काळा पासून चालत आलेल्या लग्न प्रथेमुळे मानव जातीच्या कौटुंबिक अन सामाजिक विकासात सुसंस्कृत सुलभता नांदते.
आजच्या समाज शैलीवर अन मानसिक पातळीवर तांत्रिक प्रगतीचा प्रचंड प्रभाव दिसून येतो, त्यालाच अनुसरून तरुण पिढीच्या स्वतंत्र आणि बदलाभिमुख विचारांचा वारू, स्थिर अन पारंपरिक बंधनांची वेस ओलांडून पाहत आहे, प्रेम विवाह ह्या विषया वर देखील आजच्या अन कालच्या पिढीमध्ये उभ्या वैचारिक द्वंद्वाचा चित्र अनुभवास येते, यावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप.
जुन्या पिढीच म्हणणं काय आहे?
जीवनातील अनेक चढ उतार पाहून मानसिक परिपक्वता गाठलेली हि पिढी. सभोवारच्या परिस्थितीची जाणीव असल्याने आपल्या मुलांच्या लग्ना विषयी अतिशय जागरूकता बाळगताना दिसून येतात. प्रेमाच्या गुलाबी रंगाच्या पलीकडील पांढऱ्या अन काळ्या वास्तवाची जाणीव असल्याने यांच्या दृष्टिकोनातून मुलां साठी जोडीदाराचा विचार करताना जीवनावश्यक गरजांची पूर्तता, मान मरातब, पारंपरिक समजुती, पत्रिका जुळने,आर्थिक व सामाजिक पत, जात, धर्म, कोणत्या गावा कडचे अशा अनेक बाबींचा विचार केला जातो, त्यांच्या दृष्टीने या गोष्टी ची पूर्तता करणारा व्यक्ती हा चांगला जोडीदार बनण्याची शक्यता जास्त असते. तसेच दोन दशकांच्या आधीच्या मतांचा काहीसा पगडा मनावर असल्याने सहसा आपल मत हे बरोबरच असून आपल्या मुलांसाठी हितकारक आहे अशी पालकांची प्रगाढ समजूत झालेली पाहावयास मिळते.
आजच्या पिढीचं काय म्हणणं आहे?
क्षितिजावर उदयाला आलेल्या सूर्या सारख्य नवीन अशा आकांक्षा आणि ऊर्जेने भरलेल्या तरुणानं साठी सामाजिक बदलाची झालेली जाणीव त्यांच्या स्वतंत्र मतांना परिपोषक ठरते त्या मुळे अनेकदा तरुणांच्या मते त्यांला अनुरूप असलेला जोडीदार निवडीच स्वतंत्र त्यांना हव असत. तो निवडताना त्याची गुण वैशिष्ठे, त्याच दिसणं, वागण्याची पध्दत, आर्थिक कुवत, दोघां मध्ये असलेल प्रेम, विश्वास असे अनेक भावनिक निकष आधारभूत असतात.
मध्य साधण्यात अडचण काय?
पालक आणि मुलांमध्ये एकपिढचा अंतर असून काही निकषां वर दोघे हि आपापल्या जागेवर त्यांच्या मतानुसार बरोबरच आहेत, मात्र एकमेकांना समजून घेण्यात ते सपशेल फोल ठरतात, मुलांना आपल म्हणणं समजावून सांगण्यात आणि पालकांना त्यांचा म्हणण समजून घेण्यात विशेष असमर्थता दिसून येते.
पालकांच्या बाबतीत त्यांच्या नातेवाईकांची मते विशेष ग्राह्य धरली जातात त्या मुळे मुलांच्या लग्नाच्या बाबतीत पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाणं याचा अर्थ गुन्हा करणे असा गृहीत धरला जातो, आणि इथेच मध्य साधण्याच्या अडचणींचा केंद्र बिंदू सापडतो, अनेकदा पालकाना मुलांची मतं मान्य हि असतात मात्र चौकटी बाहेर जाण्याच्या कल्पित गुन्ह्या मुळे आप्तसमाजाकडून बाहेर फेकले जाण्याच्या भीती पोटी त्यांना माघार घ्यावी लागते. मुलांना हि आपल्या पालकांची कुचम्बन दिसुन येत असते मात्र त्यांचा विश्वास संपादन करणे शक्य होत नहि.
उपाय काय ?
मानसिक पातळीवर गुंतागुंतीच्या असलेल्या आणि अतिशय मानसिक ऊर्जा खर्ची पडणाऱ्या ह्या प्रसंगांना सामोरे जाऊन मार्ग काढण्या करीता मात्र सहजता असावी लागते, जितकी अधिक क्लीष्ट पद्धत तितका मार्ग बिकट, आणि उपाय सापडण्याची ची शक्यता कमी.
यात पालकांनी आणि मुलांनी एकमेकांची बाजू कोणता हि पूर्वग्रह मनात न ठेवता समजून घ्यावी, अगदी कितीही अवघड वाटत असेल किंवा आपल्या तत्वात बसत नसेल तरीही. ह्या प्रसंगानं मध्ये सर्वात मोठी उणीव भासते ती पालक आणि मुलांन मध्ये सुसंवाद घडून येण्याची, सुसंवाद याचा अर्थ कोणालाहि मानसिक शारीरिक त्रास न होता सर्वात पूरक आणि योग्य मार्ग शोधणे. सुसंवाद साधताना मुलांनी सर्वात आधी समजून घ्याव कि पालकांच्या मनात मुलांच्या उज्ज्वल भविष्याची अपेक्षा असते आणि त्या संदर्भात आपण घेतलेलय निर्णयाच्या किंवा निवडलेल्या जोडीदारा बाबत ते साशंक आहेत, त्यांच्या शंकांचं निरसन करणे आणि आपल्या निर्णयाची योग्यता सिद्ध करणे हे आपले कर्तव्यच समजावे आणि पालकांनी नेहमी आपल्या तात्विक आणि बंधनीय अपेक्षांच्या ओझ्या खाली मुलांना न दाबता त्याचा भविष्य साठी योग्य जोडीदाराची म्हणजे त्याची गुणवत्ता , मानसिक वय, विचारसरणीतील तफावत, आता पर्यंतच्या आयुष्यात त्याने घेतलेले निर्णय, त्याची भविष्यातील आर्थिक पाठबळ देण्याची कुवत, विषम परिस्थितीत मिळत जुळत ठेवून कुटुंब सांभाळू शकण्याची योग्यता या बाजूंचा विचार नक्की करावा, कारण मुलांना त्यांच्या पालकांना शिवाय कोणीही तितका छान रित्या समजून घेऊ शकत नाही . एकमेकांना समजून घेत असताना आणि समजावून सांगत असताना असलेल्या मतभेदांवर त्याच्या कारणां सोबत चर्चा झाल्यास उत्तमच. यात मुलांना स्वतः ला आपल्या निवडी बाबत पूर्ण आत्मविश्वास असणे गरजेचे आहे, तो स्वतः आधी तपासून घ्यावा , प्रेम करण्या सारखी सुंदर अभिव्यक्ती दुर्लभच, मात्र ती क्षण भंगुर नाहीये ना हे स्वतः जाणून घ्याव. तसेच पालकांनी हि स्वतः आत्मपरीक्षण केलेला असाव कि मुलांच्या निर्णयाला केलेला आपला विरोध हा फक्त अकारण किंवा प्रत्यक्षात महत्वाच्या नसलेल्या गोष्टींना धरून तर नाहीये ना. लग्न हे कोणत्या हि प्रकारचे असो प्रेम किंवा जुळलेले, त्या जोडीदारा सोबतचे लग्न नंतर चे आयुष्य कुणीही प्रत्यक्षात अनुभवलेले नसते, असतो तो फक्त कल्पनाच आणि बांधलेल्या अंदाजांचा खेळ, पण ह्या खेळात प्रत्यक्ष वागणुकीचा आणि योग्यतेचा अनुभव घेऊन अचूकतेच्या जवळ जाणं आपल्याला योग्य त्या निर्णया पर्यंत घेऊन जात, आणि हे फक्त सुसंवादानेच शक्य होते हे पालक आणि मुलं दोघांनिही लक्ष्यात घ्याव.- तुषार मिलिंद महाडिक.
No comments:
Post a Comment