Wednesday, 31 March 2021

Only when a person wants to be limitless can he realize his true potential .Quote#TM325


Quote#TM325

*Only when a person wants to be limitless can he realize his true potential*.

Drawing conclusions about your abilities means to stand on the last rock beyond which no possibility exists.  Belief-conclusion determines the boundary line of one's ability.  But once we become fully aware of our potential, a vast field of opportunity opens up which allows us to run on the path of true limitlessness and show the courage to leap beyond the rocks of belief, because the awareness of ability is the awareness of having wings.

सुविचार ३२५

*जेव्हा एखादी व्यक्ती अमर्याद होऊ इच्छिते तेव्हाच तिला तिची खरी क्षमता जाणवु शकते*.

स्वतः च्या क्षमते विषयी निष्कर्ष काढणे म्हणजे शेवटच्या खडकावर उभे राहणे ज्याच्या पलीकडे कोणतीही शक्यता अस्तित्वात नाही.  विश्वास-निष्कर्ष एखाद्याच्या क्षमतेची सीमा रेखा निश्चित करते. परंतु एकदाका आपल्या क्षमतेबद्दल स्पष्ट जाणीव झाली की संधींचे एक मोठे क्षेत्र खुले होते ज्यामुळे आपण खऱ्या अर्थाने अमर्याद होण्याच्या मार्गावर धावू लागतो अन् विश्वासाच्या खड्का पलीकडे झेप घेऊन उंच उडण्याचे धैर्य दाखवतो कारण क्षमतेची जाणीव म्हणजेच पंख असल्याची जाणीव होय.

Tuesday, 30 March 2021

If anything is meaningful to you, you should go for it, no matter how difficult it is. Quote #TM324

Quote #TM324

*If anything is meaningful to you, you should go for it, no matter how difficult it is.*

Often the meaningful things are just difficult ones. But if you know its value then you should continue to work on it without leaving it for anyone else's efforts. Perhaps you are the only one who has realized the true value of that thing.

सुविचार ३२४

*अर्थपुर्ण असलेली गोष्ट कितीही अवघड असली तरी ती करायला हवी.*

बऱ्याचदा आपल्यासाठी अर्थपुर्ण असलेली गोष्ट तितकीच अवघड ही असते. मात्र जर त्या अर्थाचे मूल्य आपण जाणत असल्यास, त्या गोष्टीची पूर्तता इतर कुणीतरी करावी अशी आशा न बाळगता आपणच निश्चय करून त्यासाठी प्रयत्न चालू ठेवावा. कारण कदाचित त्या अर्थाचं मूल्य फक्त तुम्हालाच तुमच्या योग्यते मुळे उमगले असावे.

Monday, 29 March 2021

Some opportunities come easily, some in exchange for failures. Quote #TM323

Quote #TM323

*Some opportunities come easily, some in exchange for failures*

Every failure leads to new teachings that offer new learning and create new opportunities.  We have to prepare ourselves for every opportunity that comes our way.

सुविचार ३२३

*काही संधी सहज मिळतात तर काही अपयशाच्या बदल्यात*

प्रत्येक अपयश नविन शिकवणं देवून जाते ज्यातून शिकण्याची आणि घडण्याची नवीन संधी निर्माण होते. आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक संधी साठी आपण स्वतः ला तयार करायला हवं.

Sunday, 28 March 2021

The sure a consequence of dissolving ourselves with existence is stable mind. Quote #TM322

Quote #TM322

*The sure a consequence of dissolving ourselves with existence is stable mind*

If your mind is stable by choice, and a calm mind is your identity, then you are one of the billions.
A stable attitude is a kind of miracle, and to some extent, it develops from the surrender of the negative dominant feeling in us.  That is, where one sees oneself as a part of the surrounding creation without considering oneself to be supreme, the mind automatically all at the place and achieve stability

सुविचार ३२२

*जिथे स्वतः ला अस्तित्वाशी एकरुप केले जाते, तेथे परिणामी स्थीर चित्त निर्माण होते.*

मानसिक स्थिरता जर तुमची स्वतः ची निवड असेल आणि शांत चित्त तुमची ओळख असेल तर नक्कीच तुम्ही अब्जावधी लोकांमध्ये एक आहात.
स्थिर चित्त वृत्ती म्हणजे एक प्रकारचा चमत्कारच असून काही अंशी आपल्यातील नकारात्मक वर्चस्व भावनेच्या समर्पणातून ही वृत्ति विकसीत होते. म्हणजेच जिथे स्वतः ला सर्वोच्च न मानता सभोवतालच्या सृष्टीचा एक भाग म्हणून पाहिले जाते, तेथे परिणामी स्थीर चित्त वृत्ती निर्माण होते.

Saturday, 27 March 2021

Observation is an art that is closely linked to success. Quote #TM321

Quote #TM321

*Observation is an art that is closely linked to success.*

Focusing on something just for a few seconds reveals many aspects that have never been seen before.  Observations made with an unbiased attitude uncovers answers from the impossible ground. But adopting the art of absolute observation is not so easy, it requires developing a sight that has zero-assumptions.

सुविचार ३२१

*निरीक्षण एक कला असून यशाशी तिचा जवळचा संबंध आहे.*

कोणत्याही गोष्टीवर फक्त काही सेकंद ध्यान केंद्रित करून पाहिल्यास कधीही न दिसलेले अनेक पैलू समोर येतात. निरपेक्ष वृत्तीने केलेले निरिक्षण कोणत्याही प्रश्नावर उत्तर सापडणे अशक्य नाही. मात्र निरपेक्ष निरीक्षणाची कला अंगीकारणे तितकेसे सोपे नसून त्यासाठी गृहितक विरहित शून्य नजर विकसित करणे गरजेचे आहे.

Thursday, 25 March 2021

There is no shortage of new ideas, but there should be a strong desire to implement them. Quote #TM320

Quote #TM320

*There is no shortage of new Ideas, but there should be a strong desire to implement them.*

Ideas that can transform the whole world come in many minds. Many give a deep thought on how to make those concepts a reality, but they remain in the core of the head as it is. However, the world continues as it is.
It takes the intense desire to get the concept out of our heads and make it a reality.

सुविचार ३२०

*नवनवीन संकल्पनांची कमी नाहीये मात्र त्या अंमलात आण्यासाठी लागणारी तीव्र इच्छा हवी.*

सम्पूर्ण जगाचा कायापालट करू शकणाऱ्या कल्पना कित्येकांच्या डोक्यात साकारल्या जातात. त्या संकल्पनांना प्रत्यक्षात कसे आणावे यावर अनेकदा मग्न होउन विचार ही केला जातो मात्र, त्या तश्याच डोक्याच्या गाभाऱ्यात पडून राहतात. प्रत्यक्षात मात्र जग आहे तसेच चालू राहते. कारण संकल्पनेला डोक्यातून बाहेर काढून प्रत्यक्षात उतरवण्या साठी साथ हवी ती तीव्र इच्छेची.

Wednesday, 24 March 2021

Self-discipline is impossible without purpose. Quote #TM319

Quote #TM319

*Self-discipline is impossible without purpose.*

Many want to get up early in the morning and do many things that are considered a form of self-discipline. To fulfill that, firm determinations are made but after a few days, everything gets again as usual.
The main reason for this is imparting discipline from the outside without an inspiring purpose is difficult. But the self-discipline emerges from within and lasts for a long time when it comes to achieving the purpose of life.

सुविचार ३१९

*उद्देश्या शिवाय आत्मशिस्त अशक्य.*

अनेकांना पहाटे लवकर उठायचे असते आणि अशी अनेक कामे करायची असतात जी आत्मशिस्तीच्या प्रकारात गणली जातात. कठोर निश्चय ही केला जातो मात्र काही दिवसांनी पुन्हा नेहमी सारखच सगळ सुरू होत.
याच मुख्य कारण म्हणजे ठळक उद्येशा शिवाय शिस्त बाहेरून लादली गेल्यास पडणारा फरक तकलादू असतो, मात्र जिवनाचा उद्देश गाठण्यासाठी निर्माण झालेली अत्मशिस्त आतून निर्माण होत असल्याने ती दीर्घकाळ टिकते.

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...