Monday 28 October 2019

भीमबेटका- लक्षावधी वर्षांची कहाणी.





मध्य प्रदेश ला कामा निमित्त जाणं झाल अन परतीच्या वेळेस इच्छा झाली ती शाळेच्या प्राथमिक वर्गानं मध्ये वाचलेल भीमबेटका हे ऐतिहासिक ठिकाण पाहण्याची.
वेळ तसा  फारच कमी होता, परतीच्या  प्रवासाची वेळ ठरलेली  रात्री ९:०० ची, मुंबईत वेळेत पोहोचणं अनिवार्य, कामकाजाच्या उलाढालीतून उसंत मिळेना शेवटी कसा बसा  सायंकाळी ४:३०च्या सुमारास मोकळा झालो, भोपाळ पासून जवळपास ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाण पर्यंत पोहचणे अन पुन्हा  ९:०० पर्यंत भोपाळ गाठण जवळ पास  अशक्य, कारण प्रवासाची अनिश्चित साधने. पण जोखीम घेण्यास  कुणी रोखलेय . बॅग भरली अन रस्त्यांचा शोध सुरु केला. जवळपास ६:३० च्या दरम्यान होशंगाबाद द्रुतगती हमरस्ता सोडला अन त्याला लागूनच असलेल्या लहानश्या गावात शिरलो, गावातील गावकऱ्यांकडून मिळालेली माहिती मात्र निराश करणारी होती ती,  ६:00 ला या गुंफे कडे जाण्याचा मार्ग बंद होतो, मात्र पर्यटकांसाठी चे  प्रवेशद्वार जवळपास १ किलोमीटर अंतरावर, आत्ता  पुन्हा परतावं भोपाळला अन ९:०० ची ट्रेन पकडावी, कि किलोमीटरभर अंतर ह्या  रातापानि अभयारण्याच्या जंगलातून संपूर्ण निर्मनुष्य मार्गावरून एकट्याने चालत जाऊन मुख्य प्रवेश द्वार गाठावं अन शहा निशा करावी, समजेना, गावातील  लोकांच्या मतानुसार माझ पुढे जाणं व्यर्थ आणि जोखमीचा आहे. इथं पोहोचे पर्यंत बरीच पायपीट अन वाहनांची अदला बदल केली होती म्हंटलं अजून एकदा घ्यावी जोखीम. चालत सुटलो चालत  कसला पळतच..

कॉलेज मध्ये अर्थशास्त्रात वाचलं होत, जोखीम घेण्याचा मोबदला म्हणजे नफा, आज  अर्थ कळला, प्रवेश द्वारावर पोहोचल्यावर कळले कि आजच  पुरातत्व विभागाची एक टीम अली असून ती जास्त वेळ थांबणार आहे त्यामुळे काहीवेळ  अजून चालू राहील, पण माझ्या सारख्या बाहेरील व्यक्तीस पर्यटनाची वेळ  संपल्या कारणाने आत सोडण्यात येणार नाही असे सांगण्यात आले, मात्र काही वेळातच तिथल्या व्यवस्थापनाला माझी आतमध्ये जाण्याची प्रखर इच्छा पटवून देण्यात मला यश मिळाले, अन पुढच अजून 2 km अंतराचा रस्ता भराभर चालून  पार करण्याची तय्यारी केली, इतर वेळी  ७-८ व्यावसायिक दुचाकीस्वार येथे प्रवाश्यांची नेआन करतात, येथे येणारे प्रवासी हि तुरळकच, त्यात हि भारतीय प्रवासी मोजकेच, सुदैवाने येथे काम
करणाऱ्या एका सद्गृहस्थाने मला अंधार पडायच्या आधी गुफे पर्यंत पोहोचता यावे ह्या करिता स्वतःच्या दुचाकीवर बसवून काही मिनिटांमध्येच मुख्य प्रवेशद्वारावर सोडले,गुफांच्या मुख्य  प्रवेशद्वारावर माहिती देणाऱ्या फलकाद्वारे आपणास गरजेची पुरती माहिती मिळते



 सुमारे एक लक्ष्य वर्षा पूर्वी पासून मानवजातीचा इतिहास जतन करून ठेवणारे हे ठिकाण आज जगासमोर आणण्याचा श्रेय जात पद्मश्री श्रीधर वाकणकर याना, त्यांनी  खडतर प्रवास sकरत या जागेचा शोध लावून आणि पुढे इथे सखोल संशोधन करून हे स्थान जगासमोर आणले, आज भीमबेटका च्या ह्या गुंफा युनेस्को च्या यादीतील  जागतिक वारसा स्थान  बनले आहे, इथे असलेली  चित्रे भारतातील सर्वात प्राचीन भित्तिचित्रे समजली जातात



आतमध्ये शिरताक्षणीच येथील खडकांच  वेगळे पण प्रकर्षाने लक्ष्यात येत, खडकांची उंचच उंच संरचना कालानुक्रमे इथे घडलेल्या नैसर्गिक क्रियांची साक्ष देतात.





द्वारा समोर एक अश्मयुगीन कुटुंबाची दैनंदिनी असलेला कृत्रिम देखावा ध्यान ओढून घेतो मात्र त्याच देखाव्यात वरील बाजूस असलेलं खरखुरं अश्मयुगीन चित्र अन बाजूकडील खडकावर रेखाटलेला सिंहाचं चित्र स्वागत करत, सिहाच्या अगदी अस्पष्ठ चित्रात एका पेक्षा अनेक रंग असूशकतील यावर सुरुवातीला विश्वास बसणं अवघडच, मात्र खोल निरीक्षणा अंती अगदी अस्पष्ट असे तीन रंग यात  दिसूलागतात.


पुढे सरकताना एका अजस्त्र नैसर्गिक गुफेतून वाटचाल करत युगे युगे मागे जात असल्याचा भासच जणू,
गुफेच्या अंती आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरतो तो म्हणजे  एका ठिकाणी उमटलेला हाताच्या पंजाचा ठसा, कुणीतरी जाणते पणे  किंवा अजाणते पणे  एका चिमुकल्या बाळाच्या हाताचा ठसा येथे उमटवलेला आहे, सहज मनात विचार तरंगून गेले कि हा असा हातांचा ठसा रेखाटताना असताना  काय संभाषण झाले असावे  त्या लहानग्यात आणि त्याच्या कुटुंबियांन मध्ये..खालील फोटो मध्ये आपण पाहू शकता.


गुफेतून बाहेर येताच तत्कालीन दफन विधी ची माहिती देणारे उत्खनन दिसून येते, येथून पुढे अनेक अश्मयुगीन गुंफा अन त्यात काढलेली भित्तिचित्रे बोलू लागतात अन
हजारो वर्षांपूर्वीचा काळ साक्षात डोळ्यांसमोर उभाकरतात, पर्यटकां साठी इथल्या परिसरात असलेल्या शेकडो गुंफां पैकी १२-१५ गुफाच खुल्या आहेत, मात्र त्या पुरेश्या आहेत.



आश्चर्यकारकरित्या भीमबेटका येथील चित्रांच्या रंगांनी काळाची अस्पष्टता टाळली आहे.
रंग म्हणजे लाकडी कोळसा, मऊ लाल दगड, वनस्पती पाने आणि प्राणी चरबी यांचे मिश्रण आहेत.
ही चित्रे आपल्या पूर्वजांची जीवनशैली आणि दैनंदिन क्रिया दर्शवितात.
जन्म, दफन, नृत्य, धार्मिक विधी, शिकार करण्याचे दृश्य, प्राणी लढाई आणि आनंदोत्सव यासारखे विविध समुदाय उपक्रम देखील या चित्रांमध्ये दर्शविले गेले आहेत.





गेंडा, वाघ, वन्य म्हशी, अस्वल, मृग, डुक्कर, सिंह, हत्ती, सरडे इत्यादी प्राण्यांची चित्रेही वर्णन केली आहेत.

काही ठिकाणी तर निव्वळ कल्पना विलासात साकारलेली कल्पित चित्रेही पाहायला मिळतात, कदाचित सुरुवातीच्या काळातील मानवाच्या क्रीटीव्हिटी चा नमुना आहेत, एका चित्रात साकारलेलं एक काल्पनिक प्राण्याशी चाललेले एक माणसाचे युद्ध हे याचे उत्तम उदाहर आहे.



विंध्य पर्वतांमध्ये नर्मदेच्या काठावर वसलेले हे तत्कालीन समृद्ध जीवन असणारे हे एक नैसर्गिक रित्यातयार झालेल शहरच असावे, काँक्रीट च्या शहरांपासून दूर असलेल्या ह्या चित्रां मध्ये असलेल्या मुख्यतः पांढरा, लाल अन पिवळसर रंग आपल्याला सहज येथे गुंतवून ठेवतात, इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी हा एक खजिनाच आहे.





मनसोक्त पाहून झाल्यावर, अंधार पडायला लागल्या कारणाने निघावा लागलं,आजूबाजूचा परिसर प्राणी, पक्षी आणि वनस्पतींनी समृद्ध असल्यामुळे ३ किलोमीटर च्या निर्मनुष्य वाटेवर अंधारा सोबतच हवेतून सुसु करत परतीच्या वाटेवरील मोरां सारखे पक्षी किंवा इतर जंगली प्राण्यांचे आवाज अस सगळं एकट्याने अनुभवणे काही औरच.

भोपाळ रेल्वे स्टेशन ला ट्रेन निघून गेल्याच्या वेळेनंतर पोहोचलो, अन पाहतो तर ट्रेन २ तास उशिराने धावत आहे, म्हणजे आजचा माझा दिवस भीमबेटका भेटीसाठीच आपोआप नियोजित झालेला असाव याची खात्री पटली.
आपल्या हि यादीत असंच एखादं नियोजन घडून याव हि सदिच्छा.

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...