Sunday, 29 November 2020

Anything that are you experiencing now is your own making. Quote #TM 204

Quote #TM 204

*Anything that are you experiencing now is your own making.*

The image of the universe that we perceive is a manifestation of our mental state.  Basically what we feel is our inner experience.  The outside world has nothing to do with this experience.  As human beings, we all get caught up in a very big psychological game, but the value of this game in universal existence is zero.  But it is equally true that the realization of this zero-nothingness puts us at the forefront of this illusory game.

सुविचार २०४

आपल्याला जाणवत असलेली विश्वाची प्रतिमा ही संपुर्णपणे आपल्या मानसिक अवस्थेचे प्रगटीकरण आहे. मुळात जे काही आपल्याला जाणवते ते आपल्या आत मधील अनुभव असतात. बाह्य जगताला ह्या अनुभवाशी काही घेण देण नाही. मनुष्य म्हणुन आपण सर्व एका खूप मोठ्या मानसिक खेळत अडकतो, पण वैश्विक अस्तित्वात ह्या खेळाचे मूल्य शून्य आहे. मात्र ह्याच शून्य भावाची जाणीव आपल्याला ह्या भासमान खेळात अग्रेसर ठेवते, हे ही तितकेच खरे.

Saturday, 28 November 2020

If you want to fly high, you have to leave the ground. Quote #TM203

Quote #TM203
*If you want to fly high, you have to leave the ground.*

If you want to explore all the possibilities of life, first of all, you have to be determined to get out of the comfort zone because you have to give up your old comfort-seeking and attached habits, just like you can't fly high holding the ground. You need to transform yourself into a new you, no matter how difficult it seems this is the first step to success.

सुविचार २०३

*उंच उडायचे असल्यास जमिनी सोडावी लागते.*
आयुष्यातल्या सर्व शक्याताना गवसणी घालायची असल्यास सर्वप्रथम आरामदायक अवस्थेतून बाहेर पडण्याची जिद्ध हवी कारण जमिनीला धरून उंच उडता येत नाही त्याप्रमाणे आपल्यातल्या जुन्या आरामदायक आणि जडलेल्या सवयीना सोडावे लागेल आणि कितीही अवघड वाटत असले तरी स्वतः ला एका नवीन रुपात रूपांतरित करावे लागेल. भरारारी घेण्याची हीच पहिली पायरी.

Friday, 27 November 2020

One should try to know all the dimensions of life. Quote #TM202

Quote #TM202

*One should try to know all the dimensions of life.*

According to our knowledge and experience, we become part of a small puddle and that puddle becomes like an ocean for us. In this ocean of life, life and energies are flourishing on different levels, from inanimate stars to small butterflies, it is incredible.  Therefore, we should always be aware that we are part of this wonderful global phenomenon, and we should try to maintain our incredible state in this naturally great dimension.

सुविचार २०२

*जीवनाच्या सर्व आयामांना जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.*

आपल्या ज्ञान आणि  अनुभवानुसार आपण एका लहानशा डबक्याचा भाग बनतो आणि तेच डबकं आपण महासागरा प्रमाणे भासवू लागतो. विश्वाच्या ह्या महासागरात निर्जीव ताऱ्या पासून ते लहानशा फुलपाखरा पर्यंत विविध स्तरावर जीवन आणि ऊर्जा बहरत आहेत, त्या उत्स्फूर्त आहेत. म्हणुनच आपण ही ह्याच वैश्विक अयामाचा भाग आहोत याचे भान सतत राहूदे, आणि आपले स्थान ह्याच उत्स्फूर्त अयामात कायम ठेवण्याचा प्रयंत असावा.

Thursday, 26 November 2020

Perfection doesn't exist, one can earn excellence. Quote #TM201

Quote #TM201

*Perfection doesn't exist, one can earn excellence.*

If something is not technical or mathematical, it is difficult to achieve perfection in it, it is almost impossible to achieve perfection in things related to the human mind, behavior, expectations, roles, and thoughts.
But with perseverance and effort, we can take everything to the next level called excellence.
Sometimes, perfection in a sense is what we do best.

सुविचार २०१

*परिपूर्णता कधीही प्राप्त होऊ शकत नाही परंतु आपण उत्कृष्टता मिळवू शकतो*

एखादी गोष्ट तांत्रिक किंवा गणितीय नसेल तर त्यात परिपूर्णता मिळवणे अवघड, मानवीय मनाशी, वर्तनाशी, अपेक्षांशी, व्यवहाराशी, आणि विचारांशी निगडित गोष्टी मध्ये परिपूर्णता साधणे जवळपास अशक्यच.
मात्र सातत्य आणि प्रयत्न यांच्या जोरावर सर्वच बाबींना आपण उत्कृष्ट स्तरावर नेवू शकतो.
आपण जे करतोय ते उत्कृष्ठ रित्या करणे म्हणजेच एका अर्थी परिपूर्णता होय.

Wednesday, 25 November 2020

A confused mind is a source of inactivity. Quote#TM 200

Quote#TM 200

*A confused mind is a source of inactivity*

In this world, there is no shortage of dreams, no shortage of budding people, many people have their success plans as well. But whether to do it or not, future worries, impossible predictions, to take risks or not,  this sort of confused mindset has proved to be the most harmful. Millions of dreams stuck in this state forever. That is why it is necessary to come out of such a confused state of mind as soon as possible and see a clear picture because clarity is a success.

सुविचार २००
*गोंधळलेले मन हे निष्क्रियतेचे स्रोत आहे*

या जगात स्वप्नांची कमी नाहीये, होतकरू लोकांची देखील कमी नाहीये, खूप लोकांकडे योजना देखील आहेत. मात्र कराव की करु नये, भविष्याची चिंता, अशक्यप्राय अंदाज, धोका पत्करावा की पत्करू नये, यामुळे गोंधळलेली मनस्थिती सर्वात जास्त अपायकारक सिद्ध झाली आहे. लाखो स्वप्न याच अवस्थेत अडकून पडलेली आहेत. म्हणूनच लवकरात लवकर अश्या गोंधळलेल्या मनस्थितीतून बाहेर येवून सुस्पष्ट चित्र पाहणे गरजेचे आहे, कारण सुस्पष्टता म्हणजे यश.

Tuesday, 24 November 2020

Why' and 'how' these can be powerful words for the dreamer. Quote #TM199

Quote #TM199

*'Why' and 'how' these can be powerful words for the dreamer.*

We often see that most people know what they want in life.  But there is not much thought about why it is needed and how to get it.  It is impossible to find the energy to move forward without answering these two questions in order to make the dream come true.  Let's find the clear answers to these questions and follow the path with enthusiasm.

सुविचार१९९

*स्वप्न पाहणाऱ्यासाठी का आणि कसं हे शक्तिशाली शब्द ठरु शकतात.*

आपण अनेकदा पाहतो कि बहुतेक लोकांना हे माहीत असतं की त्यांना आयुष्यात काय हवं आहे. मात्र ते का हवं आहे आणि ते कसं मिळवता येईल यावर तितकासा विचार केला गेलेला नसतो. स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी या दोन प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे ह्या उत्तरान शिवाय पुढे चालण्याची ऊर्जा मिळणे अशक्य. चला तर ह्या प्रश्नांची सुस्पष्ट उत्तरे शोधुयात आणि उत्साहात मार्गक्रमण करूयात.

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...