Wednesday, 5 August 2020

Indomitable will is secret of constructing path to achieve imposible dreams. Quote#TM88

*Indomitable will is secret of constructing path to achieve imposible dreams*

If we explain it in few words, let us use Peter drukers words:
"What we have to do and the way we have to do it is incredibly simple. Whether we are willing to do it, that’s another matter."
Perhaps, important one.

*दुर्दम्य इच्छाशक्ती अशक्य स्वप्नांच्या प्राप्तीसाठी मार्ग बांधण्याचे रहस्य आहे*

 थोडक्यात पीटर ड्रकर्स यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास:
 "आपल्याला काय करावे लागेल आणि ते कोणत्या पद्धतीने करायचं आहे हे जाणून घेणं आश्चर्यकारकपणे सोपं आहे. आपण ते करण्यास तयार आहोत की नाही, ही वेगळी गोष्ट आहे"
 कदाचित, सर्वात महत्वाचे.

Tuesday, 4 August 2020

Magic is believing in ourself. Quote#TM87


Quote#TM87

*Magic is believing in ourself*

Swami Vivekananda once said, we cannot believe in god until we believe in ourself.
The heavenly powers are already there within us and self belief is the key to access these powers.

*आत्मविश्वास ही एक जादू आहे*

स्वामी विवेकानंद एकदा म्हणाले होते, आपण स्वतःवर विश्वास ठेवल्याशिवाय देवावर विश्वास ठेवू शकत नाही.
स्वर्गीय शक्ती आपल्या आत याआधीच अस्तित्त्वात आहेत आणि आत्मविश्वास या शक्तींमध्ये प्रवेश करण्याची गुरुकिल्ली आहे.

सात दिवसात सात पुस्तके यशस्वीरित्या वाचून पूर्ण केल्या नंतर मिळालेले धडे.

काही दिवसांपूर्वी एका माजी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाखती दरम्यान, ३६५ दिवसात ३६५ पुस्तके वाचली असल्याचे त्याने म्हंटलेले मी ऐकले अन थोडा साशंक झालो. वाचनाची तशी आवड तर आहे मला मात्र आजतागायत काही मोजकीच पुस्तके मी वाचून पूर्ण केली होती, अन तेही एका पुस्तकासाठी एक ते दोन महिन्या वेळ घेत त्यामुळे दर दिवशी एक संपूर्ण पुस्तक वाचणं कसं शक्य आहे असा साहजिक प्रश्न पडला? कित्येकदा  मी आठवड्या भरात एक पुस्तक वाचण्याचा निर्धार करतो आणि तोच निर्धार त्याच पुस्तका साठी दुसऱ्या आठवड्यात हि नव्याने करावा लागतो. रोजच्या दैनंदिन कामकाजात वेळ कसा अगदी भुर्रर्रकन निघून जातो हे रात्र झाल्याशिवाय लक्ष्यात हि येत नाही अन आठवडा संपून नवीन आठवडा सुरु होतो.
ह्या वेळेस मात्र एकदा स्वतःहून हे आव्हाहन स्वतःला देण्याचा निर्णय घेतला अन म्हंटले पाहुयात तरी जमतंय काय, वाचूयात एका दिवसात एक पुस्तक अन आठवड्या भरात सात. २३ जुलै ला पहिले पुस्तक हातात घेतले अन २९ जुलै ला सातवे पुस्तक पूर्ण केले. ह्या सात दिवसाच्या प्रवासात मनाच्या अंतर्भूत क्षमतांची नव्याने जाणीव झाली, हा प्रवास एक उत्कृष्ठ अनुभव होता, त्यातून मिळालेली शिकवण आपल्या सोबत सामायिक करताना आनंद होत आहे.

१. वेळेची कमतरता

प्रत्येकाला जरी रोज चे २४ तास मिळालेले असले तरी प्रत्येकाने मिळवलेल्या यशाची व्याप्ती हि वेगळी असते, आपली स्वप्न आणि ध्येये पूर्ण करायची असल्यास प्रत्येक मिनिटाचा त्या कार्यासाठी वापर करणे हि महत्वाची बाब लक्ष्यात आली. माझ्या २४ तासांतील ८ समर्पित तास नोकरीचे अन ६ तास झोपेचे असे १४ तास संपूर्ण वगळून उरलेल्या १० तासांचं गणीत बसवण्याचं मी ठरवलं. ठरवलेल्या पुस्तकांची पृष्ठ संख्या ३००, १२३, २८६, १२७, १०६, २२३,२३६ अशी असल्याने रोजची जवळपास २०० पाने वाचावी लागणार होती, त्यातही एखाद्या पुस्तकाची जास्त पाने असल्यास ते २४ तासांच्या आताच पूर्ण करावयाचे ठरवले.
विषय समजून घेऊन वाचल्यास अन नोट्स काढण्याचीही सवय असल्याने प्रतिपानि मला १.५ ते २ मिनिटे लागतात हे लक्ष्यात आहे. त्यानुसार रोजचे ४ ते ६ तास समर्पित करावे लागणार होते कधी जास्त तर कधी कमी. वाचनास
सुरुवात करण्या आधी असे वाटले कि हे आव्हान म्हणजे अगदी तारेवरची कसरत असणार आहे, मात्र प्रत्यक्षात आलेला अनुभव काही वेगळाच होता, आप्तेष्ठां सोबत वेळ घालवणे, रोजचा व्यायाम करणे, ध्यान आणि योग करणे, नोकरीतील कामे करणे, मित्रांबरोबर बोलणे, इंटरनेट वर वेळ घालवणे, अश्या अनेक रोजच्या कामांचा त्याग करण्याची गरजच लागली नाही. फक्त वायफळ घालवलेला वेळ सत्कारणी लावला, आपल्याकडे खूप वेळ असतो हे या दरम्यान लक्ष्यात आले, अन "वेळ नाहीये" हा फक्त मनाने स्वतः साठी गुंफलेला एक आभास असल्याचे जाणवले, प्रत्यक्षात आपल्याकडे ऊर्जा नसते किंवा इच्छा नसते, त्यामुळे वेळेचं नियोजन होत नाही, तांत्रिक दृष्ट्या वेळ नसणे हा फार क्वचित घडणार प्रकार आहे, असं दररोज नक्कीच होत नाही.

२. इच्छेची तीव्रता

आपले मन नेहमी आपल्याला आरामदायक अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे एखादे जाड पुस्तक पहिल्या बरोबर मनात ते न वाचण्याची अनेक कारणे समोर येऊ लागतात आणि ती कारणे महत्वाची असून पुस्तक वाचण्यात वेळ घालवू नये हे एकदा का पक्के केले कि थोड्याच वेळात ती कारणे हि विस्मृतीत जातात आणि स्वतः ला पुस्तका पासून दूर ठेवण्याच्या मनाच्या डावपेचाचा विजय होतो. अगदी अश्याच निर्णायक क्षणी आपल्या इच्छा शक्तीला काही काळ रोखून धरून लहानशी सुरुवात केल्यास, जसे, फक्त एखादे पान वाचल्यास, कदाचित मनाला हे काम सोपं वाटूलागेल कारण रोज एखाद पान वाचणं काही अवघड नाहीये, मग हळू हळू विषया बद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची इच्छा आणि आपली जिज्ञासा पुढचा प्रवास सोपा करेल, माघार घेण्यापेक्षा लहानशी कृती सुरु करणे ही यशाची  गुरुकिल्ली आहे आणि सतत अशी पुनरावृत्ती केल्यास तिचे सवयीमध्ये रूपांतरण होऊ शकेल.

३. प्राधान्य क्रम


वेळेचं नियोजन म्हणजेच खऱ्या अर्थाने जीवनाच नियोजन. उर्वरित १० तासांमध्ये दैनंदिन कामे आणि ४-६ तास वाचन यांचा व्यवस्थित नियोजन करताना ४० मिनिटांचे ७ ते १० संच तय्यार केलेत, सकाळी १० वाजेच्या आधी २-३ तास आणि सायंकाळी ७ नंतर २ ते ३ तास वाचनाला प्राधान्य देत  ह्या वेळेत सगळे 
 ४० मिनिटांचे संच पूर्ण केलेत. नेमकं ह्याच काही तासांमध्ये आपण बऱ्याचदा आपला वेळ कमी महत्वाच्या अथवा फक्त मनोरंजनात्मक गोष्टीं वर खर्च करतो, हा वेळ आपण आपल्याला आयुष्याला उभारणी देणाऱ्या कार्यासाठी वापरू शकतो हे जाणवले. करमणुकेचे जीवनात महत्व तर आहेच मात्र स्वतःला घडवण्याचा उद्धेश आपण बाळगून असाल तर हा वेळ आपण नवीन काहीतरी शिकण्यासाठी वापरू शकतो.

४. चिकाटी

सतत वाहणारी नदी आणि तिच्या सततच्या प्रवाहाने दुभंगलेले पर्वत, चिकाटीचे ह्या पेक्षा छान उदाहरण नाही. सुनियोजनाला सातत्याची साथ लाभल्यास जवळपास अशक्य असे काहीच नाही. नैसर्गिकरित्या आपले मन कोणत्याही गोष्टीवर जास्त वेळ केंद्रित राहू शकत नाही दर ६-७ सेकंदां नंतर ते इतरत्र पळू लागते, अश्या वेळेस जिद्दीची लगाम घालून मनाला स्वयं शिस्तीचा धडा शिकवावा, अश्या अनेक आवर्तनांनंतर आपोआपच मनाला एकाग्रतेची सवय लागेल. जिद्धीचा उगम उत्स्फूर्त प्रेरणेतून होतो, प्रेरणा हि ध्येयाच्या स्पष्टते मुळे मिळते म्हणूनच  अंतः  प्रेरणेनमुळे सुस्पष्ट ध्येय जिद्दीच्या जोरावर गाठणे शक्य होते.
जास्तीत जास्त वेळ लक्ष्य केंद्रित ठेवू शकण्याच्या गुणांवर प्रत्येकाने काम करायला हवे, कारण एकाग्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे.

आपल्यातल्या पूर्ण क्षमतांची जाणीव कदाचित आपल्याला योगायोगानेच होते, मात्र त्याकरिता आपण उत्साही असायला हवे, प्रत्येकात अमर्याद क्षमता असून त्याची जाणीव व्यक्तिपरत्वे कमी अधिक प्रमाणात असते कधी ती अनुभवातून होत असते तर कधी ती आपोआपच होऊन जाते, ह्या क्षमतांना जाणून घेऊन अधिकाधिक विकास  करणे आणि आपल्या जीवन उर्जेला शक्ती प्रदान करणे हे मात्र आपल्या हाती आहे.


Monday, 3 August 2020

Sometimes, a small shift in thought is enough to make a big difference. Quote=#TM86


Quote=#TM86

*Sometimes, a small shift in thoughts is enough to make a big difference*

When trying to make a big change or transform something old in to new, one should look for all small ways to practice it.
Collection of all small thoughts and actions generate compound effect and create our life experience, to life experience better, man can try to gain certain amount of Self-control,which can be achiev by changing our small and daily habits.
Start small change big.

*विचारांतील लहानसा बदल ही मोठा बदल घडवता घडवण्यासाठी पुरेसा असतो.*

एखादा मोठा बदल घडवून आणण्याचा किंवा जुन्या गोष्टीना नवीन रुपात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करताना, अनेक लहान लहान बदलांनी मोठा बदल घडवता येतो. सर्व लहान बदलांचा एकत्रित मोठा प्रभाव तयार होतो.
माणूस आपल्या आयुष्यात जो सर्वात मोठा बदल करू शकतो तो म्हणजे त्याच्या स्वतः वर विशिष्ट प्रमाणात आत्मसंयम मिळविणे, आपल्या लहान आणि दैनंदिन सवयी बदलून हे साध्य करता येते.

What I learned after successfully reading seven books in seven days.


A few days ago, I came across an interview of a former senior administrative officer. He had read 365 books in 365 days. I became a little skeptical about it. Though I love reading, I could manage to read only a few books so far. It generally takes a month or two to complete a single book. I was wondering, how is it possible to read a whole book every day? 
We all are so busy with our daily chores that it is hardly possible to make out some time during this busy schedule. Days and weeks pass but few tasks like reading a book remain as it is.
This time, however, I decided to give it a try and challenge myself to complete a book in a day and seven books within a week.
I started reading the first book on July 23 and completed the seventh book on July 29. This seven-day journey was a new realization of the inherent potential of our mind. A journey, a wonderful experience that I am so eager to share with you all.

1. No time to read: 

Although everyone has 24 hours in a day, many of us don't use all the hours effectively. The important lesson I learned here is, it is essential to use every minute and work towards the goal if you want to achieve it successfully. Excluding a total of 14 hours from my 24 hours, 8 hours for dedicated office work, and 6 compulsory hours of sleep, and decided to use the remaining 10 hours effectively towards the goal of reading the book and do other daily activities.
Since the number of pages of the books I decided to read was 300, 123, 286, 127, 106, 223, 236 therefore I had to read around 200 pages a day.
I have a habit of taking notes while reading so it takes me 1. 5 to 2 minutes per page. Accordingly, a simple calculation of math says I need to dedicate 4 to 6 hours a day out of the 10 hrs.
Before I started, it seemed like a challenge, but in reality, the experience was different, I never have to sacrifice on my routine like spending time with family, daily exercise, meditation, and yoga, talking to friends, watching the news etc.
This made me realized that we have a lot of time, and that "no time" is just a feeling beautifully wrapped up in our mind. In fact, we usually do not have energy or desire to read and that's why we don't go for planning our time properly. In short, for most of the individuals, 'no time' occurs sometimes but not daily.

2. Intense desire: 

Our mind always try to keep us at ease, so when we see a thick book, our mind provides us a list of reminders of other important tasks that are remaining, or it tells us, reading is a time-consuming task, instead, in the same time, we can complete other tasks, then automatically we find many good reasons for not opening the book, but trickily, even those thoughts and reminders disappear once we decide not to read, and finally mind wins the game.
At such a crucial moment, if one could hold back on his will power for a while and start with a small action like reading one or two pages, maybe the mind will start believing that reading one or two pages in a day is not difficult, then gradually the desire to learn more on the subject and curiosity to know more, will drive him to read more and complete the book. Taking small action is the key, and repeating it multiple times possibly converts it into a habit.

3. Prioritization: 

Time planning is life planning, prioritization has its own importance in life and in daily routine. In my schedule, I divided the whole day long task of reading the book into 7-10 sets of 30-40 minutes each. 3 hours before 10 a.m., and 2 to 3 hrs after 7 p.m. I spend reading books. We always have these extra hours in each day but we often spend these hours on less important tasks or on entertainment. Entertainment has its own importance in life, but when self-improvement is the priority one can exchange it with productive learning.

4. Perseverance: 

Almost everything is possible when one is accompanied by Perseverance. There is no better example of perseverance than the continues-flowing river which divides mountains into two and creates her own path.
Naturally, our minds cannot stay focused on anything for longer than 6-7 seconds, it starts running here and there.
The mind will automatically get into the habit of focusing for a long after repetitive imperfect attempt to hold it on any task for some time, we can teach the mind a lesson of self-discipline with the restraint of persistence.
The persistence originates from inner motivation, inner motivation comes from the clarity of the goal, thus the strength of persistence makes it possible to achieve a clear set goal.

I started believing that everyone has unlimited potential powers but its awareness is more or less individual. Sometimes we become aware of potential strengths through experience and sometimes it happens automatically. However, it is up to us to discover and develop our potential powers and strengthen our life energy.


Sunday, 2 August 2020

People are not a problem but their lack of awareness is. Quote #TM85

Quote # TM85
*People are not a problem but their lack of awareness is.*

Sometimes we identify a person as a problem but his current state of mind is the actual problem, and it is separate from him. Maybe his awareness, knowledge, and experiences from which he had gone through have made him up in this way. As always, no state is permanent but has changing nature, we can change one's state of mind by improving his degree of awareness with the right approach and practice. It may be a difficult job but it can be a permanent solution to many humanly problems.

*समस्या माणसांमध्ये नसून त्यांच्यातील जाणीवेच्या कमतरतेत आहे.*

कधीकधी आपण एखादा व्यक्ती हाच समस्या असल्यासारखं पाहतो. परंतु त्याची त्यावेळची मानसिक स्थिती ही वास्तविक समस्या आहे आणि ती त्याच्यापासून विभक्त आहे. कदाचित त्याला असलेली जागरूकता, ज्ञान आणि ज्या अनुभवातून तो गेला आहे त्यांनी त्याला या आज जो तो आहे त्याप्रमाणे बनवले असेल. नेहमीप्रमाणे, कोणतीही स्थिती कायमस्वरुपी नसते परंतु तिचे स्वरूप बदलत असते. योग्य दृष्टीकोन आणि कारवाई करत आपण एखाद्याची जागरूकता वाढवित त्याची मनाची स्थिती बदलू शकतो. हे एक कठीण काम असू शकते परंतु मानवी समस्यांवरील ते कायमचे निराकरण असू शकते.

Saturday, 1 August 2020

Life is meaningless until we find its meaning by our own efforts. Quote #TM84

Quote #TM84

*Life is meaningless until we find its meaning by our own efforts.* 

Efforts are the tools that build life. Without the efforts, we cannot build the masterpiece of character. Thus, the efforts that are taken during the journey of discovering purpose of our own existence, prepares us to fulfil that purpose! The journey itself is a training to handle the masterpiece of our future character.

*आयुष्यचा अर्थ तो पर्यंत निरर्थक आहे जो पर्यंत आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी तो अर्थ आपल्याला सापडत नाही.* 

 स्व प्रयत्न हे जीवनाच्या उभारणीचे साधन असतात, स्वतःच्या मेहनतीने प्रयत्न केल्याशिवाय आपण उत्कृष्ट आयुष्यं उभारू शकत नाही.
म्हणून आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा हेतू शोधण्याच्या प्रवासादरम्यान केलेल्या प्रयत्नातून आपल्याला त्या हेतूची पूर्तता करण्याची पात्रता अंगी येते! हा प्रयत्नांचा प्रवास आपल्या नव्याने उभारलेल्या उत्कृष्ठ चरित्राला व्यवस्थित हाताळू शकण्याचे प्रशिक्षण असते ज्या योगे आपल्या जीवन उद्देशाने जगण्यासाठी आपण सिद्ध होतो.

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...